Thursday, July 7, 2022
Home भारत दर महिन्याला एक रुपया गुंतवा आणि दोन लाखांचा विमा घ्या, 'असं' करा...

दर महिन्याला एक रुपया गुंतवा आणि दोन लाखांचा विमा घ्या, ‘असं’ करा रजिस्ट्रेशन


नवी दिल्ली : देशातल्या गरीब कुटुंबांना सामाजिक सुरक्षा देण्यासाठी केंद्र सरकारने एक पाऊल उचललं आहे. पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेच्या (PMSBY) अंतर्गत आता दर महिन्याला केवळ एक रुपया भरावा लागणार आहेत आणि त्यामुळे आपल्या कुटुंबाला दोन लाखांच्या विम्याचे सुरक्षा कवच मिळणार आहे. 

आजच्या धकाधकीच्या आयुष्यात विमा ही केवळ गुंतवणूक नव्हे तर अत्यंत आवश्यक बाब बनली आहे. त्यामुळे आपल्या कुटुंबाला सामाजिक सुरक्षा मिळू शकते. उच्च मध्यम वर्गातील बहुतांशी लोक आपला विमा उतरवतात पण गरीब लोकांना याचे प्रिमियम भरायला परवडत नसल्याने ते याकडे वळत नाहीत. त्यामुळे गरीब कुटुंबांच्या सामाजिक सुरक्षेसाठी केंद्र सरकारने ही योजना सुरु केली आहे.

पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेच्या (PMSBY) अंतर्गत वर्षाला 12 रुपये भरावे लागणार असून त्यामुळे दोन लाखांचा अपघात विमा सुरक्षा मिळणार आहे. या योजनेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे वर्षाला एकदाच हा 12 रुपयाचा प्रिमियम भरावा लागणार असून ते आपल्या बँकेच्या अकाऊंटमधून आपोआप कट होणार आहेत. 

या योजनेसाठी रजिस्ट्रेशन केल्यास दर वर्षाच्या 31 मे पूर्वी आपल्या अकाऊंटमधून 12 रुपये कट होणार आहेत आणि आपल्याला 1 जून ते 31 मे या कालावधीच्या दरम्यान विम्याची सुरक्षा मिळणार आहे. या योजनेनुसार, व्यक्तीचा अपघात झाल्यास किंवा त्याला कायमचे अपंगत्व आल्यास दोन लाख रुपयांचा अपघाती विमा मिळेत तर जखमी झाल्यास किंवा तात्पुरते अपंगत्व आल्यास त्याला एक लाख रुपयाचा विमा मिळणार आहे.  या योजनेचा लाभ मिळण्यासाठी आपल्या बँकेच्या अकाऊंटमध्ये बॅलेन्स असणं आवश्यक आहे. बँक खाते बंद झाल्यास पॉलिसी बंद पडते.  

कसं करायचं रजिस्ट्रेशन? 
या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपल्याला आपल्या जवळच्या बँकेत जावं लागेल आणि तसा अर्ज करावा लागेल. यासाठी आपण बँक मित्रांचीही मदत घेऊ शकता. केंद्र सरकार सर्व सार्वजनिक आणि खासगी बँकांच्या सहकार्यांने ही योजना राबवत आहे. 

कोणत्या वयोगटातील व्यक्तींना होणार याचा लाभ? 
पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेचा (PMSBY) लाभ 18 ते 70 वयोगटातील लोकांना होणार आहे. जर एखाद्याचे वय 70 वर्षाच्या वरती असेल तर त्याला या योजनेचा लाभ मिळणार नाही.

महत्वाच्या बातम्या : अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#दर #महनयल #एक #रपय #गतव #आण #दन #लखच #वम #घय #अस #कर #रजसटरशन

RELATED ARTICLES

ढालेपाटलांच्या सुना काही ऐकत नाहीत बुवा! शिवानीने शेअर केला ढिनच्यॅक video

मुंबई 6 जुलै: (Colors Marathi) कलर्स मराठीवरील ‘राजा रानीची गं जोडी’ (Raja Ranichi Ga Jodi) मालिकेची सध्या खूप चर्चा होताना दिसत आहे. काहीच दिवसांपूर्वी...

Indian Railways:PNRच्या 10 अंकांत काय दडलंय?प्रत्येक क्रमांकात असते विशेष माहिती

What is meaning of Indian Railway’s 10 digit PNR Number mhsa - Indian Railways: PNRमधील 10 अंकांत नेमकं काय दडलंय? प्रत्येक क्रमांकात असते...

Most Popular

विम्बल्डन टेनिस स्पर्धा : किरियॉस प्रथमच उपांत्य फेरीत ;  महिलांमध्ये हालेप, रायबाकिनाचे विजय 

,लंडन : ऑस्ट्रेलियाचा आघाडीचा टेनिसपटू निक किरियॉसने बुधवारी कारकीर्दीत प्रथमच ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्याने विम्बल्डन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत चिलीच्या ख्रिस्टियन...

पावसाळ्यात खाद्यपदार्थ दीर्घकाळ टिकवण्यासाठी काही टिप्स

मुंबई, 6 जुलै : पावसाळ्यात वातावरण गार आणि ओलसर असते. पावसाळ्याची (Rainy Season) मजा तर सर्वजण घेतात. मात्र पावसाळ्यात घरातील अन्न (Food Storage...

‘विठ्ठल’च्या निवडणुकीत सत्ताधारी भालके गटाला मोठा हादरा, 18 वर्षानंतर सत्तांतर; दिग्गज पराभूत

Vitthal Sahkari Sakhar Karkhana Election :  पंढरपूर तालुक्याचे आर्थिक सत्ताकेंद्र असणाऱ्या विठ्ठल सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी गेल्या 24...

बॉस असावी तर अशी; जीवतोड काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना स्वखर्चाने Bali ला नेत जिंकली मनं

मुंबई : कंटाळा आलाय... काय ते रोजरोजचं ऑफिसला या, 9 तास बसा, मरमर काम करा आणि थकूनभागून घरी जा, मजा नाहीये राव यात......

Todays Headline 7th July : आज दिवसभरात घडणाऱ्या महत्त्वाच्या बातम्या

मुंबई : ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम...

Pandharpur Ashadhi wari 2022 : ज्ञानोबांच्या पालखीचं आज तिसरं गोल रिंगण ABP Majha

<p>आषाढी एकादशी जवळ येऊ लागलेय तशी वारऱ्यांची पावलं वेगानं पंढरपूरकडे चालायला लागली आहेत... संत ज्ञानोबारायांची पालखी आज भंडीशेगाव येथे मुक्कामी असणार आहे. तत्पूर्वी...