Sunday, January 16, 2022
Home लाईफस्टाईल दररोज फक्त एक ब्लॅक कॉफी आरोग्यासाठी जादुई ठरेल! कधी, कशी घ्यायची जाणून...

दररोज फक्त एक ब्लॅक कॉफी आरोग्यासाठी जादुई ठरेल! कधी, कशी घ्यायची जाणून घ्या


दिल्ली, 27 नोव्हेंबर: अनेकांना कॉफी (Coffee) प्यायला आवडते. सकाळी झोपेतून उठल्यावर, ऑफिसमध्ये काम करताना किंवा थकल्यावर मेंदू आणि शरीराला पुन्हा तरतरी आणण्यासाठी कॉफी घेतली जाते. कॉफीमध्ये अनेक प्रकार आहेत. यात ब्लॅक कॉफीमध्ये (Black Coffee) कॅफिनव्यतिरिक्त शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स आढळतात. याचा उपयोग करून अनेक आजारांपासून आपला बचाव होऊ शकतो. एवढेच नाही, तर कॉफी मेंदूला चांगलं कार्य करण्यास मदत करते आणि भरपूर ऊर्जा देते. ‘हेल्थलाइन’मध्ये दिलेल्या माहितीनुसार, ब्लॅक कॉफीमध्ये असलेलं कॅफिन चयापचय क्रिया वाढवून शारीरिक कार्यक्षमता वाढवतं. तसंच यामध्ये मॅग्नेशियम, व्हिटॅमिन बी3, मॅंगनीज, पोटॅशियम, व्हिटॅमिन बी5, व्हिटॅमिन बी2 सुद्धा असतं. याचा फायदा आरोग्याला होतो.

ब्लॅक कॉफी पिण्याचे फायदे

नैराश्य कमी करते : चिंता, तणाव, जास्त झोप, डोकेदुखी आणि आळस या गोष्टी ब्लॅक कॉफीच्या सेवनाने कमी होतात. ब्लॅक कॉफीमध्ये असलेल्या कॅफिनमुळे मेंदू आणि मज्जासंस्था सक्रिय होतात. सुस्ती आणि आळस दूर करण्यासाठी ही कॉफी घेतली जाते.

तुम्ही खात असाल तूप-रोटी, पण हे महाशय खातात पानं आणि लाकडाचा भुसा

वजन कमी होतं : वजन कमी करण्यासाठी घरगुती उपचार म्हणजे ब्लॅक कॉफीचं सेवन. ब्लॅक कॉफीमध्ये आढळणाऱ्या कॅफिनमुळे चयापचय क्रिया वाढते. यामुळे ऊर्जा निर्मितीची प्रक्रिया सुधारते आणि शरीरात उष्णता निर्माण होते. याचा फायदा वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवण्यास होतो.

स्टॅमिना वाढवते : जिममध्ये जाऊन आल्यानंतर किंवा व्यायाम केल्यानंतर ब्लॅक कॉफीचं सेवन स्टॅमिना वाढवण्यासाठी खूप उपयुक्त आहे.

ब्लॅक कॉफी हृदयासाठीही चांगली : ब्लॅक कॉफी हृदयासाठीही चांगली असते. दररोज 1 किंवा 2 कप ब्लॅक कॉफी प्यायल्याने स्ट्रोकसह कोणत्याही प्रकारच्या हृदयविकाराचा धोका कमी होतो. परंतु त्यात साखर, दूध घालू नये.

या चुकीच्या सवयींमुळे तुम्ही कमी वयातच दिसता वृद्ध; आजच बदलायला हव्यात

ब्लॅक कॉफीच्या सेवनाने मधुमेहाचा धोका कमी : ब्लॅक कॉफीचं सेवन करून तुम्ही मधुमेहाला (Diabetes) दूर ठेवू शकता. मधुमेहाचा धोका कमी करण्यास ब्लॅक कॉफी मदत करते. तसंच ब्लॅक कॉफी शरीरात इन्सुलिन तयार करण्यास मदत करते. त्यामुळे मधुमेहाचा धोका कमी होतो.

अशी बनवायची ब्लॅक कॉफी (How To Make Black Coffee) –
पहिल्यांदा एका पातेल्यात पाणी घ्या आणि ते उकळा. पाणी उकळल्यानंतर त्यात एक चमचा ब्लॅक कॉफी पावडर घाला आणि एका कपमध्ये ओतून प्या.

कॉफी पिण्याची योग्य वेळ –
ब्लॅक कॉफीचं सेवन कधीही उपाशी पोटी करू नये. नाश्ता केल्यानंतर ही कॉफी घेऊ शकता.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#दररज #फकत #एक #बलक #कफ #आरगयसठ #जदई #ठरल #कध #कश #घययच #जणन #घय

RELATED ARTICLES

विकीच्या अनुपस्थितीत कतरिनाकडून बेडरूम सेल्फी शेअर, दिसली फक्त शर्टमध्ये

विकी कौशल आणि कतरिना कैफ यांचा विवाह नुकताच पार पडला. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार...

Carrot Benefits | हिवाळ्यात गाजर खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

 गाजर खाण्याचे (Carrot Benefits) अनेक फायदे आहेत.  अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली...

सक्तीच्या लसीकरणाचा निषेध असो! ‘या ‘देशातील जनता उतरलीय रस्त्यावर; वाचा सविस्तर

देशात सर्वांसाठी लसीकरण सक्तीचं असेल, असा कायदा सरकारने केला आणि त्याला विरोध करण्यासाठी जनता रस्त्यावर उतरली अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित...

Most Popular

Rohit Sharma on Virat Kohli: विराटने कर्णधारपद सोडल्यानंतर आली रोहित शर्माची प्रतिक्रिया; शेअर केला हा फोटो

नवी दिल्ली: विराट कोहलीने शनिवारी कसोटी संघाचे कर्णधारपद सोडले. विराटने आधी टी-२० संघाचे कर्णधारपद सोडले होते, त्यानंतर बीसीसीआयने त्याच्याकडून वनडे संघाचे कर्णधारपद काढून...

स्तनाचा कॅन्सर होऊ नये म्हणून वेळीच व्हा सावध; निशुल्क ही गोष्ट त्यावर प्रभावी

नवी दिल्ली, 16 जानेवारी : शरीरात कर्करोगाचा विकास आणि प्रसार आणि त्याच्या उपचारांविषयी जगभरात सतत अभ्यास चालू आहेत. या अभ्यासांमध्ये, रोग समजून घेण्याचे आणि...

VIDEO: ‘दो मस्ताने चले…’ ललित प्रभाकर आणि अमेय वाघचा मजेशीर रील

मुंबई, 16 जानेवारी-   मनोरंजन सृष्टीतील कलाकार सतत कोणत्या ना कोणत्या शूटिंगमध्ये व्यग्र असतात त्यांना जेव्हा मोकळा वेळ मिळेल तेव्हा ते सेटवर धम्माल...

“कोहली जेव्हा राजीनामा देतो तेव्हा समजावं की BBCIमधील ‘शाहजाद्यांचं’ राजकारण..”; उर्जा मंत्र्यांची प्रतिक्रिया

मोहम्मद शमीच्या पाठीशी विराट पहाडासारखा उभा राहिला होता, असेही उर्जा मंत्र्यांनी म्हटले आहे विराट कोहलीने भारतीय कसोटी संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. यावर...

Trolling नंतर नवीन गाणं रिलीज होताच गोविंदानं केला कमेंट सेक्शन ऑफ !

मुंबई, 15 जानेवारी- बॉलिवूडचा हिरो नंबर 1 म्हणून अभिनेता गोविंदाला ओळखले जाते. गोविंदाने 13 जानेवारीला ‘मेरे नाल’ (Govinda new song Mere Naal) हे...

‘डीआरएस’चा वाद आफ्रिकेसाठी लाभदायी -एल्गर

केप टाऊन : निर्णायक तिसऱ्या कसोटी सामन्यात पंच निर्णय आढावा प्रणालीने (डीआरएस) साथ न दिल्यामुळे भारतीय खेळाडूंचे लक्ष भरकटले आणि तेथूनच आफ्रिकेने वेगाने...