Friday, August 12, 2022
Home क्रीडा थेट शरद पवार अध्यक्ष असलेल्या संघटनेवर कारवाई; जाणून घ्या Inside Story

थेट शरद पवार अध्यक्ष असलेल्या संघटनेवर कारवाई; जाणून घ्या Inside Story


मुंबई: महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदे(Maharashtra Wrestling Council)वर बरखास्तीची कारवाई करण्यात आली आहे. या परिषदेचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) आहेत. ही कारवाई भारतीय कुस्ती महासंघाने केली असून त्याचे अध्यक्ष भाजपचे खासदार बृजभूषण सिंह आहेत. त्यामुळेच या कारवाईमागे राजकीय हेतू असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

राज्यात काही नुकत्यात झालेल्या सत्तासंघर्षात महाविकास आघाडीला सत्ता गमवावी लागली होती. त्यानंतर झालेल्या या कारवाईमुळे अनेकांना अश्चर्य वाटत आहे. जाणून घेऊयात राज्य कुस्तीगीर परिषदेवर ही कारवाई का झाली.

शरद पवार आणि भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांचे सलोख्याचे संबंध आहेत हे सर्वांना माहिती आहे. तरी देखील पवार अध्यक्ष असलेल्या संघटनेवर अशी कारवाई कशी काय होते असा प्रश्न सर्वांना पडलाय.

वाचा- पंतच्या शतकाने इंग्लंडचा अहंकार मोडला आणि जागा झाला ‘इंद्रानगरचा गुंड’

महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या कारभाराव गेल्या काही वर्षापासून आजी-माजी मल्ल तक्रार करतच होते. त्याच पुणे जिल्हा कुस्ती संघटना आघाडीवर होती. त्यांनी राज्य कुस्ती परिषदेच्या जमा खर्चावर प्रश्न चिन्ह उपस्थित केले होते. पुणे संघटनेने खर्चाची माहिती देण्याची मागणी केली होती पण ती देण्यास टाळाटाळ केली गेली.

१) गेल्या वर्षी झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत एका कंपनीचे प्रायोजकत्व स्विकारले गेले. याबाबत अनेकांना शंका आणि प्रश्न होते. या कंपनीसोबत झालेला करारनामा लपवला गेल्याने नाराजी आणखी वाढली. या स्पर्धेसाठी परिषदेचे सचिव बाळासाहेब लांडगे यांनी राज्य सरकारकडून ४३ लाख १८ हजाराचे अनुदान घेतले गेले आणि याबाबत सभासदांना अंधारात ठेवले गेले.

वाचा- पंत-जडेजाचा काऊंटर अटॅक; इंग्लंड गोलंदाजांना शिकवला चांगलाच धडा, असा केला पलटवार

२) परिषदेच्या कामकाजा बरोबर सचिव बाळासाहेब लांडगे यांनी वयाच्या ८४व्या वर्षी काम करणे, त्याचा मुलगा ललित लांडगे यांना कार्यालीन सचिव नियुक्त करणे यावर पुणे संघटनेने आक्षेप घेतला होता. तसेच संघटनेतील इतर कार्यकारणीवर आरोप केले जात होते.

३) पुणे संघटनेने लांडगे यांच्या विरोधात भर रस्त्यात आंदोलन केले. या आंदोलनानंतर पुणे संघटनेचे अध्यक्ष संदीप घोडवे यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. तसेच नोटीस न देता पुणे जिल्हा आणि शहर राष्ट्रीय तालीम संघाची संलग्नता रद्द करण्यात आली.

४) या प्रकरणी भारतीय महासंघाकडून आलेले आदेश परिषदेकडून डावलण्यात आले

वाचा- ऋषभ पंतच्या बर्मिंगहॅम शतकाची अनोखी कहाणी; जपली चार वर्षांपूर्वीची ‘परंपरा’

५) वार्षिक सर्वसाधारण सभा गोंधळाने स्थगित झाल्याचे भासवणे

६) खोटे प्रोसिडिंग लिहून सर्व विषयांना खोटी मंजुरी दाखवणे

तक्रारदार काय म्हणाले

परिषदेचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल आमची कोणतीही तक्रार नाही. पण सचिव बाळासाहेब लांडगे आणि त्यांच्या मुलाकडून भ्रष्टाचार सुरू आहे. याबाबत आम्ही चार दिवस उपोषण केले होते. तरी लांडगे यांनी त्याची दखल घेतली नाही. पवारांनी पुणे संघटनेवर कारवाई करू नका असे सांगितले असताना देखील लांडगे यांनी त्याला न जुमानता संलग्नता रद्द केली, असे तक्रारदार संदीप भोंडवे यांनी सांगितले.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#थट #शरद #पवर #अधयकष #असललय #सघटनवर #करवई #जणन #घय #Story

RELATED ARTICLES

आशिया खंडातील दुसऱ्या सगळ्यात मोठ्या होर्डिंगवर झळकलं दगडी चाळ 2 चं पोस्टर

मुंबई, 12 ऑगस्ट-   मराठी चित्रपटांची सध्या चांगलीच हवा दिसून येत आहे. नुकतंच 'चंद्रमुखी' या मराठी चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान चित्रपटाचं पोस्टर चक्क विमानावर झळकलं...

जगातील सर्वात प्राचीन भाषा अशी ओळख असलेल्या संस्कृत दिनाचा इतिहास काय? जाणून घ्या सविस्तर

World Sanskrit Day 2022 : हिंदू दिनदर्शिकेनुसार श्रावण (Shravan 2022) महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेच्या दिवशी संस्कृत दिवस साजरा केला...

सर्वसामान्य दाम्पत्याची ‘असामान्य’ कहाणी; दत्तक मुलीचा आज सर्वानाच अभिमान

गांधीनगर, 12 ऑगस्ट : अनेकजण विरोध झुगारुन असे काही निर्णय घेतात की कालांतराने ते समाजासाठी एक आदर्श उदाहरण बनतात. ही माणसं समाजात आपली...

Most Popular

पावसाळ्यात ओली गादी वाळवणे झालेय कठीण? या सोप्या टिप्स वापरून सुकवा गादी

बेडवरची गादी ओली झाली तर ती सुकवणे पावसाळ्यात सुकवणे अवघड काम असते. त्यासाठी आज आम्ही तुम्हाला अशाच काही टिप्स सांगत आहोत, ज्याच्या मदतीने...

राज्यातील विविध भागात पावसाची हजेरी, आज कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात यलो अलर्ट  

Maharashtra Rain Live Updates : सध्या राज्यात जोरदार पाऊस (Rain) कोसळताना दिसत आहे. अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आले आहेत. या पावसामुळं काही...

‘छोटू भैय्या तू बॅट बॉल खेळ’; पंत आणि उर्वशीमध्ये जोरदार जुंपली

Urvashi Rautela Reply On Rishabh Pant- प्रसिद्ध क्रिकेटपटू ऋषभ पंत याने इन्स्टाग्राम स्टोरीवर उर्वशीचं नाव न घेता, 'ए बहीण माझा पाठलाग सोड' अशी...

प्रफुल्ल पटेल तुमच्यामुळे हे सर्व घडतंय; ‘फिफा’ची भारताला धमकी, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

नवी दिल्ली-सध्या भारतीय फुटबॉलमध्ये तणावाचे वातावरण आहे. मैदानात फुटबॉल संघ जागतिक स्तरावर खूप मागे आहे, पण देशाचा फुटबॉल चालवणाऱ्या संस्थांमध्येही गोंधळ सुरू आहे....

पालक आणि मुलांच्या नात्यात ‘या’ 5 गोष्टीमुळे पसरते विष

Clues a Relationship With a Parent Is Toxic : प्रत्येक पालकांना आपल्या मुलांसोबत एक खास नातं हवं असतं. त्यासाठी ते प्रयत्नशील देखील असतात....

पुणे, कोल्हापूरसह राज्यात अनेक ठिकाणी पावसाची हजेरी, आज कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात यलो अलर्ट

Maharashtra Rain : सध्या राज्यात जोरदार पाऊस (Rain) कोसळताना दिसत आहे. अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आले आहेत....