पीटीआय, बँकॉक : दोन ऑलिम्पिक पदकविजेत्या पी. व्ही. सिंधूने गुरुवारी कोरियाच्या सिम यू जिनला नमवून थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतील महिला एकेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठली. किदम्बी श्रीकांत, मालविका बनसोडसह अन्य खेळाडूंचे आव्हान संपुष्टात आल्यामुळे आता भारताच्या आशा एकमेव सिंधूवर अवलंबून आहेत.
सहाव्या मानांकित सिंधूने कोरियाच्या उबर चषक जेतेपदात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सिम यू जिनचा ३७ मिनिटांत २१-१६, २१-१३ असा पराभव केला. सिंधूने सलामीच्या सामन्यात अमेरिकेच्या लॉरेन लॅमला नामोहरम केले होते.
जागतिक क्रमवारीत सातव्या क्रमांकावरील सिंधूची उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या द्वितीय मानांकित अकाने यामागुचीशी गाठ पडणार आहे. यामागुचीने कोरियाच्या किम गा ईऊनला २१-२३, २१-१५, २१-१६ असे पराभूत केले. सिंधू यामागुची हिचा २३व्या लढतीत सामना करणार आहे. आतापर्यंत झालेल्या लढतींमध्ये सिंधूने १३-९ अशी विजयी आघाडी घेतली आहे. याआधी आशियाई अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीत यामागुचीने पहिला गेम गमावल्यानंतर सिंधूविरुद्ध सामना जिंकण्याची किमया साधली होती. महिला एकेरीत बनसोडने डेन्मार्कच्या लिने ख्रिस्टोफरसनशी झालेल्या सामन्यात २१-१६, १४-२१, १४-२१ असा पराभव पत्करला.
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]
#थयलड #खलबडमटन #सपरध #सध #उपतयपरव #फरत #आज #यमगचच #आवहन #Thailand #Open #Badminton #Tournament #Indus #semifinals #Yamaguchi #challenge #today #ysh