Thursday, May 26, 2022
Home भारत त्रिपुराच्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामा, भाजपकडून विनोद तावडेंना मोठी जबाबदारी

त्रिपुराच्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामा, भाजपकडून विनोद तावडेंना मोठी जबाबदारी


अगरतला, 14 मे : त्रिपुरा राज्यातील राजकीय घडामोडींना (Tripura Politics) प्रचंड वेग आला आहे. त्रिपुराचे मुख्यमंत्री विप्लव देव यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा (Biplab Deb resign) दिला आहे. विशेष म्हणजे त्रिपुरा विधानसभेचा कालावधी संपायला अजून एक वर्षाचा कालावधी शिल्लक आहे. तरीही विल्पव देव यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप 2023 च्या त्रिपुरा विधानसभा निवडणुकीच्या तयारीत लागली आहे. आगामी निवडणुकीत मुख्यमंत्रीपदाचा दावेदार विप्लव देव नाही तर दुसऱ्या नेत्याला देण्याचा भाजपचा मानस आहे. त्यातूनच विप्लव देव यांना आपल्या पदावरुन पायउतार व्हावं लागलं आहे.

या सगळ्या घडामोडी वेगाने घडत असताना आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. भाजपने त्रिपुरातील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे (Vinod Tawade) यांना महत्त्वाची जबाबदारी दिली आहे. भाजपने विप्लव देव यांच्या राजीनाम्यानंतर विनोद तावडे आणि राज्यसभेचे खासदार भूपेंद्र यादव यांना त्रिपुरातील पक्षीय घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी ऑब्जर्व्हर म्हणून नियुक्त केलं आहे.

विप्लव देव यांनी दोन दिवसांपूर्वीच दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज त्यांनी राजीनामा दिला. देव यांनी राजीनामा दिल्यानंतर आपली भूमिका मांडली. हायकमांडने माझ्यावर विश्वास ठेवला होता. आता राजीनामा देण्यास सांगितलं. त्यामुळे मी राजीनामा दिला आहे. याबाबत मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत चर्चा केलीय. त्यांनी निवडणुकीला अजून वेळ आहे, असं सांगितलं. तसेच 2023 च्या निवडणुकीच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर नव्या मुख्यमंत्र्याची घोषणा केली जाईल, असंही देव म्हणाले.

(‘शरद पवारांसोबत आमचे मतभेद जरुरु, पण विकृतीला वेळीच आवर घाला’, राज ठाकरेंकडून निषेध व्यक्त)

त्रिपुरामध्ये 2018 साली भाजप सरकार स्थापन झालं होतं. त्यावेळी विप्लव देव यांना मुख्यमंत्रीपदाची जबाबादारी देण्यात आली होती. मुख्यमंत्री बनल्यानंतर देव हे त्यांच्या विविध वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत यायचे. या दरम्यान गेल्या महिन्यात त्रिपुरातील भाजपच्या 14 आमदारांनी हायकमांडकडे मुख्यमंत्र्यांची तक्रार केली होती. पण त्यावेळी काही निर्णय घेण्यात आला नव्हता, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

विनोद तावडे राज्यसभेवर जाणार?

दरम्यान, विनोद तावडे यांच्याबाबत राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरु आहेत. विनोद तावडे यांना विधानसभा निवडणुकीच्यावेळी पक्षाकडून संधी दिली गेली नाही. पण त्यानंतर त्यांना पक्षबांधनीच्या कामाची जबाबदारी दिली गेली. तावडे आपलं काम चोखपणे पार पाडत असल्याने आता पक्षाकडून त्यांना आणखी एक महत्त्वाची जबाबदारी दिली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विनोद तावडे राज्यसभेवर जाणार आहेत. पण याबाबत विनोद तावडे यांना आम्ही प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी आपली भूमिका मांडली. “माझा राज्यसभेवर जाण्यासंदर्भात कोणताही विचार नाही. त्याप्रकारची कोणतीही चर्चा पक्ष नेतृत्वाशी झालेली नाही. मला सध्या जी संघटनात्मक जबाबदारी दिली आहे ती मी पार पाडतोय”, अशी प्रतिक्रिया विनोद तावडे यांनी ‘न्यजू 18 लोकमत’ला दिली.

तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)

महाराष्ट्र

महाराष्ट्र

Published by:Chetan Patil

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#तरपरचय #मखयमतरयच #रजनम #भजपकडन #वनद #तवडन #मठ #जबबदर

RELATED ARTICLES

IPL : मॅचवेळी मैदानात घुसला प्रेक्षक, पोलिसांनी पकडताच विराटने दिली अशी रिएक्शन

मुंबई, 26 मे : आयपीएल 2022 च्या (IPL 2022) एलिमिनेटरचा सामना बुधवारी आरसीबी आणि लखनऊ सुपर जाएंट्स (RCB vs LSG) यांच्यात झाला, या...

शेंगदाणा की सूर्यफूल? कोणतं खाद्यतेल आहे शरीरासाठी सर्वात चांगलं आणि का?

मुंबई, 26 मे : भारतातील खाद्यसंस्कृती खूप भव्य आणि विस्तृत आहे. आपल्याकडे अतिशय वैविध्यपूर्ण पदार्थ बनवले जातात. प्रत्येक संस्कृतीतील लोकांच्या अन्नपदार्थ बनवण्याच्या पद्धती...

‘हा लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार’, संयमी एकनाथ शिंदे भडकले

मुंबई, 26 मे : शिवसेनेचे (Shiv Sena) ठाण्यातील बडे नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी परिवहन मंत्री अनिल परब...

Most Popular

VIDEO : शिखर धवनला वडिलांनी बदडले, पंजाब Playoff मध्ये न गेल्यानं काढला राग!

मुंबई, 26 मे : पंजाब किंग्जला (Punjab Kings) या आयपीएल स्पर्धेची 'प्ले ऑफ' गाठण्यात अपयश आले. पंजाबच्या टीमनं काही चमकदार विजय मिळवत शेवटच्या...

Anil Parab ED Raid in Pune : अनिल परब छापेमारीचं पुणे कनेक्शन आहे तरी काय?

<p>Anil Parab ED Raid in Pune : अनिल परब छापेमारीचं पुणे कनेक्शन आहे तरी काय? दापोली रिसॉर्टसाठी पुण्यातील विभास साठेंकडून जमीन खरेदी</p> अस्वीकरण: ही...

पुण्यात NCP-BJPमधील वाद गुद्द्यावर!राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला भाजप कार्यकर्त्यांकडून मारहाण

Pune Crime Latest News : पुण्यात राष्ट्रवादी-भाजपातला वाद आता गुद्द्यावर आला आहे. कारण पुण्यातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अप्पा जाधव...

सरनाईक, राऊत अन् परब…; आतापर्यंत शिवसेनेचे कोणते नेते ईडीच्या रडारवर?

Maharashtra And ED Conection : गेल्या काही दिवसांपासून राज्यात राज्य सरकार विरुद्ध केंद्रीय तपास यंत्रणा हा सामना रंगल्याचं...

Sunburn घालवायचाय? ‘हे’ उपाय करून मिळवा Skin Tanning पासून सुटका

मुंबई : उन्हाळ्यामध्ये म्हणा, किंवा साधं उन्हाच्या वेळांमध्ये फिरल्यामुळे म्हणा. त्वचा काळवंडते आणि मग नकळतच आपण या गोष्टीचाही ताण घेतो. शरीराचे जे भात...