Saturday, May 21, 2022
Home भारत त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देव यांचा राजीनामा, नवीन मुख्यमंत्री निवडले जाणार

त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देव यांचा राजीनामा, नवीन मुख्यमंत्री निवडले जाणार


Biplab Kumar Deb Resign: त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देब यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा राज्यपाल सत्यदेव नारायण आर्य यांच्याकडे सुपूर्द केला आहे. राजीनामा दिल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, पक्षाचा निर्णय आपल्यासाठी सर्वोपरि आहे. हायकमांडच्या सांगण्यावरून त्यांनी आपले पद सोडले आहे. नवीन मुख्यमंत्री कोण होणार या प्रश्नावर त्यांनी कोणतेही उत्तर दिलेले नाही.

बिप्लव देब यांच्याबाबत संघटनेत होती नाराजी 

मिळालेल्या माहितीनुसार, त्रिपुरा भाजप संघटनेत बिप्लव देब यांच्याबाबत नाराजी आहे. यामुळेच दोन आमदारांनीही पक्ष सोडला होता, असं सांगण्यात येत आहे. विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीबाबत भाजपला कोणताही धोका पत्करायचा नाही. राज्यात पुढील वर्षी 2023 मध्ये निवडणुका होणार असल्याची माहिती आहे. गुजरातच्या धर्तीवर त्रिपुरामध्ये मंत्री ते संघटनेत मोठे फेरबदल होऊ शकतात. राजीनामा दिल्यानंतर ते संघटनेत कोणते पद स्वीकारणार हे अद्याप कळू शकले नाही.

सायंकाळी भाजप विधिमंडळ पक्षाची होणार बैठक

बिप्लव देब यांच्या राजीनाम्यानंतर आज सायंकाळी भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे, अशी माहिती मिळत आहे. या बैठकीत नव्या मुख्यमंत्र्यांबाबत चर्चा होऊ शकते. 2018 मध्ये बिप्लब देब यांनी मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारली होती. त्रिपुरामध्ये पुढील वर्षी विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. अशा स्थितीत निवडणुकीपूर्वी पक्ष बळकट करण्यासाठी भाजपने राज्याची धुरा नव्या चेहऱ्याकडे सोपवण्याचा पवित्रा घेतल्याचे मानले जात आहे.

कोण होणार नवीन मुख्यमंत्री? 

बिप्लब देब यांच्या राजीनाम्यानंतर आता नव्या मुख्यमंत्र्यांची चर्चा जोर धरू लागली आहे. विधिमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर नव्या चेहऱ्यावर शिक्कामोर्तब होईल. मात्र भाजप त्रिपुराची धुरा विद्यमान उपमुख्यमंत्री जिष्णू देव वर्मा यांच्याकडे सोपवू शकते, असे सांगण्यात येत आहे. याशिवाय आणखी काही नावांचीही चर्चा आहे. ज्यामध्ये माणिक साहा आणि प्रतिमा भौमिक यांच्या नावाचाही समावेश आहे. मात्र या सर्वांमध्ये जिष्णु देव वर्मा यांचे नाव सर्वात पुढे असल्याचे सांगण्यात येत आहे. 

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#तरपरच #मखयमतर #बपलब #दव #यच #रजनम #नवन #मखयमतर #नवडल #जणर

RELATED ARTICLES

नवाब मलिकांचं मंत्रिपद वाचवण्यासाठी उद्धव ठाकरेंची भागीदारी; किरीट सोमय्यांचा घणाघात

BJP Leader Kirit Somaiya On Nawab Malik : राष्ट्रवादी (NCP) नेते आणि मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांचे...

”भारतातील परिस्थिती चांगली नाही”,लंडनमध्ये जाऊन राहुल गांधींचा BJP वर हल्लाबोल

लंडन, 21 मे: काँग्रेस (Congress) पक्षाची सध्याची स्थिती फारशी चांगली नाही. गुजरातमध्ये तर विधानसभा निवडणुकीपूर्वी अनेक नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकण्यास सुरुवात केली आहे....

आता Traffic पोलीस थांबवू शकणार नाहीत Car, चेकिंगही करणार नाही; काय आहे नवा आदेश

नवी दिल्ली, 21 मे : जर तुम्ही कार चालवत असाल, तर तुमच्यासाठी ही बातमी (Car Driving) महत्त्वाची आहे. सरकारने ट्रॅफिकबाबत नवे नियम लागू...

Most Popular

Rahul Gandhi in London : भाजपनं देशात चोहीकडे रॉकेल ओतलंय, राहुल गांधी यांची BJP आणि RSS वर टीका

<p>Rahul Gandhi in London : भाजपनं देशात चोहीकडे रॉकेल ओतलंय, राहुल गांधी यांची BJP आणि RSS वर टीका</p> अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक...

लग्नाला जाण्याआधीच काळाचा घाला, भीषण अपघातात एकाच कुटुंबातील 6 जण ठार

बलरामपूर, 21 मे: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) बलरामपूर (Balrampur District) जिल्ह्यात महिंद्रा बोलेरो आणि ट्रॅक्टर-ट्रॉली यांच्यात भीषण टक्कर झाल्याची घटना समोर आली आहे....

Amazon Tablet: अवघ्या ५ हजार रुपये सुरुवाती किंमतीत Amazon चे शानदार टॅबलेट्स लाँच, जाणून घ्या फीचर्स

नवी दिल्ली : Amazon Fire 7 Tablet Launched: Amazon ने आपल्या नवीन टॅबलेटला लाँच केले आहे. कंपनीला कमी किंमतीत दमदार टॅबलेट्ससाठी ओळखले जाते....

नवाब मलिकांचं मंत्रिपद वाचवण्यासाठी उद्धव ठाकरेंची भागीदारी; किरीट सोमय्यांचा घणाघात

BJP Leader Kirit Somaiya On Nawab Malik : राष्ट्रवादी (NCP) नेते आणि मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांचे...

Flood News : अरे बापरे! 2251 गावे पुराच्या पाण्याखाली, 7.12 लाख लोक प्रभावित

गुवाहाटी : Asaam Flood : आसाममध्ये धोधो पाऊस कोसळला. यामुळे मोठा पूर आला आणि हजारो घरे पुराच्या पाण्यााखाली गेलीत. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन...

Lal Mahal Lawani : लाल महालात चंद्रा गाण्यावर रिल्सचं शुट

Lal Mahal Lawani : पुण्याच्या लाल महालात लावणी सादर केल्यामुळे गुन्हा दाखल झाला आहे. फरासखाना पोलीस ठाण्यात  चौघांविरुद्ध...