Saturday, May 21, 2022
Home भारत त्या बिकट क्षणी मुलाने पुढे येत वाचवला आईचा जीव, जन्मदात्रीला दिलं हे...

त्या बिकट क्षणी मुलाने पुढे येत वाचवला आईचा जीव, जन्मदात्रीला दिलं हे खास ‘Gift’


नवी दिल्ली, 14 मे : आई मुलाला जीवन देते, हे सत्य जगात सर्वांना माहीत आहे. मात्र, एका घटनेत मुलाने आईचा जीव वाचवत तिला जीवनदान दिलं आहे. 25 वर्षीय मुलाने आईचे प्राण वाचवण्यासाठी स्वतःचा जीव पणाला लावला. किडनी निकामी झाल्यामुळे आईची प्रकृती खूपच गंभीर झाली होती. तिला दैनंदिन कामही करता येत नव्हते. किडनी प्रत्यारोपण हा एकमेव उपचार होता. अशा परिस्थितीत मुलाने किडनी दान (Kidney donation) करून आईचे प्राण वाचवले (son saved mothers life). आईसाठी यापेक्षा चांगली भेट कोणती असू शकते, ज्या मुलाला तिने जन्म दिला, त्या मुलाने तिचे प्राण वाचवले.

पिया मुखर्जी या 45 वर्षीय महिलेवर दिल्लीतल्या आकाश हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. युरोलॉजी विभागाचे एचओडी डॉ विकास अग्रवाल यांनी सांगितलं की, महिलेला काही दिवसांपासून पायात दुखत होते. त्या थकल्या होत्या आणि वजन कमी होत होतं. औषधानेही काम केले पण त्याचा त्रास काही कमी झाला नाही. तपासणीअंती महिलेची किडनी निकामी झाली असून ती अंतिम टप्प्यात असल्याचे आढळून आले. आईची ही अवस्था पाहून फक्त मुलगाच किडनी दानासाठी पुढे आला. डॉक्टरांनी सांगितलं की, या प्रकरणात आईने अविवाहित मुलाकडून किडनी घेणं ही अत्यंत दुर्मिळ घटना आहे.

हे वाचा – LeT च्या दहशतवाद्याला अटक; सुरक्षा दल, VIP वर हल्ला करण्याचा आखत होता कट

मुलाकडून किडनी मिळाल्यानंतर आईने सांगितलं की, मी व्यवसायाने नृत्यांगना असून किडनी निकामी झाल्यामुळे पुन्हा नृत्याचे दिवस येण्याच्या आशाच मावळली होती. आई असल्यामुळे माझ्या मुलाकडून किडनी मिळवणं हा माझ्यासाठी सोपा निर्णय नव्हता, पण किडनी दान करण्याबाबत तो अगदी ठाम होता. त्याने इतर सर्वांचं म्हणणं डावलून मला कि़डनी देण्याचा निर्णय़ घेतला. कारण त्याला माझा जीव वाचवायचा होता, माझा जीव वाचवणे ही त्याची प्राथमिकता होती. मुलगा अभिनव मुखर्जी म्हणाला की, माझ्यासाठी माझ्या आईचा जीव वाचवण्यापेक्षा काहीही महत्त्वाचं नाही.

हे वाचा – तरुणीवर अ‍ॅसिड हल्ला करून पोलिसांपासून बचावासाठी बनला साधू, अशी झाली पोलखोल

देशात लाइव्ह डोनेशनमध्ये (जिवंतपणी अवयवदान) मुली किंवा महिला नेहमीच पुढे असतात. सुमारे 75% दाते महिला आहेत. आई-वडिलांचे प्राण वाचवण्यासाठी फार कमी तरुण मुलं अवयव दान करण्यासाठी पुढे येतात.

Published by:Digital Desk

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#तय #बकट #कषण #मलन #पढ #यत #वचवल #आईच #जव #जनमदतरल #दल #ह #खस #Gift

RELATED ARTICLES

नवाब मलिकांचं मंत्रिपद वाचवण्यासाठी उद्धव ठाकरेंची भागीदारी; किरीट सोमय्यांचा घणाघात

BJP Leader Kirit Somaiya On Nawab Malik : राष्ट्रवादी (NCP) नेते आणि मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांचे...

”भारतातील परिस्थिती चांगली नाही”,लंडनमध्ये जाऊन राहुल गांधींचा BJP वर हल्लाबोल

लंडन, 21 मे: काँग्रेस (Congress) पक्षाची सध्याची स्थिती फारशी चांगली नाही. गुजरातमध्ये तर विधानसभा निवडणुकीपूर्वी अनेक नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकण्यास सुरुवात केली आहे....

आता Traffic पोलीस थांबवू शकणार नाहीत Car, चेकिंगही करणार नाही; काय आहे नवा आदेश

नवी दिल्ली, 21 मे : जर तुम्ही कार चालवत असाल, तर तुमच्यासाठी ही बातमी (Car Driving) महत्त्वाची आहे. सरकारने ट्रॅफिकबाबत नवे नियम लागू...

Most Popular

माणसांपेक्षाही संवेदनशील हत्ती, मृत्यूनंतरही एकटं सोडत नाही; रिसर्चमधून खुलासा

या हत्तींकडून माणसानं शिकायला हवं... जिवंतपणीच नाही तर मृत्यूनंतरही कशी साथ निभावायची अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या...

Rahul Gandhi in London : भाजपनं देशात चोहीकडे रॉकेल ओतलंय, राहुल गांधी यांची BJP आणि RSS वर टीका

<p>Rahul Gandhi in London : भाजपनं देशात चोहीकडे रॉकेल ओतलंय, राहुल गांधी यांची BJP आणि RSS वर टीका</p> अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक...

नवाब मलिकांचं मंत्रिपद वाचवण्यासाठी उद्धव ठाकरेंची भागीदारी; किरीट सोमय्यांचा घणाघात

BJP Leader Kirit Somaiya On Nawab Malik : राष्ट्रवादी (NCP) नेते आणि मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांचे...

Cannes महोत्सवाला गालबोट; विवस्त्र महिलेच्या आक्रोशानं रेड कार्पेट हादरलं

मुंबई : (Cannes) साऱ्या कलाजगताची नजर लागून राहिलेल्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये भारतासोबतच जगभरातील बऱ्याच सेलिब्रिटींनी हजेरी लावली. जिथं एकिकडे सर्व सेलिब्रिटी फॅशनचे नवनवीन...

सध्या घराघरात ‘आई’ म्हणून ओळखली जातेय; सांगू शकाल हा कोण आहे की सुंदर अभिनेत्री?

मुंबई, 20 मे : सेलिब्रिटी आपल्या सोशल मीडियावर आपले बरेच फोटो, व्हिडीओ शेअर करत असतात. कुणी आपल्या फिल्म्सचं, सीरिअल्सचं प्रमोशन करतं. कुणी आपल्या...