Monday, July 4, 2022
Home करमणूक 'तो ब्रिटिश नागरिक आहे, फरार होऊ शकतो' राज कुंद्राच्या जामिनाला मुंबई पोलिसांचा...

‘तो ब्रिटिश नागरिक आहे, फरार होऊ शकतो’ राज कुंद्राच्या जामिनाला मुंबई पोलिसांचा विरोध


हायलाइट्स:

  • राज कुंद्राच्या जामीन याचिकेची सुनावणी पुढे ढकलली
  • राज कुंद्राच्या जामीन याचिकेला मुंबई पोलिसांनी केला विरोध
  • मुंबई पोलिसांनी वर्तवली राज कुंद्रा फरार होण्याची शक्यता

मुंबई: पॉर्न फिल्म प्रकरणात अडकलेला बिझनेसमन राज कुंद्राच्या जामिन याचिकेवर मुंबई सत्र न्यायलयानं १० ऑगस्टची सुनावणी २० ऑगस्टपर्यंत पुढे ढकलली आहे. राज कुंद्राच्या जामीन याचिका सुनावणीच्या वेळी मुंबई पोलिसांनी सांगितलं, राज कुंद्राला जामीन मिळाल्यास समाजात चुकीचा संदेश जाईल. एवढंच नाही तर पोलिसांनी असं देखील म्हटलं आहे की, जर राज कुंद्राला सोडण्यात आलं तर तो परत तोच गुन्हा करू शकतो किंवा देश सोडून फरार होऊ शकतो.

राज कुंद्राला सध्या आर्थर रोड तुरुंगात ठेवण्यात आलं आहे. त्यानं आपल्या जामिनाच्या याचिकेत म्हटलं आहे की, ‘पोलिसांनी एप्रिल महिन्यात जी चार्जशीट फाइल केली होती. त्यात माझं नाव नव्हतं. तसेच कोणत्याही केस संबंधी एफआयआरमध्ये माझं नाव नव्हतं.’ याशिवाय या याचिकेत, पोलिसांच्या जुन्या चार्जशीटमध्ये ज्या लोकांची नावं होती ते जामिनावर बाहेर आहेत आणि मजिस्ट्रेट कोर्टानं मात्र राज कुंद्राची जामीन याचिका फेटाळून चूक केली आहे. असं म्हणण्यात आलं आहे.

Pornography Case: शर्लिन चोप्राच्या जबाबाचा राज कुंद्राच्या जामिन अर्जावर पडणार फरक?

राज कुंद्राच्या जामीन याचिकेवर झालेल्या सुनावणीत सत्र न्यायालयात मुंबई पोलिसांनी म्हटलं, ‘हे सर्व गुन्हे खूपच गंभीर आहेत आणि यावर पोलीस अधिक तपास करत आहेत. सर्व व्हिडीओ कुठून अपलोड करण्यात आले होते याचा शोध घेतला जात आहे. जर आरोपीला जामीन मिळाला तर हे गुन्हा परत घडू शकतात. ज्यामुळे समाजाला चुकीचा संदेश जाईल.’ राज कुंद्राच्या जामिनाला विरोध करताना पोलीस पुढे म्हणाले, ‘आरोपी राज कुंद्रा फरार आरोपी प्रदीप बख्शीचा नातेवाईक आहे आणि जामिनावर तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर त्याच्याशी संपर्क साधून पुरावे नष्ट करू शकतो.’

पॉर्न व्हिडिओ प्रकरणी राज कुंद्राला झालेल्या अटकेनंतर कुठे गायब आहे शिल्पा शेट्टी?

राज कुंद्राच्या जामीन याचिकेला विरोध करताना पोलीस म्हणाले, ‘राज कुंद्रा भारतीय नाही तर ब्रिटिश नागरिक आहे. जर त्याला जामीन मिळाला तर तो देश सोडून फरार होऊ शकतो. असं झालं तर त्याला पुन्हा पकडणं कठीण होऊ शकतं. ही गोष्टही नाकारता येत नाही की हे व्हिडीओ भारताबाहेरही अपलोड झालेले आहेत. कारण राज कुंद्राची ओळख खूप दूरपर्यंत आहे. तसेच त्याच्यावर आरोप करणाऱ्या महिला खूप गरीब आहेत त्यामुळे तो आपल्या पॉवरचा वापर करून सर्व पुरावे नष्ट करू शकतो.’



अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#त #बरटश #नगरक #आह #फरर #हऊ #शकत #रज #कदरचय #जमनल #मबई #पलसच #वरध

RELATED ARTICLES

4th July 2022 Important Events : 4 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

4th July 2022 Important Events : जुलै महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व...

लातूरची सून टीना डाबीच्या अडीच महिन्याच्या संसारानंतर Ex नवऱ्याचीही लगीनघाई

नवी दिल्ली, 3 जुलै : Athar Amir khan Second marriage : आयएएस टीना डाबी (Tina Dabi) यांच्या दुसऱ्या लग्नाची जोरदार चर्चा होती. टीना डाबी...

तरुणीमुळे दोन मित्रांमध्ये पडली फूट; वाद इतका वाढला की, जिवलग मित्रावर झाडल्या..

यमुनानगर, 3 जुलै : मित्रांमध्ये भांडणाच्या घटना होत (Fighting in Friends) असतात. मात्र, तरीसुद्धा मैत्री ही काय राहते. मात्र, हरियाणा राज्यातील पंचकुला (Pandhkula...

Most Popular

पाचव्या टेस्टवर टीम इंडियाची पकड, बॉलर्सच्या धमाक्यामुळे 132 रनची आघाडी

एजबॅस्टन, 3 जुलै : इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टेस्ट मॅचवर टीम इंडियाची (India vs England 5th Test) पकड आणखी मजबूत झाली आहे. मॅचच्या तिसऱ्या दिवशी...

स्टोक्सला मिळाल्या दोन लाईफलाईन, पण लॉर्ड ठाकूरने केलं काम तमाम! Video

एजबॅस्टन, 3 जुलै : भारत आणि इंग्लंड (India vs England 5th Test) यांच्यातल्या पाचव्या टेस्टच्या तिसऱ्या दिवशी बेन स्टोक्स (Ben Stokes) आणि जॉनी...

ब्रेस्ट मिल्क विक्रीमुळे कंपनी वादात? आईचं दूध विकणारी आशियातील पहिलीच कंपनी

नवी दिल्ली, 3 जुलै : पैशाने बाजारात सगळं मिळतं, पण आई मिळत नाही, असं मराठीत म्हटलं जातं. मात्र, आई मिळत नसली तरी तिचं...

लातूरची सून टीना डाबीच्या अडीच महिन्याच्या संसारानंतर Ex नवऱ्याचीही लगीनघाई

नवी दिल्ली, 3 जुलै : Athar Amir khan Second marriage : आयएएस टीना डाबी (Tina Dabi) यांच्या दुसऱ्या लग्नाची जोरदार चर्चा होती. टीना डाबी...

IND vs ENG : पुजाराचं अर्धशतक, पंतची साथ, भारताला 257 रनची मोठी आघाडी

एजबॅस्टन, 3 जुलै : इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टेस्टच्या तिसऱ्या दिवसाअखेरीस भारताचा (India vs England 5th Test) स्कोअर 125/3 एवढा झाला आहे, त्यामुळे टीम इंडियाची...

Todays Headline 4th July : आज दिवसभरात घडणाऱ्या राष्ट्रीय आणि स्थानिक महत्त्वाच्या बातम्या

मुंबई: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या सर्व घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत...