Saturday, July 2, 2022
Home भारत 'ते' भयंकर 151 सेकंद! बैलाने महिलेला पायाखाली अक्षरश: तुडव तुडव तुडवलं; Shocking...

‘ते’ भयंकर 151 सेकंद! बैलाने महिलेला पायाखाली अक्षरश: तुडव तुडव तुडवलं; Shocking video


अहमदाबाद, 10 ऑगस्ट : बैल (Bull) हा पाळीव प्राणी असला तरी तो चवताळला तर त्याच्यासमोर येणाऱ्याचं काही खरं नाही. सध्या अशाच एका बैलाच्या हल्ल्याचा (Bull attack)  व्हिडीओ (Bull attack video) व्हायरल  झाला आहे. ज्यात बैलाने एका महिलेवर हल्ला केला (Bull attack on woman) आहे. बैलाने महिलेला आपल्या पायांखाली अक्षरशः तुडव तुडव तुडवलं आहे.
गुजरातच्या जामनगरमध्ये बैलाने महिलेवर भयंकर हल्ला केला आहे (Bull attack on woman in gujrat).  बैलाच्या या हल्ल्याचा व्हिडीओ पाहून अंगावर अक्षरशः काटा येईल, हृदयाची धडधड वाढले. बैल महिलेवर हल्ला करतच राहतो. तिला तुडवत राहतो. इतर लोकांनाही तो जुमानत नाही. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

व्हिडीओत पाहू शकता एक महिला रस्त्याने जात होती. तेव्हा तिथं तिच्यासमोर एक बैल आला. सुरुवातीला बैल तिच्याकडे पाहत उभा राहिला. महिलेने त्याच्याकडे पाहिलं तेव्हा बैल रागात आहे आणि तो आपल्यावर हल्ला करण्याच्या तयारीत आहे हे तिला समजलं. त्यामुळे ती तिथून पळ काढू लागली.
हे वाचा – VIDEO – भुंकत धावत आले कुत्रे आणि…; सिंह, अस्वल बनून घाबरवणं पडलं महागात
पण बैलाने तिचा पाठलाग केला. बैल तिच्यामागे पळत सुटला. त्याने तिला गाठलं आणि तिच्यावर हल्ला केला. ज्या जागेवरून महिला पळत गेली तिथंच त्या बैलाने तिला मारत परत आणलं. सुरुवातीला तो तिला आपल्या शिंगांनी आणि नंतर पायांनी मारताना दिसतो आहे. भिंतीच्या कडेला एक बाईक उभी आहे, त्या बाईकच्या जवळ भिंतीच्या कडेला बैल तिला मारत नेतो. त्यानंतर तो तिला तसंच मारत रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला घेऊन जातो.
महिला जीवाच्या आकांताने ओरडते. मदतीसाठी याचना करते. तिचा आरडाओरडा ऐकून एक तरुणी तिथं धावत येते. ती त्या महिलेला बैलाच्या तावडीतून सोडवण्याचा प्रयत्न करते. पण बैल तिलासुद्धा ढकलून देतो. महिलेला वाचवण्याचा तरुणीचा प्रयत्न कितीतरी वेळा अपयशी होतो. शेवटी ती कुणालातरी बोलवण्यासाठी जाते. इतक्यात तिथं काही आणखी लोक जमा होतात.  लोक त्या बैलाला मारून त्याला बाजूला हटवण्याचा प्रयत्न करतात. पण बैल इतक्या माणसांनाही घाबरत नाही तो महिलेला काही सोडत नाही. शेवटी तिथून गेलेली एक तरुणी आणखी काही माणसांना आणते आणि हातात एक काठी घेऊन येते. ज्याने ती बैलाला मारून त्याला बाजूला करण्याचा प्रयत्न करते.
हे वाचा – VIDEO – थेट म्हशीलाच उचलायला गेला पण…; स्वतःला बाहुबली समजणाऱ्या तरुणाची फजिती
कसंबसं करून महिलेला त्या बैलाच्या तावडीतून सोडवलं जातं. महिलेची अवस्था बैलाने अत्यंत भयंकर केली आहे. महिलेची हालचालही होत नाही आहे. ती गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#त #भयकर #सकद #बलन #महलल #पयखल #अकषरश #तडव #तडव #तडवल #Shocking #video

RELATED ARTICLES

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासोबतच हँड सॅनिटायझरचा इतक्या कामांसाठी करा स्मार्ट उपयोग

मुंबई, 02 जून : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आपण हँड सॅनिटायझर वापरतो. सॅनिटायझरमुळे आपल्याला कोणत्याही प्रकारच्या संसर्गापासून वाचवण्यास मदत होते. कोरोनामुळे अलिकडे सर्वांना सॅनिटायझरचे...

भीषण भूस्खलनात 24 जणांचा मृत्यू तर 38 जण अजूनही बेपत्ता, Live Video

मणिपूर 02 जुलै : मणिपूरच्या नोनी जिल्ह्यात रेल्वेच्या बांधकामाच्या ठिकाणी भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना घडली आहे (Manipur Landslide). यात मृतांची संख्या शनिवारी 24 वर...

जंगलाच्या रस्त्यावर गाडीतून उतरली महिला; दुसऱ्याचं क्षणी वाघाने जबड्यात पकडून…

जंगलातून प्रवास करणे अनेकदा भीतीदायक असू शकते. पण लोकांना वाटतं की, जंगलंही शहरी भागासारखीच असतात. त्यामुळे कुठेही आणि केव्हाही उतरायला हरकत नाही. पण...

Most Popular

IND vs ENG, 5th Test : कसोटी सामन्यावर पावसाचे सावट, दुसऱ्या दिवशी उशिराने मॅच सुरु होण्याची शक्यता

टीम इंडिया आणि इग्लंडमध्ये पाचवा आणि शेवटचा सामना एजबॅस्टनमध्ये खेळवला जात आहे.  अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या...

‘टुटे मन से कोई खडा नही होता’ शिवसेनेचा फडणवीसांना वाजपेयींच्या कवितेतून टोला

  मुंबई,02 जून : '‘काळ्याचे पांढरे व पांढऱ्याचे काळे करणारे नवे युग आता तिथे अवतरले आहे. त्यामुळेच ‘छोटे मन’ आणि ‘मोठे मन’ यांच्या व्याख्या...

सैफचा लेक नाही, तर पलक तिवारी ‘या’ अभिनेत्याला करतेय डेट

लेकीच्या अफेअरबद्दल श्वेता तिवारीला कल्पना? इब्राहीम खान नाही, तर 'या' अभिनेत्याला करते डेट   अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि...

अखेर बाप-लेकीची होणार भेट? अभिजीत खांडकेकरच्या भूमिकेत येणार मोठा ट्विस्ट

मुंबई: 'तुझेच मी गीत गात आहे’ (Tuzech Mi Geet Gaat Aahe) ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. यामध्ये अभिनेता अभिजीत खांडकेकरच्या (Abhijeet Khandkekar)...

Todays Headline 2nd July : आज दिवसभरात घडणाऱ्या महत्त्वाच्या बातम्या

मुंबई : ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम...

‘उद्धव ठाकरे हे फार मोठे नेते, योग्य वेळ आल्यावर उत्तर देऊ’, केसरकरांचे चिमटे

ज्ञानेश्वर साळोखे, प्रतिनिधी पणजी, 1 जुलै : शिवसेनेच्या शिंदे गटाने नेते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी आज पत्रकार परिषद घेतली. शिंदे गटाचा नेता आज...