Thursday, July 7, 2022
Home भारत तेव्हा फडणवीसांनी तर आता ठाकरेंनी वर्षा बंगला सोडला, दोन्हीमधील फरक नेटकऱ्यांनी सांगितला

तेव्हा फडणवीसांनी तर आता ठाकरेंनी वर्षा बंगला सोडला, दोन्हीमधील फरक नेटकऱ्यांनी सांगितला


CM Uddhav Thackeray Leaves Varsha Bungalow : एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्यातील वातावरण तापले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही भावनिक साद देत वर्षा निवासस्थान सोडत ‘मातोश्री’वर दाखल झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वर्षा निवासस्थान सोडणार हे ऐकताच ‘वर्षा’ ते ‘मातोश्री’च्या दरम्यानच्या रस्त्यावर शिवसैनिकांनी एकच गर्दी केली. कोण आला रे कोण आला… शिवसेनेचा वाघ आला…, आवाज कुणाच… शिवसेनेचा या घोषणांनी हा परिसर दुमदुमला. सोशल मीडियावरही उद्धव ठाकरे यांच्याबद्दल भावनिक वातावरण निर्माण झालेय. सोशल मीडियावर उद्धव ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा बंगला सोडतानाचा फरक सांगण्यात येतोय. नेटकऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्या निर्णायाचं कौतुक करतानाच देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडलेय. 

‘भिंतीवर घाणेरडा मजकूर लिहून मुख्यमंत्री निवास सोडणारे, आणि फुलांची उधळण अंगावर झेलत वर्षा निवासस्थान सोडणारे उद्धव ठाकरे फरक नक्की आहे. उद्धव ठाकरे यांचं पुढं काय होईल नाही माहीत पण ते सध्या जनतेच्या मनातले मुख्यमंत्री मात्र आहेत..’ असा मेसेज सोशल मीडियावर पोस्ट करण्यात येत आहे. ट्विटर, फेसबूक, व्हॉट्स अॅप स्टेट्सवर हा मेसेज दिसत आहे. 

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा बंगला सोडल्यानंतर भिंतीवर उद्धव ठाकरेंबद्दल लिहिलेला मजकूर सध्या व्हायरल झाला होता. त्यावेळी वर्षा बंगल्यातील खोलीतील भींतीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह लिहल्याचं समोर आले होते. त्यावेळी फडणवीस यांनी यात काहीही तथ्य नसल्याचे म्हटले होते. ‘साधारण 15 दिवसांपूर्वीच आम्ही बंगला सोडला. त्यावेळी कोपरा न् कोपरा पाहिला होता. तेव्हा असे काहीही लिहिलेले आढळले नव्हते. दिविजाने तर असे काही लिहिण्याचा प्रश्नच नाही. यावरून होणारे राजकारण अत्यंत दुर्दैवी आहे. आमची बदनामी करण्याचा हा प्रयत्न आहे,’ अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती.

उद्धव ठाकरे यांनी आज ‘वर्षा’ निवासस्थान सोडलं आणि ‘मातोश्री’कडे निघाले. उद्धव ठाकरे ‘वर्षा’मधून बाहेर आल्यावर त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला. उद्धव ठाकरे हे वर्षावरून बाहेर येताना लोकांनी एकच गर्दी केली. लोकांनी एवढी गर्दी केली होती की उद्धव ठाकरेंना त्यांच्या गाडीपर्यंतही पोहोचता येत नव्हतं. त्यावेळी रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे त्यांच्यासोबत होते. यावेळी लोकांनी शिवसेनेच्या आणि उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. उद्धव ठाकरे आम्ही तुमच्या सोबत आहोत असा विश्वास शिवसैनिकांनी दिला. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#तवह #फडणवसन #तर #आत #ठकरन #वरष #बगल #सडल #दनहमधल #फरक #नटकऱयन #सगतल

RELATED ARTICLES

ढालेपाटलांच्या सुना काही ऐकत नाहीत बुवा! शिवानीने शेअर केला ढिनच्यॅक video

मुंबई 6 जुलै: (Colors Marathi) कलर्स मराठीवरील ‘राजा रानीची गं जोडी’ (Raja Ranichi Ga Jodi) मालिकेची सध्या खूप चर्चा होताना दिसत आहे. काहीच दिवसांपूर्वी...

Indian Railways:PNRच्या 10 अंकांत काय दडलंय?प्रत्येक क्रमांकात असते विशेष माहिती

What is meaning of Indian Railway’s 10 digit PNR Number mhsa - Indian Railways: PNRमधील 10 अंकांत नेमकं काय दडलंय? प्रत्येक क्रमांकात असते...

Most Popular

Indian Railways: रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी रेल्वेमंत्र्यांची मोठी घोषणा, पुढील महिन्यापासून ही मोठी सुविधा

Indian Railways:  भारतीय रेल्वे वंदे भारत रेल्वेच्या दोन अपग्रेड व्हर्जन आणणार आहे. या दोन्ही नव्या गाड्या सध्याच्या वंदे भारतपेक्षा खूप वेगळ्या असतील. अस्वीकरण: ही...

एक-दोन नाही 38 खून मीच केले’; जामकरसमोर कबुली देणाऱ्या अजितची नवी खेळी?

मुंबई 6 जुलै: झी मराठीवरील (Zee Marathi) देवमाणूस 2 (Devmanus 2) ही मालिका सध्या वेगवेगळ्या ट्विस्टने भरून गेली आहे. एकीकडे डिम्पल आणि डॉक्टर...

गृहनिर्माण सोसायट्यांना सरकारचा मोठा दिलासा; सोसायट्यांच्या निवडणूक खर्चात कपात 

Mumbai Housing Society Election  : भाजपा- शिवसेना युतीचे सरकार येताच गृहनिर्माण सोसायट्यांना मोठा दिलासा देण्यात आला असून सोसायटीच्या...

बॉस असावी तर अशी; जीवतोड काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना स्वखर्चाने Bali ला नेत जिंकली मनं

मुंबई : कंटाळा आलाय... काय ते रोजरोजचं ऑफिसला या, 9 तास बसा, मरमर काम करा आणि थकूनभागून घरी जा, मजा नाहीये राव यात......

आमचं पप्पा! वहिनीसाहेबांचा कोल्हापुरी ठसका, धनश्री काडगावकरचा बेस्ट VIDEOव्हायरल

मुंबई, 06 जुलै:  'डोक्यात काय फॉल्टय काय?' असं ठसक्यात  म्हणणाऱ्या 'तुझ्यात जीव रंगला' ( Tujhyat Jeev Rangala) मधील वहिनीसाहेब आठवतायत का? हि  मालिका...

Male Fertility : दररोज Sex करत असाल तर सावधान…कारण…

कस्तुरबा मेडिकल कॉलेज, MAHE-मणिपाल आणि युनिव्हर्सिटी ऑफ म्युन्स्टर, जर्मनीच्या संशोधकांनी Ejaculationची लांबी आणि त्याचा स्पर्म्सवर होणारा परिणाम यांच्यातील संबंध शोधण्याचा प्रयत्न केला आहे. अस्वीकरण:...