हायलाइट्स:
- अरबाझ खानच्या कार्यक्रमात टायगर श्रॉफची उपस्थिती
- दिसण्यावरून सोशल मीडियावर ट्रोल झाला होता टायगर
- ट्रोल्सर्सच्या अनेक प्रश्नांना टायगरने दिली भन्नाट उत्तरे
अलिकडेच टायगर अरबाझ खानच्या ‘पिंच २’ या कार्यक्रमात सहभागी झाला होता. त्यावेळी टायगरने त्याच्या सुरुवातीच्या काळाबद्दल सांगितले. तो म्हणाला, ‘ मी जेव्हा बॉलिवूडमध्ये आलो तेव्हा माझ्या दिसण्यावरून मला सोशल मीडियावर खूपच ट्रोल करण्यात आले होते. इतके की मला तू हिरो व्हायला आला आहेस की हिरॉईन असे प्रश्न अनेकांनी विचारले होते. इतकेच नाही तर तू जग्गूदादांचा मुलगा वाटतच नाही अशा ही प्रतिक्रिया मला अनेकांनी दिल्या होत्या. परंतु त्याकडे फार लक्ष न देता मी माझ्या कामावर सर्व लक्ष केंद्रीत केले…’ टायगरने पुढे सांगितले, ‘माझा पहिला सिनेमा रिलीज होण्याआधी देखील मला खूप ट्रोल केले होते. माझी सोशल मीडियावर मस्करी उडवली जायची.’
दाढीवरून ही विचारला प्रश्न
अरबाज खानच्या या कार्यक्रमामध्ये ट्विटरवर चाहत्यांनी, ट्रोलर्सने जे काही टायगरबद्दल लिहिले आहे त्यावरून प्रश्न विचारले. त्यातील एक प्रश्न होता, ‘टायगर तुझ्याकडे सगळे काही आहे, परंतु एक गोष्ट नाही. ती म्हणजे दाढी…’ त्यावर टायगर उत्तर देताना स्वतःच्या चेह-याकडे बोट दाखवतो आणि म्हणतो, ‘दोस्ता, मग, हे काय आहे?
टायगर तू व्हर्जिन आहेस का?
अरबाझ खानने टायगरला ट्विटरवरून उद्देशून विचारलेल्या प्रश्नामधील एक प्रश्न विचारला. हा प्रश्न ऐकून टायगरला देखील आश्चर्यचकीत झाला. अरबाझने त्याला विचारले, ‘अनेकांना हे जाणून घ्यायचे आहे की, तो व्हर्जिन आहे की नाही…’ तेव्हा या प्रश्नावर टायगरने देखील मजेशीर उत्तर दिले, तो म्हणाला, ‘ सलमान भाईप्रमाणे मी देखील व्हर्जिन आहे….’ काही वर्षांपूर्वी करण जोहरने त्याच्या कार्यक्रमामध्ये सलमानला हाच प्रश्न विचारला होता. तेव्हा दबंग खानने दिलेल्या उत्तरामुळे सर्वजण हैराण झाले होते…
दरम्यान, टायगरच्या कामाबद्दल सांगायचे तर त्याने २०१४ मध्ये ‘हीरोपंती’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. यानंतर त्याने ‘बाघी’ आणि ‘स्टूडंट ऑफ द इयर २’ सारख्या अनेक सिनेमांत काम केले आहे. काही दिवसांपूर्वी टायगरचा ‘बाघी ३’ हा सिनेमा पदर्शित झाला होता. आता लवकरच टायगर ‘हीरोपंती २’ आणि ‘गणपत’ या सिनेमांमध्ये दिसणार आहे.
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]
#त #वहरजनआहस #क #चहतयचय #परशनवर #टयगरच #भननट #उततर #महणल #सलमन