एका महिलेनं कंपनीमध्ये जॉबसाठी अर्ज केला होता. मात्र त्या कंपनीकडून महिलेचा जॉब रिजेक्ट करण्यात आला आणि त्यावर कोणालाही पटणार नाही असं कारण कंपनीकडून देण्यात आलं. या महिलेचं चार्लोट असं आहे. चार्लोटनं एका भूनिर्माण कंपनीमध्ये माळी या कामासाठी अप्लाय केलं होतं. त्यानंतर तिला त्या कंपनीकडून एक मेल मिळाला. यात तिनं आपल्या केलं याबद्दल धन्यवाद करण्यात आलं मात्र यानंतर कंपनीकडून जे कारण सांगण्यात आलं ते विचित्र होतं.
” तुम्ही शारीरिकरीत्या या कामासाठी सक्षम नाही, जोपर्यंत तुम्ही शारीरिकरीत्या या कामासाठी सक्षम होत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला हा जॉब देऊ शकत नाही. आमची कंपनी ही एक भूनिर्माण कंपनी आहे जिथे प्रचंड श्रम करावे लागतील. जर तुम्ही यातही तयार असाल तर खाली दिलेल्या नंबरवर संपर्क नक्की करा”. असं कंपनीकडून सांगण्यात आलं. मात्र यावर त्या महिलेनं दिलेलं उत्तर भन्नाट होतं.
हे वाचा -तुम्हालाही पुस्तकांमध्ये रमायला आवडतं का? मग यामध्ये करा करिअर; मिळेल भरघोस पगार
काय होतं महिलेचं उत्तर
“तुमच्या त्वरित रिप्लायसाठी धन्यवाद. मला भूनिर्माण कंपनीमध्ये काम करण्याचा अनेक वर्षांचा अनुभव आहे. ऑस्ट्रेलियामध्ये राहत असताना मी हेच काम करत होते. मी या जॉबसाठी आपल्या करण्याआधी तुमच्या कंपनीचा पूर्णपणे अभ्यास केला आहे. त्यामुळे मी या आधी काम केलेल्या कंपनीपेक्षा तुमच्या कंपनीतील काम इतकं आव्हानात्मक नाही. याउलट मला तुमच्यारख्या लहान विचार असलेल्या लोकांसोबत काम करणं अधिक आव्हानात्मक वाटतं. तुमच्या म्हणण्याप्रमाणे मी शारीरिकरीत्या सक्षम नाही. त्यामुळे मलाच ही नोकरी आता नकोय.” असं चार्लोटनं आपल्या उत्तरात म्हंटलं आहे.
तिच्यामधील आणि कंपनीमधील हे संभाषण चार्लोटच्या भावानं सोशल मीडियावर शेअर केलं आहे. यानंतर हे संभाषण चांगलंच व्हायरल झालं आहे. चार्लोटच्या बिनधास्त आणि निडर वृत्तीचं नेटकरी कौतुक करत आहेत.
Published by:Atharva Mahankal
First published:
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]
#तमह #सकषम #नह #अस #सगत #कपनन #जबसठ #दल #नकर #यवर #महलन #दल #भननट #उततर #एकद #वचच