Saturday, July 2, 2022
Home लाईफस्टाईल तुम्हालाही वाटतो भाजी चिरणं हा Task? ही पद्धत वापरून वाचवा वेळ, वाढेल...

तुम्हालाही वाटतो भाजी चिरणं हा Task? ही पद्धत वापरून वाचवा वेळ, वाढेल पोषण


नवी दिल्ली,10 ऑगस्ट : उत्तम आरोग्यासाठी (Health) जेवढं उत्तम पद्धतीने तयार केलेला आहार आवश्यक असतो. तितकाचं त्यासाठी भाज्या चिरणं म्हणजे कटिंगही (Vegetable Cutting) महत्त्वाच आहे. बरेच लोक भाजी चिरताना काही चुका (Mistake) करतात की त्यामुळे भाज्यांची खरी पोषणमुल्य (Nutritional Value of Vegetables) कचऱ्याच्या डब्यामध्ये जातं. अनेक लोक भाज्यांची साल काढून भाजी कापतात काही भाज्यांच्या सालीत जास्त न्युट्रिशन्स असतात.
हल्ली बाजारात वेळेची बचत (Time saving) करण्याचा दावा करणारे भाज्या चिरण्यासाठी अनेक टुल्स आले आहेत. खरं तर, भाज्या करण्यासाठी जेवढा वेळ लागतो,त्यापेक्षा जास्त वेळ त्या कापण्यासाठी लागतो. त्यामुळे स्वयंपाकात सर्वात मोठी चॅलेन्जिंग (Challenging) गोष्ट असेल तर ती म्हणजे भाजीपाला चिरणे. आपण अशाच काही किचन हॅक्सची (Kitchen Hacks) माहिती घेऊयात. ज्यामुळे चॉपिंग स्किल (Chopping Skill) सुधारेल आणि भाज्या कमी वेळेत सहज चिरू शकाल.
(आज आहे वर्षातली पहिली मंगळागौर; काय आहे या व्रताचं महत्त्व आणि पूजा विधी)
या प्रकारे चिरा कोबी
कोबी कापण्यासाठी वेळ लागू नये असं वाटत असेल तर, त्यासाठी ही पद्धत वापरा. आधी कोबी मध्यभागी कापून घ्या. त्यानंतर त्यातील देठ कापा आणि पानं बाजुला करा. आता ही पानं एकत्र करा आणि थोडीथोडी एकत्र करून बारीक चिरा. त्यामुळे कोबी लवकर चिरला जाईल आणि वेळही वाचेल. कोबी बारीक चिरून धुतला तर, त्यातील पोषक घटक पाण्याबरोबर निघून जातात. त्यामुळे कोबीची पानं कापण्याआधी स्वच्छ धुवा.
(फक्त या 7 सवयी लावा; स्मरणशक्ती वाढेल, मेंदू होईल तल्लख)
असे कापा कांदे
कांदा कापताना त्याचं पुढचं आणि मागचं देढ कापून घ्या. साली काढून चॉपिंग बोर्डवर ठेवा. त्यानंतर मधल्या तीन बोटांच्या मदतीने धरून सुरीने बारीक करा. त्यामुळे वेळही वाचेल. कांदा कापताना डोळ्यांमधून पाणी येत राहीलं तर, कापायला वेळ लागतो. त्यासाठी कांदा मधे कापल्यानंतर पाण्याने धुवून घ्या किंवा थोडा वेळ फ्रिजमध्ये ठेवा.
(खराब झालेल फर्निचर चमकवा अवघ्या काही मिनिटांत; वापरा ‘या’ सोप्या Tips)
फरसबी कापण्याची पद्धत
फरसबी सारख्या शेंगा कापण्यासाठी 8 ते 10 शेंगा एकत्र घ्या आणि कटिंग बोर्डवर पकडून सुरीने बारीक करा. याच पद्धतीने भेंडींही चिरता येतील.
(झाडासाठी खत आणि सजावटीसाठीही उपयोगी कॉफी बिया; घरात पडून असल्यास अशा वापरा)
पालेभाज्या
पालेभाज्या चिरण्यासाठी त्या आधी निवडाव्या लागतात. त्यासाठी मेथी किंवा कोथिंबिर सारखी भाजी निवडताना हातामध्ये देठ धरून पानं देठासकट बाजूला करावीत. पालेभाज्या चिरण्यासाठी आधी धुवून घ्याव्यात. त्यातली माती निघून जाईल अशा प्रकारे धुवाव्यात. पालेभाज्या ओल्या झाल्या की त्या चिरताना त्रास होतो. अशा वेळी कात्रीने कट कराव्यात, वेळही वाचेल.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#तमहलह #वटत #भज #चरण #ह #Task #ह #पदधत #वपरन #वचव #वळ #वढल #पषण

RELATED ARTICLES

वेबविश्वात आणखी एक खळबळ! रानबाजारनंतर खुर्चीचं राजकारण; पानसेंची नवी वेबसिरीज भेटीला

मुंबई 1 जुलै: सध्या महाराष्ट्रातील राजकारणात अनेक उलाढाली होत आहे. एक ना अनेक अनपेक्षित उलथापालथ सध्या पाहायला मिळत आहे. राजकारणाच्या सध्याच्या याच पार्श्वभूमीवर...

‘नाराज होऊ नका, हे आपलंच सरकार’, देवेंद्र फडणवीसांकडून भाजप आमदारांची मनधरणी

मुंबई, 1 जुलै : राज्यात शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि भाजप (BJP) यांचं एकत्रित सरकार स्थापन झालं आहे. हे सरकार...

‘E म्हणजे एकनाथ आणि D म्हणजे देवेंद्र हे आमचे ED चे राज्य’

ज्ञानेश्वर साळोखे, प्रतिनिधी पणजी, 1 जुलै : मुंबईत सध्या विविध राजकीय घडामोडी घडत आहेत. विशेष म्हणजे शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांची आज...

Most Popular

इथं ठाकरेंचं, इस्त्राइलमध्ये बेनेट सरकार पडले, साडेतीन वर्षात पाचव्यांदा निवडणुकीची रणधुमाळी

इस्त्राइलमध्ये सार्वत्रिक निवडणुकांमध्ये राजकीय नेत्यांना मतदान करण्याऐवजी पक्षाला मतदान केलं जातं. त्यामुळं आघाडीची सरकार सत्तेवर येतात. आता साडेतीन वर्षात पाचव्यांदा निवडणूक होणार आहे. बेंजामिन...

तुमचं मुलं तुमच्याशी खोटं बोलतं? या सवयीमागची ही ४ कारणं धक्कादायक, उपाय म्हणून कराल एक गोष्ट

प्रत्येक पालक आपल्या मुलांना चांगलेच संस्कार देत असतात. मुलांनी चांगल वागावं, ही एवढीच यामागे त्यांची अपेक्षा असते. पण अनेकदा मुलांना खोटं बोलण्याची सवय...

जुलै महिन्यात शुभ मुहूर्त आहेत कमी; येथे महिन्यातील सगळे मुहूर्त पाहा

मुंबई, 01 जुलै : जुलै महिना सुरू होत आहे. या महिन्यात लग्न, खरेदी, मुंडण इत्यादी अनेक शुभ मुहूर्त आहेत. जर तुम्हाला तुमच्या घराच्या...

विधिमंडळाच्या अधिवेशनाची तारीख बदलली, एक दिवसानं अधिवेशन ढकललं पुढे

Assembly session : विधानसभेच्या अधिवेशनाची तारीख बदलली आहे. विधानसभेचं अधिवेशन एक दिवसानं पुढे ढकलण्यात आलं आहे. शनिवारी आणि...

व्यक्तीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये वाजत होती ‘शिट्टी’; तपासणीत शॉकिंग कारण समोर

वॉशिंग्टन, 30 जून : एका व्यक्तीच्या शरीरातून शिट्टी वाजल्यासारखा आवाज येत होता. पण हा आवाज शरीराच्या नेमक्या कोणत्या भागातून येतो आहे, हे त्यालाही...

Maharashtra Government formation’मातोश्री’समोर एकमेव कार्यकर्ता, I Love Uddhav Sir बॅनर झळकावलं

Matoshree Bungalow Shiv Sainik : गुरूवारी राज्याच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदेंनी (CM Eknath Shinde) काल शपथ घेतली. तर, देवेंद्र...