संजय राऊत म्हणाले, औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन हा रितीरिवाज असू शकत नाही. संभाजीनगरला वारंवार यायचं आणि औरंगजेबाच्या कबरीपुढे गुडघे टेकायचे. यातून जर महाराष्ट्रात अशांतता निर्माण करायची असं काही तरी राजकारण ओवैसींचं दिसत आहे. मी इतकंच सांगेन की, त्या औरंगजेबाची कबर महाराष्ट्राच्या मातीत मराठ्यांनी बांधली. त्याला कबरीत आम्ही टाकलं. महाराष्ट्रावर चाल करणारा हा मुघल राजा. तुम्ही आज कबरीवर येऊन नमाज पडत आहात… कधीतरी तुम्हालाही त्याच कबरीत जावं लागेल.
Dargha Hazrath Aurangzeb Alamgir (R.A) pic.twitter.com/tOvwmUoNeN
— Akbaruddin Owaisi (@imAkbarOwaisi) May 12, 2022
औरंगजेब हा महान संत नव्हता तो एक आक्रमक होता. महाराष्ट्रावर त्याने आक्रमण केलं. महाराष्ट्रातील मंदिरे, प्रार्थनास्थळे त्याने उद्वस्त केली. आता महाराष्ट्रात येऊन त्याच औरंगजेबाच्या कबरीवर येऊन नमाज पडायचं… हे महाराष्ट्राला चॅलेंज देण्यासारखं आहे. ठिक आहे आम्ही चॅलेंज स्वीकारलं. औरंगजेबाला याच मातीत आम्ही गाडलं होतं. औरंगजेबाचे भक्त आहेत जे राजकारण करत आहेत त्याचीही तिच अवस्था होईल असंही संजय राऊत यांनी म्हटलं.
अकबरुद्दीन औवेसींची राज ठाकरेंवर खोचक टीका
राज ठाकरे मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरुन आक्रमक झाले आहेत. त्यांनी काही दिवसांपूर्वी औरंगाबादमध्ये जाहीर सभा घेतली होती. याच पार्श्वभूमीवर औवेसींनी राज ठाकरेंवर औरंगाबादमध्ये जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी राज ठाकरे यांच्यावर नाव न घेता अतिशय टोकाच्या शब्दांमध्ये टीका केली.
“कुत्रा आहे, भुंकतोय, जे पण भुंकतोय ते भुंकू द्या. कुत्र्याचं काम भुंकण्याचं आहे. वाघाचं काम शांतपणे चाललं जाणं आहे. बस भुंकू द्या. काहीच गरज नाही. वेळ आणि परिस्थीला समजा. त्यांच्या जाळ्यात अडकायचं नाहीय. ते जाळ गुंफत आहेत. ते तुम्हाला जाळ्यात फसवू इच्छित आहेत. तुम्ही फसू नका”, असा घणाघात अकबरुद्दीन ओवेसी यांनी केला.
तुमच्या शहरातून (मुंबई)
Published by:Sunil Desale
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]
#तमहलह #तयच #मतत #गडणरऔरगजबचय #कबरवर #मथ #टकणऱय #ओवसन #इशर