Friday, August 12, 2022
Home टेक-गॅजेट तुमच्या मुलांचं Aadhaar अपडेट आहे का? हे दोन बदल करणं आवश्यक, अन्यथा...

तुमच्या मुलांचं Aadhaar अपडेट आहे का? हे दोन बदल करणं आवश्यक, अन्यथा होईल इनअ‍ॅक्टिव्ह


नवी दिल्ली, 3 ऑगस्ट : आधार कार्ड (Aadhaar Card) अतिशय महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे. प्रत्येक वयोगटासाठी हे आवश्यक ठरतं. नवजात बाळांचंही आधार कार्ड बनवलं जातं. बर्थ डिस्चार्ज सर्टिफिकेट आणि आई-वडिलांच्या आधार कार्डद्वारे नवजात बाळांचं आधार कार्ड बनवलं जातं. परंतु अगदी लहान असताना बनवलेल्या आधार कार्डमध्ये नंतर अपडेट करणं महत्त्वाचं ठरतं. मुलांच्या 5 वर्षानंतर आधार कार्डमध्ये बायोमेट्रिक अपडेट करणं आवश्यक असतं. हे अपडेट न केल्यास मुलांचं आधार कार्ड इनअ‍ॅक्टिव्ह होऊ शकतं.

UIDAI ने ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. मुलांच्या आधार कार्डचा 5 वर्षापर्यंत वापर केला जाऊ शकतो. 5 वर्षानंतर बायोमेट्रिक अपडेट न केल्यास मुलांचं आधार कार्ड इनअ‍ॅक्टिव्ह होतं. त्यानंतर मुलं 15 वर्षांची झाल्यानंतर पुन्हा एकदा बायोमेट्रिक अपडेट करणं आवश्यक असतं.

मुलांचं बायोमेट्रिक अपडेट करणं पूर्णपणे मोफत आहे. यासाठी कोणतंही शुल्क भरावं लागत नाही. बायोमेट्रिक अपडेटसाठी आधार सेंटरवर जावं लागेल.

SIM वेरिफिकेशनसाठी मागितले 11 रुपये, पण डॉक्टरच्या खात्यातून तब्बल 6 लाख गायब

– त्यासाठी अपॉईंटमेंट बुक करण्यासाठी appointments.uidai.gov.in/easearch.aspx वर क्लिक करा.

– इथे Book an appointment वर क्लिक करा.

– त्यानंतर डिटेल्स भरुन Proceed to appointment वर क्लिक करा.

– डिटेल्स वेरिफाय करा आणि अपॉईंटमेंट बुकसाठी सबमिटवर क्लिक करा.

मृत्यूनंतर Aadhaar, पॅन कार्ड, पासपोर्ट अशा कागदपत्रांचं काय होतं? पाहा डिटेल्स

त्यानंतर सर्व डिटेल्ससह, कागदपत्रांसह आधार एनरोलमेंट सेंटरवर जावं लागेल. दरम्यान, 5 वर्षाखालील मुलांचं आधार कार्ड बनवण्यासाठी कोणतेही निकष पूर्ण करण्याची गरज नाही. यात बायोमेट्रिक डेटाचीही गरज नाही. आधारची प्रोसेस आणि ऑथेंटिकेशन पालकांच्या डेमोग्राफी आणि फोटोवरुनच मुलांचं आधार वेरिफिकेशन होतं.

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#तमचय #मलच #Aadhaar #अपडट #आह #क #ह #दन #बदल #करण #आवशयक #अनयथ #हईल #इनअकटवह

RELATED ARTICLES

सायकल खरेदी करताय! ‘या’ ऑनलाईन साईटवर मिळतेय स्वस्तात, जाणून घ्या

मुंबई : व्यायामासाठी अनेकांना जीमपेक्षा सायकलिंग करावी असे नेहमीच वाटतं असते. मात्र लॉकडाऊन नंतर सायकलचा खप आणि किंमती वाढल्याने अनेकांना बजेटमध्ये सायकल घेणे...

‘छोटू भैय्या बॅट बॉल खेळ…’, उर्वशी रौतेलाचा ऋषभ पंतवर पलट वार

मुंबई : काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला आणि ऋषभ पंत यांच्यात काहीतरी वाद सुरू असल्याची चर्चा होती. मात्र, हे प्रकरण समोर येण्याआधीच...

Most Popular

वाढदिवस साजरा करण्यासाठी जॅकलिन फर्नांडिस थेट पोहोचली कामाख्या देवीच्या दर्शनाला

मुंबई, 11 ऑगस्ट : बॉलिवूडमधील सुंदर अभिनेत्रींच्या यादीमधील एक नाव म्हणजे जॅकलिन फर्नांडिस. तिने तिच्या सौंदर्याने आणि अभिनयाने अनेकांची मने जिंकली आहेत.  ती...

Girish Mahajan at Jalgaon : मंत्रिपदी वर्णी लागल्यानंतर गिरीश महाजन यांचं जळगावात जंगी स्वागत

Girish Mahajan at Jalgaon : शिंदे-फडणवीस सरकारमध्ये कॅबनेट मंत्रिपदी वर्णी लागल्यानंतर गिरीश महाजन (Girish Mahajan) आज प्रथमच जळगावमध्ये...

कोयना धरणाचे 6 वक्री दरवाजे दीड फुटांनी उचलले, 10 हजार 100 क्युसेकने नदीत पाण्याचा विसर्ग 

Koyna Dam : कोयना धरणाची पाणीपातळी 2 हजार 147 फुटांवर गेली असून एकूण पाणीसाठा 85.31 टीएमसी झाला आहे....

मोठी बातमी: अरबी समुद्रात भारताचे जहाज बुडाले, पाकिस्तानने 9 क्रू मेंबर्सना वाचवले, एकाचा मृत्यू

इस्लामाबाद : Pakistan News: अरबी समुद्रात भारताचे एक मोठे जहाज बुडाले. या जहाजावर 10 क्रू मेंबर्स होते. त्यापैकी 9 जणांना वाचविण्यात यश आले...

रोज किती पावलं चाललात तर तुम्ही फिट राहू शकता? त्यामागचं गणित माहितीये?

चला तर मग जाणून घेऊया वजन कमी करण्यासाठी चालण्याचा योग्य मार्ग कोणता आहे. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि...

सायकल खरेदी करताय! ‘या’ ऑनलाईन साईटवर मिळतेय स्वस्तात, जाणून घ्या

मुंबई : व्यायामासाठी अनेकांना जीमपेक्षा सायकलिंग करावी असे नेहमीच वाटतं असते. मात्र लॉकडाऊन नंतर सायकलचा खप आणि किंमती वाढल्याने अनेकांना बजेटमध्ये सायकल घेणे...