Monday, July 4, 2022
Home भारत तुमच्या न थकण्यामागचे रहस्य काय? ईडीच्या प्रश्नावर राहुल गांधींचं उत्तर, म्हणाले...

तुमच्या न थकण्यामागचे रहस्य काय? ईडीच्या प्रश्नावर राहुल गांधींचं उत्तर, म्हणाले…


Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची ‘नॅशनल हेराल्ड’ वृत्तपत्राशी संबंधी ईडीकडून पाच दिवस चौकशी करण्यात आली.  त्यांची चौकशी करणाऱ्या ईडी अधिकाऱ्यांनी एका छोट्या खोलीत इतके दिवस कसे थकले नाहीत, असे विचारल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले. राहुल गांधी यांनी आज काँग्रेस कार्यालयात पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांना संबोधित केले. त्यावेळी राहुल गांधी यांनी याबाबत सांगितले. ईडीच्या अधिकाऱ्याने विचारलेल्या प्रश्नावर राहुल गांधी यांनी विपश्यना असे उत्तर दिल्याचे सांगितले. 

“मला काही दिवसांपूर्वी ईडी कार्यालयात बोलावण्यात आले होते. माझी चौकशी होत असलेली एक छोटी खोली होती. टेबलावर एक संगणक होता आणि तीन अधिकारी होते. मी खुर्चीवरून हलत नसे, अधिकारी ये-जा करायचे. रात्री साडेदहा वाजता अधिकारी मला म्हणाले, अकरा तासात आम्ही थकलो. परंतु, तुम्ही थकला नाही, यामागचे रहस्य काय आहे? मी म्हणालो की विपश्यनेची सवय झाली आहे.” अशी माहिती राहुल गांधी यांनी सांगितली. 

राहुल गांधी म्हणाले, त्या खोलीत राहुल गांधी एकटे नव्हते, काँग्रेसचा प्रत्येक नेता आणि कार्यकर्ता त्या खोलीत बसले होते. तुम्ही एका नेत्याला थकवू शकता, करोडो कार्यकर्त्यांना नाही. जो कोणी सरकारच्या विरोधात बोलतो, जो कोणी लोकशाहीसाठी लढतो, ते त्या दालनात उपस्थित होते. 

एवढा संयम कसा?

“शेवटच्या दिवशी ईडीच्या अधिकार्‍यांनी विचारले की, तुमच्यात इतका संयम कसा काय? त्यांना उत्तर दिले नाही. मी 2004 पासून काँग्रेसमध्ये काम करत आहे, आमच्यापेक्षा चांगला संयम कोणाकडे आहे? येथे सचिन पायलट बसले आहेत, सिद्धरामय्या बसले आहेत, रणदीप बसले आहेत. काँग्रेसला दडपून, धमकावता येणार नाही. सत्यात संयमाची कमतरता नसते, असे राहुल गांधी म्हणाले. 

पाच दिवस चौकशी
‘नॅशनल हेराल्ड’ वृत्तपत्राशी संबंधित कथित मनी लाँड्रिंग प्रकरणात मंगळवारी पाचव्या दिवशी ईडीने काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची 11 तासांपेक्षा जास्त वेळ चौकशी केली. चौकशी एजन्सीने राहुल गांधींना कोणतेही नवीन समन्स बजावले नाही. त्यामुळे असे मानले जात आहे की काही काळासाठी आता त्यांची चौकशी संपली आहे. 

राहुल गांधी यांची पाच दिवसांत  54 तासांहून अधिक वेळ चौकशी करण्यात आली असून त्यादरम्यान मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत  त्यांचे म्हणणे नोंदवण्यात आले आहे. 

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#तमचय #न #थकणयमगच #रहसय #कय #ईडचय #परशनवर #रहल #गधच #उततर #महणल

RELATED ARTICLES

July Born Baby Names: तुमच्या बाळांना द्या ‘ही’ सर्वात हटके अन् गोंडस नावं

मुंबई, 4 जुलै: आपल्या बाळाचं नाव (Baby Names) हटके असावं, असं प्रत्येकाला वाटतं. त्याचं नाव सुंदर असावं, त्याचा अर्थही चांगला असावा आणि ते नाव प्रत्येकाला...

गुजरातसोबत महाराष्ट्रात निवडणुका होतील, संजय राऊतांचा दावा

मुंबई, 04 जुलै :  'आता ही तात्पुरती केलेली व्यवस्था आहे. ही कायम स्वरुपाची नाही. भाजपला शिवसेना फोडायची होती. त्यांनी फोडून दाखवली. फुटीर गटाला...

Most Popular

July Born Baby Names: तुमच्या बाळांना द्या ‘ही’ सर्वात हटके अन् गोंडस नावं

मुंबई, 4 जुलै: आपल्या बाळाचं नाव (Baby Names) हटके असावं, असं प्रत्येकाला वाटतं. त्याचं नाव सुंदर असावं, त्याचा अर्थही चांगला असावा आणि ते नाव प्रत्येकाला...

Maharashtra Assembly session Live updates : विधिमंडळ अधिवेशनाचे प्रत्येक अपडेट्स एका क्लिकवर

Maharashtra Politics Floor Test Live Updates : आज शिंदे-फडणवीस सरकारला सभागृहात बहुमत सिद्ध करायचं आहे. काल विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक जिंकून सरकारनं पहिला विजय...

इंग्लंडचा पराभव निश्चित; बर्मिंघम फक्त एकदा असे घडले, भारताला इतिहास घडवण्याची सुवर्णसंधी

बर्मिंघम: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटीला सुरूवात होण्याआधी टीम इंडियाला मोठा झटका बसला होता. कर्णधार रोहित शर्माला करोना झाल्याने तो संघाबाहेर झाला आणि जसप्रीत बुमराहकडे...

पकडलेला लश्करचा दहशतवादी निघाला भाजपचा सदस्य?, नेत्याने म्हटले…

काश्मीरमध्ये सुरक्षा यंत्रणांनी दोन दहशतवाद्यांना अटक केलीय. आता या अटकेवरून राजकारण सुरू झालं आहे. एक दहशतवादी हा भाजपशी संबंधित असल्याचा आरोप केला जातोय....

आज शिंदे सरकारची खरी परीक्षा; बहुमत चाचणीसाठी ठरली रणनीती, मॅजिक फिगर गाठणार का?

मुंबई 04 जुलै : महाराष्ट्राच्या राजकारणात 10 दिवसांच्या बंडखोरीनंतर मोठा बदल घडवणारे शिवसेनेचे एकनाथ शिंदे (Eknath Shinde Government) यांच्या नव्या सरकारची आज फ्लोर...

‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित ब्रिटिश दिग्दर्शकाचे निधन, जागतिक स्तरावर सादर केले होते महाभारत

लंडन: प्रसिद्ध चित्रपट आणि नाट्य दिग्दर्शक पीटर स्टीफन पॉल ब्रुक (Peter Brook Passes Away) यांचे लंडनमध्ये निधन झाले. ते ९७ वर्षांचे होते. २...