Sunday, January 16, 2022
Home भारत तुमचा चेहराच बनेल बोर्डिंग पास, चार विमानतळांवर बसणार FTR यंत्र; वाचा सविस्तर

तुमचा चेहराच बनेल बोर्डिंग पास, चार विमानतळांवर बसणार FTR यंत्र; वाचा सविस्तर


नवी दिल्ली, 2 डिसेंबर: भारतातील विमानतळांवर आता बोर्डिंग पासऐवजी थेट तुमचा चेहरा (Facial identification technology to be introduced at four airports in India) दाखवून प्रवेश मिळवता येणार आहे. केंद्रीय विमान वाहतूक मंत्रालयाचे राज्यमंत्री जनरल व्ही. के. सिंह यांनी लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती दिली आहे. लवकरच देशातील (Experiment basis at four airports) चार विमानतळांवर प्रायोगिक तत्त्वावर ही प्रणाली राबवण्यात येणार आहे. यामध्ये वाराणसी, पुणे, कोलकाता आणि विजयवाडा या विमानतळांचा समावेश आहे. पुढच्या वर्षी मार्च महिन्यापासून ही योजना प्रायोगिक तत्त्वावर सुरू केली जाणार आहे.

अशी आहे योजना
विमानतळावर प्रवेश करताना प्रवाशांना दरवेळी आपली ओळख सादर करावी लागते. त्यामध्ये बराच वेळ जातो आणि दरवेळी कागदपत्रं सोबत बाळगावी लागतात. त्यासाठी आता नवी यंत्रणा विकसीत करण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे. यानुसार बायोमेट्रिक बोर्डिंग सिस्टिमसाठी एक ऍप तयार करण्यात येणार आहे. यामध्ये स्वतःच्या ओळखीचे तपशील, पॅन कार्ड, आधार कार्डाचे तपशील यांच्यासह प्रत्येकाच्या चेहऱ्याच्या बायोमेट्रिकही नोंदवले जाणार आहेत. त्यामुळे प्रत्येकाचा चेहराच हेच त्याचं ओळखपत्र असणार आहे. विमानतळावर प्रवेश करताना कुठलंही कार्ड दाखवण्याऐवजी थेट चेहराच स्कॅन होईल आणि प्रवाशांना विमानतळावर प्रवेश मिळेल.

हे वाचा-खतरनाक Omicron चा धोका कमी करण्याचा मार्ग सापडला; आरोग्यमंत्र्यांचा दावा

योजना असेल पर्यायी
जे नागरिक या योजनेअंतर्गत स्वतःच्या चेहऱ्याचे बायोमेट्रिक्स ऍपवर अपलोड करतील, त्यांना या योजनेचा फायदा घेणार आहे. मात्र हे करणं कुणासाठीही बंधनकारक नसेल. सध्या प्रचलित पद्धतीनुसार ओळखपत्र आणि बोर्डिंग पास दाखवून नागरिक विमानतळावर प्रवेश मिळवू शकतील, असंही नागरी उड्डयन मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे.

या सिस्टीमनुसार रजिस्ट्रेशन केलेल्या यात्रेकरूंची नोंद सीआयएसएफ, एअरलाईन आणि इतर सुरक्षा यंत्रणांकडे होणार आहे. त्यामुळे चेहरा स्कॅन झाल्यावर लगेचच प्लॅफगेट उघडेल आणि प्रवाशांना थेट आतमध्ये प्रवेश मिळणं शक्य होणार आहे.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#तमच #चहरच #बनल #बरडग #पस #चर #वमनतळवर #बसणर #FTR #यतर #वच #सवसतर

RELATED ARTICLES

युक्रेनवर झालेल्या सायबर हल्ल्याबाबत मोठी बातमी, Microsoftनं केला खुलासा

युक्रेन, 16 जानेवारी: युक्रेनवर (Ukraine) झालेला सायबर हल्ला (Cyber Attack) हा मालवेअरचाच (Malware) असल्याचा खुलासा मायक्रोसॉफ्टनं (Microsoft) केला आहे. युक्रेनमधील जवळपास 70 सरकारी...

Virat Kohli च्या राजीनाम्यानंतर भावूक झाली पत्नी अनुष्का, म्हणाली…

नवी दिल्ली, 16 जानेवारी: भारतीय टेस्ट टीमचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने त्याच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. शनिवारी आपल्या सोशल अकाऊंटवर भावुक...

WhatsApp वर असा मेसेज आला तर सावध व्हा, हॅकर्सकडून होऊ शकते मोठी फसवणूक

नवी दिल्ली, 16 जानेवारी : तुम्हीही WhatsApp चा वापर करत असाल, तर सतर्क राहण्याची गरज आहे. हॅकर्स WhatsApp द्वारे कोणत्याही युजरची फसवणूक करू...

Most Popular

WhatsApp वर असा मेसेज आला तर सावध व्हा, हॅकर्सकडून होऊ शकते मोठी फसवणूक

नवी दिल्ली, 16 जानेवारी : तुम्हीही WhatsApp चा वापर करत असाल, तर सतर्क राहण्याची गरज आहे. हॅकर्स WhatsApp द्वारे कोणत्याही युजरची फसवणूक करू...

खरंच कार्तिक आर्यनचं लग्न झालंय? खुद्द अभिनेत्याने सांगितलं सत्य

नक्की काय आहे सत्य...   अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. #खरच #करतक...

Taliban : तालिबान मुलींच्या शिक्षणासंदर्भात मोठ्या निर्णयाच्या तयारीत

Taliban on Girls Education : अफगाणिस्तानचे नवे शासक मुलींच्या शिक्षणासंदर्भात मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. तालिबानने सांगितले आहे...

टीम इंडिया कधीच कोणाचे उधार ठेवत नाही; ४८ तासात द.आफ्रिकेचा हिशोब चुकता केला

नवी दिल्ली: भारताचा क्रिकेट संघ सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली तिसऱ्या कसोटीत भारताचा पराभव झाला आणि टीम इंडियाने कसोटी मालिका...

BREAKING : भारतीय क्रिकेटमध्ये खळबळ, विराट कोहलीचा टेस्ट कॅप्टन्सीचाही राजीनामा

मुंबई, 15 जानेवारी : भारतीय टेस्ट टीमचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने त्याच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये 2-1...

Goa Accident : सेरावली गोवा येथे भरधाव येगात येणाऱ्या कारला अपघात; २ पोलिसांचा मृत्यू ABP Majha

<p>सेरावली गोवा येथे मध्यरात्री भरधाव येगात येणाऱ्या कारला अपघात झाला. मद्यपान करून कार चालवणाऱ्या चालकाला अटक.&nbsp;</p> अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित...