Friday, August 12, 2022
Home करमणूक तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं! ; छोट्या पडद्यावरील विश्वात आणखी एक...

तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं! ; छोट्या पडद्यावरील विश्वात आणखी एक नवीन मालिका


हायलाइट्स:

  • दाखल होतायत नव्या को-या चार मालिका
  • ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ मालिकेत प्रमुख भूमिकेत अमृता पवार
  • नवीन मालिकेत अमृताचा हटके लूक

मुंबई : झी मराठी वाहिनीवरील काही लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहेत. आता त्या जागी नवीन मराठी मालिका सुरू होत आहेत. या नवीन मालिकांचे प्रोमो रिलीज झाले आहेत. हे प्रोमो पाहून या नवीन मालिकांबद्दलही प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. यातील एक मालिका आहे, ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं!’

झी मराठी वाहिनीवरून एक दोन नाही तर चार नव्या को-या मालिका येत्या काही दिवसांत प्रसारित होणार आहेत. ‘माझी तुझी रेशीमगाठ’,’मन झालं बाजिंद’, ‘ती परत आलीये’ आणि ‘ तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ या नव्या को-या मालिकांचा समावेश आहे. यातील ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ ही मालिका येत्या ३० ऑगस्टपासून सोमवार ते शनिवारी रात्री नऊ वाजता झी मराठीवरून प्रसारित केली जाणार आहे. या मालिकेचा जो प्रोमो प्रसारित झाला आहे, त्यानुसार मालिकेमध्ये प्रमुख भूमिकेत अमृता पवार दिसणार आहे.

या मालिकेचा जो प्रोमो रिलीज झाला आहे त्यामध्ये लिहिले आहे की, ‘तयारी स्पर्धा परीक्षेची नव्हे, तयारी संसाराची…!!’ यावरून ही एखादी कौटुंबिक मालिका असावी, असा अंदाज बांधला जात आहे. अमृताशिवाय या मालिकेत अन्य कोणते कलाकार आहेत, याबदद्लची माहिती गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे. दरम्यान, ही नवीन मालिका ज्या वेळेववर प्रसारित होणार आहे, त्यावेळेत ‘माझा होशील ना’ ही मालिका प्रसारित केली जाते. आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार की त्याची वेळ बदलणार याबाबत प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.

याआधी अमृताने जिजामाता या मालिकेमध्ये काम केले आहे. तर अभिनयाच्या क्षेत्रात तिने दुहेरी या मालिकेतून केले आहे. त्यानंतर ती ललित २०५ या मालिकेत अभिनेता संग्राम साळवी सोबत दिसली होती.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#तझय #मझय #ससरल #आण #कय #हव #छटय #पडदयवरल #वशवत #आणख #एक #नवन #मलक

RELATED ARTICLES

सायकल खरेदी करताय! ‘या’ ऑनलाईन साईटवर मिळतेय स्वस्तात, जाणून घ्या

मुंबई : व्यायामासाठी अनेकांना जीमपेक्षा सायकलिंग करावी असे नेहमीच वाटतं असते. मात्र लॉकडाऊन नंतर सायकलचा खप आणि किंमती वाढल्याने अनेकांना बजेटमध्ये सायकल घेणे...

‘छोटू भैय्या बॅट बॉल खेळ…’, उर्वशी रौतेलाचा ऋषभ पंतवर पलट वार

मुंबई : काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला आणि ऋषभ पंत यांच्यात काहीतरी वाद सुरू असल्याची चर्चा होती. मात्र, हे प्रकरण समोर येण्याआधीच...

Most Popular

श्रावणात वरदलक्ष्मी व्रत का केले जाते? जाणून घ्या पूजा, विधी आणि महत्त्व

Varad Lakshmi Vrat 2022 : श्रावण मासातील शुक्लपक्षात येणाऱ्या शेवटच्या शुक्रवारी वरदलक्ष्मी हे व्रत करतात. पूर्वी ज्यांनी हे...

जगातील सर्वात प्राचीन भाषा अशी ओळख असलेल्या संस्कृत दिनाचा इतिहास काय? जाणून घ्या सविस्तर

World Sanskrit Day 2022 : हिंदू दिनदर्शिकेनुसार श्रावण (Shravan 2022) महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेच्या दिवशी संस्कृत दिवस साजरा केला...

पुणे, कोल्हापूरसह राज्यात अनेक ठिकाणी पावसाची हजेरी, आज कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात यलो अलर्ट

Maharashtra Rain : सध्या राज्यात जोरदार पाऊस (Rain) कोसळताना दिसत आहे. अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आले आहेत....

कोयना धरणाचे 6 वक्री दरवाजे दीड फुटांनी उचलले, 10 हजार 100 क्युसेकने नदीत पाण्याचा विसर्ग 

Koyna Dam : कोयना धरणाची पाणीपातळी 2 हजार 147 फुटांवर गेली असून एकूण पाणीसाठा 85.31 टीएमसी झाला आहे....

अल्लू अर्जुननं नाकारली कोट्यवधींची ऑफर; पाहा ठरतोय चर्चेचा विषय

अल्लू  अर्जुन हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे.  अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली...

CWG 2022: कॉमनवेल्थ गेम्समध्ये वाटले गेले तब्बल 1.5 लाख Condoms, पण का?

कॉमनवेल्थच्या आयोजकांनी 12 दिवसांत 1.5 लाख कंडोमचं वाटप केलं होतं. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार...