Saturday, November 27, 2021
Home विश्व तालिबान नेत्याचे मोठे वक्तव्य; सरकारमध्ये महिलांचाही होणार समावेश!

तालिबान नेत्याचे मोठे वक्तव्य; सरकारमध्ये महिलांचाही होणार समावेश!


काबूल: अफगाणिस्तानची सत्ता हाती घेतल्यानंतर तालिबानने आपली प्रतिमा सुधरवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. एकीकडे नागरिकांच्या संरक्षणाची ग्वाही दिली जात असताना तालिबानी नेत्याने एक मोठे वक्तव्य केले आहे. महिलांचे तालिबान सरकारमध्ये स्वागत असल्याचे म्हटले आहे. महिलांनी तालिबान सरकारमध्ये सहभागी होण्याचा विचार करावा असे आवाहन या तालिबानी नेत्याने केले आहे. त्याशिवाय अफगाणिस्तानमधील लोकांना माफी देण्यात येणार असल्याचे त्याने म्हटले.

‘असोसिएटेड प्रेस’ (एपी) या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, ‘इस्लामिक एमिराट’चे सांस्कृतिक आयोगाचे एनामुल्लाह यांनी एका वाहिनीशी बोलताना हे वक्तव्य केले आहे. ता तालिबान आपल्या सरकारमध्ये महिलांचाही समावेश करणार आहे. महिलांना कोणत्याही प्रकारच्या हिंसाचाराचा सामना करावा लागू नये असे तालिबानला वाटत असल्याचे त्यांनी म्हटले.

वाचा:अफगाणिस्तानमधील ‘हे’ राज्य अजूनही तालिबानच्या ताब्यात नाही!

अफगाणिस्तानमध्ये नवीन सरकार कसे असणार, त्याची रचना काय असणार, याबाबत अद्याप तालिबानकडून काहीही स्पष्ट करण्यात आले नाही. अफगाणिस्तानमध्ये शरियत लागू करण्यात येणार असल्याचे तालिबानने याआधीच स्पष्ट केले होते.

हिंसाचारात होरपळणाऱ्या २० हजार अफगाण नागरिकांना ‘हा’ देश देणार आसरा
अफगाणिस्तानमधील सर्व कर्मचाऱ्यांना कामावर परतण्याचे आवाहन करण्यात आले आहे. लोकांनी आपले दैनंदिन व्यवहार करावे, त्यांना कोणताही त्रास दिला जाणार नसल्याचे तालिबानने म्हटले.

चार कार भरून रोकड आणि हेलिकॉप्टरसह राष्ट्रपती गनी पळाले?

दरम्यान, अफगाणिस्तानच्या सत्तेचा ताबा तालिबानने घेतल्यानंतर अफगाण अधिकारी, नागरिकांनी देश सोडून जाण्यास सुरुवात केली. अफगाणिस्तानमधून काही जेट विमाने, हेलिकॉप्टरमधून अनेकांनी पलायन केले असल्याचे म्हटले जाते. अशातच उझबेकिस्तानने मोठा दावा केला आहे. अफगाण सैन्याचे एक लष्करी विमान पाडले असल्याचा दावा करण्यात आला आहे. हे विमान अफगाण हवाई दलाचा पायलट चालव होता अशी माहिती उझबेकिस्तानच्या अधिकाऱ्यांनी दिली.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#तलबन #नतयच #मठ #वकतवय #सरकरमधय #महलचह #हणर #समवश

RELATED ARTICLES

दिंडीत पिकअप घुसला, 15 ते 20 वारकरी जखमी, पुण्यातील वडगाव मावळनजीकची घटना

Pune Accident News Update : कार्तिकी एकादशीसाठी येणाऱ्या दिंडीतील वारकऱ्यांचा अपघात झाला आहे. मावळ तालुक्यात हा अपघात आज...

भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिकेची सिरीज होणार की नाही; BCCIने दिली मोठी अपडेट

मुंबई : भारत पुढील महिन्यात दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात संघाला तीन सामन्यांची कसोटी, एकदिवसीय आंतरराष्ट्रीय आणि टी-20 आंतरराष्ट्रीय मालिका खेळायची...

Vodafone Idea: Vi ने पुण्यात केले ५जी ट्रायल, मिळाला भन्नाट स्पीड; पाहा डिटेल्स

हायलाइट्स:वीआयने केले ५जी ट्रायल.पुणे आणि गांधीनगरमध्ये पार पडले ट्रायल.ट्रायलसाठी Ericsson, Nokia सारख्या कंपन्यांशी भागीदारी.नवी दिल्ली : टेलिकॉम कंपनी Vi (Vodafone Idea) ने ५जी...

Most Popular

नवीन कोरोना व्हायरस ‘चिंतेचा’, WHOनं दिलं ‘हे’ नाव, धोका अधिक!

Omicron B.1.1.529 : जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) नवीन कोरोनाव्हायरस व्हेरिएंट अतिशय "चिंतेचा" ( concern) असल्याचे घोषित केले आहे....

Good Health Care Tips: जास्त पाणी प्यायल्याने होऊ शकतात ‘हे’ आजार

Health Care Tips: निरोगी राहण्यासाठी शरीराला हायड्रेट ठेवणे गरजेचे असते. पाणी कमी प्यायल्याने अनेक आजार होऊ शकतात. आपल्या...

स्मरणशक्ती तल्लख बनवण्यासाठी या गोष्टी आहेत फायदेशीर, आहारात करा समावेश

नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर : काही लोकांना विस्मृती किंवा स्मरणशक्ती कमी असण्याची मोठी समस्या असते. त्यांना बहुतेक गोष्टी आठवत नाहीत. मात्र, शारीरिक समस्या किंवा...

ST Bus Strike : कामावर या, अनिल परबांनी निलंबनाबद्दल केली मोठी घोषणा

'मला आंदोलन नेतृत्व करणाऱ्यांशी घेणेदेणे नाही. फक्त कर्मचाऱ्यांशी घेणं देणं आहे. कामगारांनी कोणाच्या मागे भरकटू नये' अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित...

महागाईचा भडका : सीएनजी आणि पीएनजीच्या दरात पुन्हा वाढ

Inflation :दिवसागणिक महागाईचा भडका उडताना दिसत आहे.   अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली...

devendra fadnavis meets amit shah : दिल्लीत अमित शहांना भेटले फडणवीस; सत्ता बदलाच्या राजकीय चर्चांवर म्हणाले…

नवी दिल्लीः महाराष्ट्र भाजपमधील अनेक बडे नेते दिल्लीत ( devendra fadnavis meets amit shah ) आहेत. महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय...