Saturday, November 27, 2021
Home विश्व तालिबानला रोखू शकला नाहीत, आमचं काय वाकडं करणार?; चीनने अमेरिकेला डिवचले

तालिबानला रोखू शकला नाहीत, आमचं काय वाकडं करणार?; चीनने अमेरिकेला डिवचले


बीजिंग: अफगाणिस्तानमधून अमेरिकेने सैन्य माघारी घेतल्यानंतर २० वर्षानंतर पुन्हा एकदा तालिबानने सत्ता काबीज केली आहे. अमेरिकेसाठी हा पराभव असल्याचे अनेकांनी म्हटले आहे. अमेरिकेला या मुद्यावरून चीनने डिवचले आहे. अमेरिकेला तालिबानला रोखता आले नाही. तर, आमच्याशी कसा मुकाबला करणार असे चीनने डिवचले आहे. चीनने तैवानच्या मुद्यावर अमेरिकेवर निशाणा साधला आहे.

अमेरिकन सिनेटर जॉन कॉर्निन यांच्या एका ट्विटने चीनने ही टीका केली आहे. कॉर्निन यांनी तैवानमध्ये ३० हजार आणि दक्षिण कोरियात २८ हजार सैन्य असल्याचे सांगत ट्विट केले होते. त्यांच्या या ट्विटचे पडसाद उमटले. चीन सरकारचे वृत्तपत्र ‘ग्लोबल टाइम्स’ने म्हटले की, तैवानमध्ये अमेरिकेचे सैन्य असणे म्हणजे चीन-अमेरिकेतील कराराचे उल्लंघन आहे. आंतरराष्ट्रीय कायद्यासह अमेरिकेच्या देशांतर्गत कायद्याच्या विरोधात असलेले पाऊल आहे. अमेरिकेचे तैवानमध्ये सैन्य असणे म्हणजे तैवानवर आक्रमण केल्यासारखे आहे. म्हणजे, चीनविरोधात युद्ध करण्यासारखे आहे. चीनसोबत मैत्री करार करताना इतर देशांना चीनच्या ‘वन चायना’ धोरणाला मान्यता द्यावी लागते. त्यानुसार, तैवान हा चीनचा भाग असल्याचे समजले जाते.

अफगाणिस्तानमधील ‘हे’ राज्य अजूनही तालिबानच्या ताब्यात नाही!
तालिबान नेत्याचे मोठे वक्तव्य; सरकारमध्ये महिलांचाही होणार समावेश!
चीनने अफगाणिस्तानमधील चिघळलेल्या परिस्थितीसाठी अमेरिकेला जबाबदार ठरवले आहे. तालिबानचे उदाहरण देत चीनने तैवानलाही इशारा दिला आहे. अमेरिकेने सैन्य माघारी घेतल्यानंतर अफगाण सरकार कोसळले. तालिबान्यांनी राष्ट्रपती भवनात शिरकाव केला. त्याशिवाय अमेरिकेने आपल्या राजनयिक अधिकाऱ्यांना हेलिकॉप्टरच्या माध्यमातून वाचवले. या घटनांच्या अमेरिकेच्या विश्वासार्हतेवर परिणाम झाला असल्याचे चीनने म्हटले.


ग्लोबल टाइम्सने अमेरिकेला धमकी देताना म्हटले की, एकदा युद्धाला सुरुवात झाल्यास चीन तैवानचा ताबा घेईल. अमेरिका जर तैवानमधील हस्तक्षेपाबाबत विचार करत असेल त्यांनी अफगाणिस्तान, सीरियामध्ये काय झाले याचा विचार करावा आणि अधिक ताकदीने चीनचा मुकाबला करण्यास सज्ज राहावे लागेल असाही इशारा चीनने दिला. तैवानच्या मुद्यावर हस्तक्षेप करणे अमेरिकेला मोठे नुकसानकारक ठरणार असल्याचेही चीनने म्हटले.

अमेरिकेने ज्या देशांना मदत केली आहे, त्या देशांमधील परिस्थिती बिघडली असल्याचे चीनने म्हटले. त्यासाठी चीनने व्हिएतनाम, सीरियाचे उदाहरण दिले. अमेरिका हा विश्वासू देश नसल्याचेही चीनने म्हटले.

रशिया आणि चीनचं ठरलं?; तालिबानबाबत घेणार ‘हा’ निर्णय!
अमेरिकेने राजकीय पाठिंबा आणि इतर मार्गांनी तैवानमधील नेत्यांच्या मनात चीनविरोधात धोरणे घेण्यास भाग पाडले आहे. अमेरिकेने तैवानला शस्त्रे विक्रीही मोठ्या प्रमाणावर केली आहे. अमेरिका तैवानवर काहीच खर्च करत नाही. त्या उलट शस्त्र विक्री, पोर्क मांस आणि बीफ विक्री करून पैसे कमवत असून अमेरिकेच्या फायद्याचा हा व्यवहार असल्याचे चीनने म्हटले.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#तलबनल #रख #शकल #नहत #आमच #कय #वकड #करणर #चनन #अमरकल #डवचल

RELATED ARTICLES

Smartphone हरवल्यास Paytm Account असं करा डिलीट, पाहा सोपी प्रोसेस

नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर : Smartphone सर्वांसाठीच अतिशय महत्त्वाची, गरजेची गोष्ट झाला आहे. आता मोबाइलमध्ये केवळ फोटो, व्हिडीओच नाही, तर महत्त्वाचे डॉक्युमेंट्स, सोशल...

IND vs NZ: श्रेयससाठी संकटमोचक ठरला सूर्या, 2 मुंबईकरांच्या नात्याचा पाहा VIDEO

कानपूर, 27 नोव्हेंबर:  कानपूर टेस्टमध्ये शतक झळकाल्यानं श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) सध्या चर्चेत आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पणातच शतक झळकावणाऱ्या श्रेयसचं सध्या सर्वजण कौतुक...

Arjun Khotkar : ईडीकडून खोतकरांच्या घराची तब्बल 18 तास झाडाझडती, आजदेखील छापेमारी होणार

Arjun Khotkar : माजी मंत्री आणि जालन्यातील शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्या घरी ईडीने ( सक्तवसुली संचालनायलय) शुक्रवारी...

Most Popular

श्रेयस अय्यरनं शतक झळकात पूर्ण केली अट, आता घरी जेवायला येणार खास पाहुणा

कानपूर, 27 नोव्हेंबर: भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात कानपूरमध्ये सुरू असलेल्या पहिल्या टेस्टच्या दुसऱ्या दिवशी श्रेयस अय्यरनं शतक (Shreyas Iyer)...

अमिताभ बच्चन ‘वाईट व्यक्ती’ करीनाचा समज, बिग बींनी पाय धुतल्यानंतर बदललं मत

असं काय झालं की चक्क बिग बींना करीनाचे पाय धुवावे लागले, त्यानंतर करीनाचं बदललं मत    अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली...

महागाईचा भडका : सीएनजी आणि पीएनजीच्या दरात पुन्हा वाढ

Inflation :दिवसागणिक महागाईचा भडका उडताना दिसत आहे.   अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली...

स्मरणशक्ती तल्लख बनवण्यासाठी या गोष्टी आहेत फायदेशीर, आहारात करा समावेश

नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर : काही लोकांना विस्मृती किंवा स्मरणशक्ती कमी असण्याची मोठी समस्या असते. त्यांना बहुतेक गोष्टी आठवत नाहीत. मात्र, शारीरिक समस्या किंवा...

उर्फी जावेदचा फ्रंट ओपन टॉप, ट्रोलर्स म्हणाले, ‘अचानक सोसाट्याचा वारा आला तर….’

उर्फी जावेदचा विचित्र फॅशन सेन्स, आता तर फ्रंट ओपन टॉप घालून....   अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे...

सिंधू उपांत्य फेरीत; सात्त्विक-चिराग यांचीही विजयी घोडदौड

साईप्रणीत पराभूत इंडोनेशिया खुली बॅडमिंटन स्पर्धा दोन ऑलिम्पिक पदकविजेती पी. व्ही. सिंधू तसेच सात्त्विकसाइराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय बॅर्डंमटनपटूंनी शुक्रवारी इंडोनेशिया खुल्या बॅर्डंमटन...