Thursday, December 2, 2021
Home भारत तालिबानबाबत पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी महत्त्वपूर्ण बैठक, तर ब्रिटनकडून मोठ्या कारवाईचे संकेत

तालिबानबाबत पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी महत्त्वपूर्ण बैठक, तर ब्रिटनकडून मोठ्या कारवाईचे संकेत


नवी दिल्ली, 17 ऑगस्ट : अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) तालिबानच्या (Taliban) हाती सत्ता आल्यानंतर त्याबाबत भारताची (India’s stand) भूमिका ठरवण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) निवासस्थानी (residence) पार पडत आहे. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि अर्थमंत्री निर्मला सीतारमण उपस्थित असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अफगाणिस्तानमधील सद्य घडामोडींवर भारताच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

ब्रिटनची कारवाईची  भाषा

अफगाणिस्तानमध्ये मानवी हिंसाचार असाच सुरु राहिला, तर आर्थिक निर्बंध लादण्याचा इशारा ब्रिटननं दिला आहे. तालिबाननं जर हिंसाचार सुरुच ठेवला, तर निर्बंधांबाबत विचार करावा लागेल, असा इशारा पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी दिला आहे. तालिबानच्या त्याच्या जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठी शक्य ते सर्व उपाय करण्याचा इशारा ब्रिटनने दिला आहे.

मानवाधिकाराच्या निकषावर अफगाणिस्तानची परिस्थिती सध्या अत्यंत खराब असून ती त्वरित सुधारणे गरजेचे असल्याचंही ब्रिटननं म्हटलं आहे.

भारतापुढे मोठे आव्हान

भारत आणि अफगाणिस्तानमध्ये पारंपारिक व्यापारी संबंध असून भारताची अफगाणिस्तानात मोठी गुंतवणूक आहे. अफगाणिस्तानमध्ये सत्तांतर होत असताना भारत सरकार तालिबानबाबत काय भूमिका घेणार, हे दोन्ही देशांतील भविष्यातील संबंधांबाबत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. पाकिस्तान आणि तालिबान यांच्यात कित्येक वर्षांपासून सलोख्याचे संबंध आहेत. अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता येण्याच्या घटनेचं पाकिस्ताननं जाहीरपणे स्वागत केलं आहे.

हे वाचा -चिकन बिर्याणीच्या हातगाडीवरून जैन आणि मुस्लिमांमध्ये पेटला वाद; काय आहे प्रकरण?

तालिबानचा इशारा

भारताने सैनिकी मध्यस्थीचा विचारही करू नये, असा इशारा तालिबानने भारतासह इतर शेजारी देशांना दिला आहे. एकीकडे अफगाणिस्तानमध्ये सर्वसामान्यांवर होणारे अत्याचार आणि दुसरीकडे त्या देशातील नव्या सत्ताधाऱ्यांसोबत सलोख्याचे संबंध प्रस्थापित करण्याची गरज असं दुहेरी आव्हान भारतासमोर असणार आहे. भविष्यात पाकिस्तान आणि अफगाणिस्तानची सीमा सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीनंही भारताला धोरणात्मक उपाययोजना आखणं गरजेचं असणार आहे. त्या पार्श्वभूमीवर भारत काय भूमिका घेणार, याची उत्सुकता आहे.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#तलबनबबत #पतपरधन #मदचय #नवससथन #महततवपरण #बठक #तर #बरटनकडन #मठय #करवईच #सकत

RELATED ARTICLES

IPL Auction आधी दोन टीमनी उठवला BCCI विरुद्ध आवाज, लिलावाबद्दल म्हणाल्या…

आयपीएल 2022 साठी सगळ्या 8 टीमनी रिटेन (IPL Retention 2022) केलेल्या खेळाडूंची मंगळवारी घोषणा केली. या टीमनी एकूण 27 खेळाडू रिटेन केले आहेत....

स्वप्निल जोशी घेऊन येतोय ‘मोबाइल टीव्ही’, प्रोजेक्टचे राज्यपालांकडून अनावरण

मुंबई, 02 डिसेंबर: मराठमोळा अभिनेता स्वप्नील जोशी  (swapnil joshi )आणि उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांचा संयुक्त प्रकल्प असलेले ‘1 ओटीटी’ (ओव्हर द टॉप) हे...

Maharashtra Politics : ममता बॅनर्जींचा मुंबई दौरा आणि महाराष्ट्रात राजकिय घमासान, काय आहे वाद?

<p>दरम्यान ममता बॅनर्जींच्या महाराष्ट्र दौऱ्यानंतर महाराष्ट्र विकास आघाडीत वादाची ठिणगी पडल्याचे दिसतंय. विरोधकांच्या भूमिकेत असलेल्या काँग्रेसवर नाव न घेता ममतांनी निशाणा साधला त्यावर...

Most Popular

एअरपोर्टवर पोहोचताच आईकडून चपलांचा प्रसाद, अनोखं प्रेम पाहून प्रवाशांना आलं हसू

नवी दिल्ली, 2 डिसेंबर: आईनं मुलाला भेटल्यानंतर थेट पायातील चप्पल काढत त्याचा धोपटून (Viral video of mother beating son by shoe) काढल्याचा मजेशीर...

अभद्र युती तोडण्याची संधी..

ज्युलिओ एफ. रिबेरो पोलीस आणि राजकारणी यांना पैसा बेकायदा कृत्ये करणाऱ्यांचा.. या परिस्थितीने गाठलेल्या तळातून आपण वर येणार का? भारतीय पोलीस सेवेतून निवृत्त झालेले अधिकारी...

जरा हटके! ब्रिटनच्या महाराणीचा केवळ ‘या’ दोन जणांशी मोबाईलवर संवाद

हायलाइट्स:महाराणी एलिझाबेथ द्वितीय जगातील महत्त्वाच्या व्यक्तींपैंकी एककेवळ दोन जणांशी होतो मोबाईलवरून संवादकोण आहेत 'त्या' दोन खास व्यक्ती? जाणून घ्या... लंडन, इंग्लंड :ब्रिटनची...

Karan Johar चा मुलगा बनला शेफ! यशचा सॅंडविच बनवतानाचा VIDEO होतोय VIRAL

मुंबई,2 डिसेंबर-   करण जोहरने   (Karan Johar)   इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. करण जोहरने त्याचा मुलगा यश स्नॅक (Yash Johar)   बनवतानाचा एक नवीन...

धक्कादायक! पाठवणीनंतर सासरी निघालेली नवरी; रस्त्यातच प्रियकराने झाडली गोळी अन्..

आरोपींनी कारला ओव्हरटेक करत गाडी थांबवली, नवरदेवाला गाडीतून खाली उतरवलं आणि यानंतर नवरीच्या गळ्यावर गोळी झाडली. हल्लेखोरांनी नवरदेवाच्या भावाची सोन्याची साखळीही हिसकावून घेतली...

स्मार्ट बुलेटिन | 02 डिसेंबर 2021 | गुरुवार | एबीपी माझा

स्मार्ट बुलेटिन | 02 डिसेंबर 2021 | गुरुवार | एबीपी माझादररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी...