38 वर्षीय दानिश सिद्दीकी एक फोटो पत्रकार म्हणून अफगाणिस्तानला गेले होते. दरम्यान तालिबान आणि अफगान सैन्यात सुरू असलेल्या युद्धाला ते कव्हर करत होते. दरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. वॉशिंग्टन एक्झामिनरच्या वृत्तानुसार, पाकिस्तान सीमारेषेवर नियंत्रण मिळवण्यासाठी अफगाण सैन्य आणि तालिबान यांच्यात सुरू असलेल्या युद्धाला कव्हर करण्यासाठी सिद्दीकी अफगाणिस्तानच्या लष्कराच्या टीमसोबत स्पिन बोल्डक भागात गेले होते. या हल्ल्यादरम्यान सिद्दीकीला दुखापत झाली. त्यामुळे ते आणि त्यांची टीम एका स्थानिक मशिदीत आसरा घेण्यासाठी गेले.
हेही वाचा-दाऊदच्या गर्लफ्रेंडला व्हायचंय पाकिस्तानचा पंतप्रधान; इम्रान खानवर आहे फिदा
याठिकाणी त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आला. पण एक पत्रकार मशिदीत असल्याची माहिती बाहेर येताच तालिबान्यांनी मशिदीवर हल्ला केला. सिद्दीकी आपल्या टीमसोबत मशिदीत आसरा घेत असल्यामुळेच तालिबान्यांनी मशिदीवर हल्ला केल्याचं स्थानिक तपासात समोर आलं आहे.
हेही वाचा-तालिबान्यांनी 100 निष्पाप अफगाणांना केले ठार, झेंडे फडकावून साजरा केला उत्सव
दानिश यांना पकडण्यात आलं तेव्हा ते जिवंत होते
संबंधित वृत्तात असंही म्हटलं आहे की, “तालिबाननं जेव्हा दानिश यांना पकडलं तेव्हा ते जिवंत होते. यानंतर तालिबाननं सिद्दीकी यांची ओळख पटवली. त्यानंतर त्यांची आणि त्यांच्या अन्या साथीदारांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या घटनेत एका कमांडरला देखील मारण्यात आलं आहे. कारण त्याने या टीमला वाचवण्याचा प्रयत्न केला होता.” तालिबान्यांनी दानिश याचं डोकं चिरडल्यानंतर त्यांनी गोळ्या घातल्याचा दावा देखील या अहवालात करण्यात आला आहे.
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]
#तलबनन #दनश #सददकच #हतय #कश #कल #सनन #करणर #महत #आल #समर