Monday, July 4, 2022
Home विश्व तालिबाननं आणखी तीन शहरांवर मिळवला ताबा; दीड लाख लोकांची होरपळ

तालिबाननं आणखी तीन शहरांवर मिळवला ताबा; दीड लाख लोकांची होरपळ


काबुल, 11 ऑगस्ट: अमेरिकेनं आपलं सैन्य माघारी (American Army Went Back) घेतल्यापासून अफगाणिस्तानात तालिबानी (Taliban) संघटनेच्या हिंसक घटना वाढल्या आहेत. तालिबानच्या वाढत्या नियंत्रणामुळे अफगाणिस्तानातील परिस्थिती बिकट बनत चालली आहे. तालिबान शहरापाठोपाठ शहरं काबीज करत आहे. तालिबाननं मंगळवारी आणखी तीन शहरं (Taliban Control Over 3 More Cities) काबीज केली आहे. तालिबाननं पुल-ए-खुमरी, फैजाबाद आणि फराह अशी तीन शहरं आपल्या ताब्यात घेतली आहेत. यानंतर आता तालिबानची नजर येथील चौथ्या क्रमांकाचं शहर मजार-ए-शरीफवर आहे. लवकरच हेही शहर तालिबानच्या ताब्यात जाण्याची शक्यता आहे.

अफगाणिस्तानची वाढती धगधग लक्षात घेत, भारतानं मंगळवारीच आपल्या नागरिकांना अफगाणिस्तानातून मायदेशी परतण्याच्या सूचना दिल्या आहेत. युद्धग्रस्त भागातून आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी भारतानं एक विशेष विमानही अफगाणिस्तानला पाठवलं आहे. तालिबानच्या भीतीमुळे आतापर्यंत देशातील सुमारे 1 लाख 54 हजार लोकं बेघर झाले आहेत. त्यांना आपला जीव मुठीत घेऊन इतरत्र पलायन करण्याची वेळ आली आहे.
हेही वाचा-भारतानं बनवलेल्या महामार्गावर तालिबानचा ताबा; 300 दशलक्ष डॉलरची गुंतवणूक धोक्यात
ही शहरं तालिबाननं केली काबीज
तालिबाननं यापूर्वीच देशातील सहा प्रांताच्या राजधान्या आपल्या ताब्यात घेतल्या आहे. ज्यामध्ये समांगन प्रांत, कुंदुज, सर-ए-पोल, तलोकान यांचा समावेश आहे. त्याचबरोबर इराणच्या सीमेलगत असणाऱ्या निम्रोझ प्रांताची राजधानी झरांज आणि उझबेकिस्तान आणि तुर्कमेनिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या नोवझान प्रांताची राजधानी शबरघानवरही तालिबाननं ताबा मिळवला आहे.
हेही वाचा- ‘आम्हाला एकटं सोडू नका’, राशिद खानचं जागतिक नेत्यांना कळकळीचं आवाहन
22 हजाराहून अधिक कुटुंबीयांवर स्थलांतर होण्याची वेळ
कंधार शहरावर तालिबाननं हल्ला केल्यानंतर अफगाणिस्तानातील 22 हजाराहून अधिक लोकांना आपली घरं सोडावी लागली आहेत. साडेसहा लाख लोकसंख्या असलेलं कंधार शहर काबूल नंतर देशातील दुसरं सर्वात मोठं शहर आहे. मे महिन्यापासून अफगाणिस्तानात हिंसाचाराच्या घटनांत प्रचंड वाढ झाली आहे. अमेरिकन सैन्या पूर्णपणे परत गेल्यानंतर तालिबाननं हल्ले करायला सुरुवात केली होती.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#तलबनन #आणख #तन #शहरवर #मळवल #तब #दड #लख #लकच #हरपळ

RELATED ARTICLES

4th July 2022 Important Events : 4 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

4th July 2022 Important Events : जुलै महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व...

लातूरची सून टीना डाबीच्या अडीच महिन्याच्या संसारानंतर Ex नवऱ्याचीही लगीनघाई

नवी दिल्ली, 3 जुलै : Athar Amir khan Second marriage : आयएएस टीना डाबी (Tina Dabi) यांच्या दुसऱ्या लग्नाची जोरदार चर्चा होती. टीना डाबी...

तरुणीमुळे दोन मित्रांमध्ये पडली फूट; वाद इतका वाढला की, जिवलग मित्रावर झाडल्या..

यमुनानगर, 3 जुलै : मित्रांमध्ये भांडणाच्या घटना होत (Fighting in Friends) असतात. मात्र, तरीसुद्धा मैत्री ही काय राहते. मात्र, हरियाणा राज्यातील पंचकुला (Pandhkula...

Most Popular

‘या’ गोष्टी रात्री पाण्यात भिजवून ठेवा; सकाळी खाल्ल्याने दूर होतील ‘हे’ आजार

Health Tips : बहुतेक सगळ्याच घरांमध्ये ड्रायफ्रूट्स असतात. त्यातलेच भिजवलेले बदाम सकाळी लहान मुलांना आणि मोठ्यांना खायला दिले...

मिशिगनमध्ये एअर शो दरम्यान मोठा अपघात, ट्रकच्या स्फोटात एकाचा मृत्यू

Michigan Air Show Accident Video: शनिवार  2 जुलै रोजी बॅटल क्रीक, मिशिगन येथे एअर शो आयोजित करण्यात आला...

CBSE नं लाँच केलं नवीन ‘परीक्षा संगम’ पोर्टल; इथेच बघता येणार यंदाचा निकाल

मुंबई, 03 जुलै: CBSE च्या विद्यार्थ्यांना तसंच शाळांना वेबसाईटवर येणाऱ्या अडचणी लक्षात घेता. CBSE कडून मोठं पाऊल उचलण्यात आलं आहे. CBSE इयत्ता 10वी...

अध्यक्षीय निवडीच्या दिवशी सभागृहात गैरहजर… आमदार जितेश अंतापूरकर बोहल्यावर

नांदेड: राज्यात एकीकडे राजकीय गोंधळ सुरू असताना, एकेक आमदाराचे मत बहुमोल असताना नांदेडमधील देगलूरचे आमदार मात्र बोहल्यावर चढले...

Health Tips : कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी या फळभाज्या खा; समस्यांपासून होईल सुटका

Health Tips : कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी या फळभाज्या खा; समस्यांपासून होईल सुटका अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या...

शिंदे सरकारवर कोण होईल वरचढ? विरोधी पक्षनेतेपदासाठी 4 नावांची जोरदार चर्चा

मुंबई, 3 जुलै : महाराष्ट्रात नवे सरकार स्थापन झाल्यानंतर एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी पहिला पेपर तर सोडवला आहे. रविवारी महाराष्ट्र विधानसभेचे...