काबूल: अफगाणिस्तानमधील बहुतांशी भागावर तालिबानने नियंत्रण मिळवल्याचे चित्र आहे. तालिबानने आपल्या नियंत्रणातील प्रदेशात आपले कायदे लागू करण्यास सुरुवात केली आहे. तालिबानचा क्रूर चेहरा पुन्हा एकदा लोकांसमोर येऊ लागला आहे. तालिबानने एका लहान मुलाला १०० फटक्यांची शिक्षा दिली. त्या मुलाचे वडील अफगाण सैन्यात आहेत एवढाच त्या मुलाचा गुन्हा ठरला. तालिबानींच्या कौर्यात जखमी झालेल्या या मुलावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अफगाणिस्तान संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी हा फोटो ट्विट केला. या फोटोत लहान मुलगा जबर जखमी झालेला दिसत आहे. या मुलाला तालिबानी दहशतवाद्यांनी १०० फटके दिले आणि मारहाण केली. संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते फवाद अमन यांनी म्हटले की, तालिबानी दहशतवाद्यांनी फरयाब प्रांतातील शेरिन-तबाग जिल्ह्यातील एका मुलाला निर्दयीपणे मारहाण केली. तालिबान आपल्या भागात निर्दोष नागरिकांना मारत असून त्यांच्या संपत्तीची लूट करत असल्याचे फवाद अमन यांनी म्हटले. काबूल: तालिबानने केली विनोदी अभिनेत्याची हत्या; व्हिडिओ व्हायरल
दरम्यान, तालिबान आणि अफगाणिस्तानच्या सैन्यामध्ये जोरदार संघर्ष सुरू आहे. अफगाणिस्तानमधील दक्षिण आणि पश्चिम अफगाणिस्तानमधील तीन प्रांतात घनघोर युद्ध सुरू आहे. तालिबान तीन मोठ्या शहरांवर ताबा मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे हल्ल्यांची तीव्रता वाढवली आहे. तर, अफगाण सैन्यानेही तालिबानच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी कंबर कसली आहे. पाकिस्तानमधील दहशतवादीदेखील तालिबानच्या बाजूने लढण्यासाठी अफगाणिस्तानमध्ये दाखल झाल्याचे वृत्त आहे.
रक्तरंजित अफगाणिस्तान; २४ हजार तालिबानी आणि ५००० नागरिकांचा मृत्यू
खळबळजनक दावा! ‘या’ कारणांमुळे तालिबानकडून भारतीय पत्रकाराची हत्या अफगाणिस्तान सैन्याकडून तालिबानच्या ठिकाणांवर रात्रीदेखील हवाई हल्ले सुरू आहेत. हेरात प्रांतात १०० हून अधिक तालिबानी ठार झाल्याची माहिती राज्यपालांच्या प्रवक्त्यांनी दिली.
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]
जयपूर, 12 ऑगस्ट : देशभरात राखीपौर्णिमेचा सण आनंदात साजरा करण्यात आला. रक्षाबंधनाच्या नंतरही आज शुक्रवारी 12 ऑगस्ट रोजीही बहिणी आपल्या भावाला राखी बांधत आहेत....
सार्वजनिक ठिकाणी प्रेम व्यक्त करणं एका जोडप्याला चांगलंच भोवलं आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली...
नवी दिल्ली, 12 ऑगस्ट : कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांना ह्रदयविकाराचा झटका आल्यानं त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची...
मुंबई : यूएईमध्ये होणाऱ्या आशिया कपमध्ये (Asia Cup) 28 ऑगस्टला भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. या सामन्यापूर्वी पाकिस्तानी संघाची चिंता वाढली...
न्यूयॉर्क : भारतीय लेखक सलमान रश्दी यांच्यावर न्यूयॉर्कमधील बफेलोमध्ये चौटाउक्वामध्ये एका व्याख्यानावेळी चाकूनं जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. सलमान रश्दी यांची ओळख करुन...
एपी, हेलसिंकी : डेव्हिड अलाबा आणि कर्णधार करीम बेन्झिमा यांनी केलेल्या गोलच्या बळावर स्पॅनिश संघ रेयाल माद्रिदने जर्मन संघ एनट्रॅक फ्रँकफर्टवर २-० अशी...
हरारे: भारतीय क्रिकेट संघ लवकर झिम्बाब्वे दौऱ्यावर जाणार आहे. दोन्ही संघात ३ सामन्यांची वनडे मालिका होणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये झिम्बाब्वे संघाचा फार दबदबा...
मुंबई: अनेकदा प्रवाशांना रेल्वे (Railway) प्रवासापुर्वी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. ट्रेनची वाट पाहत असताना ती नेमकी कोणत्या प्लॅटफॉर्म येईल याची माहिती नसते....