Friday, August 12, 2022
Home मुख्य बातम्या ताब्यात घ्यायला शिवसेना म्हणजे काय युक्रेन आहे का? संजय राऊतांचा हल्लाबोल

ताब्यात घ्यायला शिवसेना म्हणजे काय युक्रेन आहे का? संजय राऊतांचा हल्लाबोल


Sanjay Raut On Maharashtra Election :  शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी बंडखोर शिंदे गटाला थेट आव्हान दिलं आहे. संजय राऊत म्हणाले की, शिवसेना म्हणजे युक्रेन नाही. असा कोणताही गट कुणी ताब्यात घेऊ शकत नाही. विधिमंडळात शिवसेना कमजोर झाली असेल पण राज्यात शिवसेना मजबूत आहे. शिवसेना कमजोर झाली असं म्हणणं बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान आहे, असं राऊत यांनी म्हटलं आहे. राऊत म्हणाले की, अशा अनेक प्रसंगातून आम्ही यापूर्वी गेलो आहोत. पक्ष पुन्हा पुन्हा फोडण्याचा प्रयत्न होतो, त्यातून पक्ष पुन्हा पुन्हा उभा राहतो. जोवर मुंबई आणि महाराष्ट्रात शिवसेना मजबुतीनं उभी आहे तोवर दिल्लीचे मराठी माणसाच्या हातून महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्याचे इरादे आहेत ते पूर्ण होणार नाहीत. भाजपच्या नेत्यानं सांगितलं आहे की महाराष्ट्राचे तीन तुकडे करायचे आहेत. त्यात मुंबई हा एक तुकडा आहे. मुंबईतील धनसत्तेवर काही लोकांना ताबा हवा आहे. त्यासाठी शिवसेना कमजोर करायची, त्यासाठी हा डाव आहे. पण शिवसेना कागदावर कमजोर झाली आहे, प्रत्यक्षात नाही. आजही शिवसैनिक रस्त्यावर येतील आणि लढा देतील असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.   

गटनेतापद आणि व्हिपच्या मुद्द्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, पक्षाच्या विरुद्ध कारवाई केली म्हणून शरद यादव यांंचं राज्यसभेतून निलंबन केलं. कायदा समान असेल तर एका ठिकाणी एक न्याय दुसऱ्या ठिकाणी दुसरा न्याय का.. याला मी संसदीय लोकशाही मानत नाही. महाराष्ट्रात हेच सुरु आहे. झिरवाळ यांनी दिलेला निर्णय नवीन अध्यक्षांनी बदलला. ही राजकीय चढाओढ आहे. यातून सामान्य लोकांना काय मिळणार, असं ते म्हणाले.

राऊत म्हणाले की, आपण फुटलेला आहात, आपण बाहेर गेलो आहोत हा प्रश्न आपल्या मनाला विचारा. शिवसेना हा मूळ पक्ष आहे आणि तो राहील. 16 आमदारांच्या अपत्रातेबाबत याचिका प्रलंबित असताना विधानसभा अध्यक्ष निवडणूक घेणं घटनाबाह्य आहे. ते पात्र की अपात्र हे सर्वोच्च न्यायालय घेईल. त्यानंतर हा निर्णय घ्यायला हवा होता. स्वार्थासाठी गुडघे टेकू नका अशी शिकवण आम्हाला बाळासाहेब ठाकरेंनी दिली आहे, असंही राऊत म्हणाले. 

कदाचित गुजरातबरोबर महाराष्ट्राच्या निवडणुका होतील

संजय राऊत यांनी म्हटलं आहे की, आम्ही सुद्धा तयारीला लागलो आहोत. कायदेशीर लढाई त्या दृष्टीनं सुरु राहील. मात्र मध्यावधी निवडणुकीला सामोरं जावं लागेल. कदाचित गुजरातबरोबर महाराष्ट्राच्या निवडणुका होतील. म्हणून ही तात्पुरती व्यवस्था भाजपनं केलीय. 106 आमदार असतानाही दुय्यम भूमिका त्यांनी घेतली आहे. अशी व्यवस्था 2019 ला केली असती तर महाविकास आघाडीच झाली नसती. त्यावेळीही आम्हाला डावललं. त्यांचा हेतू शिवसेनेला फोडणं आणि मुंबईला महाराष्ट्रापासून तोडणं असाच आहे, असं राऊत म्हणाले. भाजपला विश्वास असता की हे सरकार चालेल तर भाजपचा मुख्यमंत्री झाला असता, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले असते, असंही राऊत म्हणाले. 

भाजपनं ही तात्पुरती व्यवस्था केली

संजय राऊत यांनी म्हटलं की, मुंबईत जणू सैन्य उतरवलं होतं, कसाबपेक्षाही जास्त सुरक्षा या आमदारांना दिली होती. भविष्यात त्यांची अवस्था अशीच असेल तर ते हे लोकप्रतिनिधी कसे? असं राऊत म्हणाले. भाजपनं ही तात्पुरती व्यवस्था केली आहे. भाजपला शिवसेना फोडायची होती, त्यांनी शिवसेना फोडली. आणि फुटीर नेत्याला मुख्यमंत्री केलं, असं देखील राऊत म्हणाले. शिवसेना खासदारांच्या नाराजीबाबत विचारलं असता राऊत म्हणाले की, उद्धव ठाकरे यांची शिवसेना कायम असेल. जिकडं ठाकरे तिकडे शिवसेना असेल. भारतीय सेना आणि शिवसेना या दोनच सेना देशात राहतील, असं राऊत म्हणाले. 

इतर महत्वाच्या बातम्या

Maharashtra Politics Shivsena : पुन्हा कोर्टात धाव! शिवसेनेतली गटनेतेपदाची लढाई सुप्रीम कोर्टात

‘मध्यावधी लागणारच! गुजरातबरोबर महाराष्ट्राच्या निवडणुका लागतील, ही तात्पुरती व्यवस्था’; संजय राऊतांचा दावा

Maharashtra Politics : शिंदे-फडणवीस सरकारसाठी आज कसोटीचा दिवस; बहुमत चाचणी होणार, काय असेल रणनीती?अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#तबयत #घययल #शवसन #महणज #कय #यकरन #आह #क #सजय #रऊतच #हललबल

RELATED ARTICLES

मोठी ऑफर : 15 ऑगस्टदिनी या कंपनीचा कमी किमतीत सुपरफास्ट इंटरनेट प्लान

BSNL Broadband Plan Best Offer: आजच्या काळात, इंटरनेटशिवाय एक दिवसही घालवणे अशक्य आहे. तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. ज्यामध्ये तुम्ही 99 रुपयांमध्ये 3000GB...

Raosaheb Danve : मी रेल्वे मंत्री मात्र, माझ्या गावात अजून रेल्वे नाही : मंत्री रावसाहेब दानवे

Raosaheb Danve : 10 वर्ष आमदार (MLA) त्यानंतर 25 वर्ष खासदार म्हणून काम केले. मात्र अद्यापही माझ्या गावात...

75 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी; केंद्र सरकारकडून गाईडलाईन्स जारी

<h4 style="text-align: justify;"><strong>Independence Day Celebration : </strong>देशभरात कोरोना <a href="https://marathi.abplive.com/news/india/india-reports-16561-fresh-cases-and-18053-recoveries-in-the-last-24-hours-1089095">(Covid-19)</a> रूग्णांची संख्या वाढत असल्याने स्वातंत्र्य दिनाच्या समारंभासाठी कोणत्याही मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार...

Most Popular

दैनंदिन राशीभविष्य: धनु राशीसाठी आज सांभाळून राहण्याचा दिवस; तर कुंभ राशीला लाभ

आज दिनांक १२ऑगस्ट २०२२. वार शुक्रवार. पौर्णिमा समाप्ती सकाळी ७ .२३.आज चंद्र धनिष्ठा नक्षत्रात असेल. पाहुया आजचे बारा राशींचे भविष्य. मेष दिवस आनंद निर्माण करणारा...

पावसाळ्यात ओली गादी वाळवणे झालेय कठीण? या सोप्या टिप्स वापरून सुकवा गादी

बेडवरची गादी ओली झाली तर ती सुकवणे पावसाळ्यात सुकवणे अवघड काम असते. त्यासाठी आज आम्ही तुम्हाला अशाच काही टिप्स सांगत आहोत, ज्याच्या मदतीने...

Pune Mumbai Railway Stranded Landslide : पुणे-मुंबई लोहमार्गावर दरड कोसळली, रेल्वे वाहतूक विस्कळीत

<p>मुंबई, पुण्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी... खंडाळा आणि लोणावळ्यादरम्यान दरड कोसळल्यानं पुण्याहून मुंबईच्या दिशेनं होणारी रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे.. दरड हटवण्याचं काम युद्धपातळीवर...

Paytm New Feature: तुमची ट्रेन कोणत्या प्लॅटफॉर्मवर येणार? कितीला पोहचणार? आता लगेच समजणार

मुंबई: अनेकदा प्रवाशांना रेल्वे (Railway) प्रवासापुर्वी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. ट्रेनची वाट पाहत असताना ती नेमकी कोणत्या प्लॅटफॉर्म येईल याची माहिती नसते....

WhatsApp, Messenger नोटिफिकेशन्स नकोय, ते थांबवण्यासाठी काय कराव लागेल, जाणून घ्या

मुंबई : WhatsApp आणि Messenger हे जगभरात सर्वाधिक वापरले जाते. पण कधी कधी WhatsApp आणि Messenger च्या सतत येणाऱ्या नोटिफिकेशन्समुळे डोकेदुखी वाढली आहे....

ऋषी सुनक घेत आहेत केजरीवाल पॅटर्नचा आधार? ब्रिटनमध्ये वीजबिलावरील व्हॅट कमी करण्याचं आश्वासन

British PM Race : ब्रिटन (UK) पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आघाडीवर असलेले भारतीय वंशाचे ऋषी सुनक (Rishi Sunak) यांनी एक...