साधारणपणे पपई हे फळ आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त असतं, असं म्हटलं जातं; मात्र सर्दी आणि ताप असेल तर पपई खाणं जरूर टाळावं. त्यातून बाहेर पडणाऱ्या हिस्टामाइन कंटेंटमुळे (Histamine Content) नाकामध्ये सूज येऊ शकते. परिणामी गुदमरल्यासारखं होऊ शकते. त्यामुळे सर्दी आणि ताप पूर्णतः कमी होईपर्यंत पपई खाणं टाळावं.
तसं पाहिलं तर कोणत्याही प्रकारचा आजार झालेला असताना तळलेले पदार्थ किंवा जास्त मसालेदार पदार्थ खाऊ नये, असं सांगितलं जातं. खोकला किंवा छातीत दुखत असेल तर असे पदार्थ खाणं अधिकच हानिकारक असतं. सर्दी किंवा खोकला असेल तर चिप्स (Chips), फ्रेंच फ्राइज (French Fries) किंवा तत्सम कोणत्याही प्रकारचं जंक फूड (Junk Foods) अजिबात खाऊ नये.
ड्रायफ्रूट्समधल्या पौष्टिक घटकांमुळे ते शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. अक्रोड मेंदूकरिता खूप फायदेशीर असतो; मात्र त्यामधली हिस्टामाइन पातळी खूप जास्त असते. यामुळे घशात खवखव वाढू शकते. त्यामुळे आजारी असताना, ताप-सर्दी-खोकला असताना अक्रोड खाणं टाळलं तर उत्तमच. तसंच, सर्वच ड्रायफ्रूट्समध्ये हिस्टामाइनचं प्रमाण खूपच जास्त असतं. त्यामुळे दम लागणं आणि डोकेदुखीसारखे त्रास होऊ शकतात. त्यामुळे खोकला, सर्दी असल्यास ड्रायफ्रूट्स खाणं टाळलेलंच चांगलं.
तुम्हाला माहिती आहे का योग्य वजन म्हणजे नमके किती? वय आणि उंचीनुसार मोजायला हवं
स्ट्रॉबेरीच्या अतिसेवनामुळे शरीरात हिस्टामाइनची पातळी वाढते. त्यामुळे रक्तात गुठळ्याही होऊ शकतात. छातीत जमा होणाऱ्या कफामुळे समस्या निर्माण होऊ शकते. स्ट्रॉबेरीला एरव्ही सुपरफूड (SuperFood) म्हटलं जातं; मात्र सर्दी, ताप, खोकला असेल तर स्ट्रॉबेरी अजिबात खाऊ नये.
दह्या-दुधाचे पदार्थ खूप पौष्टिक असतात. खासकरून शाकाहारी व्यक्तींसाठी दूध आणि दुग्धजन्य पदार्थ हा पोषणाचा एक चांगला स्रोत आहे; पण पावसाळ्यात दही, ताक हे पदार्थ मोठ्या प्रमाणात खाणं टाळावं. दही किंवा दुधामुळे घशात जळजळ वाढू शकते. विशेषतः पावसाळ्यामध्ये खोकला किंवा छातीत जळजळ होत असेल, तर दूध किंवा दुधाचे पदार्थ खाऊ नयेत. असे पदार्थ ताप आणि खोकला असताना अत्यंत घातक ठरतात.
त्वरित ऊर्जा देणारं फळ म्हणजे केळं. तसंच केळं हे सर्व हंगामांमध्ये उपलब्ध असलेलं आणि सर्वांना परवडणारं फळ आहे. त्यामुळे समाजातल्या सर्वच स्तरांतल्या व्यक्तींच्या आहारात वर्षभर केळ्याचा समावेश असतो. केळ्यांमध्ये साखरेचं (Sugar) प्रमाण जास्त असतं. केळं पौष्टिक असलं, तरी त्यामुळे इन्फ्लेमेशन (inflammation) वाढू शकतं. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती (immunity power) कमी होते. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, ताप आणि सर्दी असेल तर केळी अजिबात खाऊ नयेत.
बऱ्याचदा अनेकांना खोकला असेल, घसा दुखत असेल तर चहा किंवा कॉफी पिण्याची सवय असते; मात्र असं करणं चुकीचं असतं. सर्दी किंवा ताप असेल तर चहा-कॉफीचं सेवन करणं टाळावं. कॉफीमध्ये असलेलं कॅफीन (Caffin) आपल्या शरीरातला पाण्याचा अंश (Dehydrate) कमी करतं. कॅफीनमुळे वारंवार लघवीला होऊ शकतं. डिहायड्रेशनमुळे स्नायूंमध्ये वेदना होऊ शकतात. तसंच उलट्या आणि अतिसारसुद्धा होऊ शकतं.
याच वेळेला घ्यावा चहा; काही खाल्ल्यावर चहा घेत असाल तर दुष्परिणामांना तयार राहा
पावसाळ्यात जास्त चरबीयुक्त अन्न खाऊ नये, असं बऱ्याचदा डॉक्टरांकडून सांगितलं जातं. आजारी असताना लाल मांस, मॅकरेल, सराइडन्स यांसारखे फॅटी फिशेस आणि अॅव्होकॅडोसारख्या फळांचा आहारात समावेश न करणं आरोग्यासाठी चांगलं असतं. उच्च चरबीयुक्त अन्न लवकर पचत नाही. त्यात पावसाळी वातावरणात पचनशक्ती अगोदरच मंदावलेली असते.
दुधाला ‘हा’ पर्यायही आहे उत्तम; रोज घेतल्यास वजन होईल कमी, डायबेटीज राहील दूर
आंबट म्हणजेच सायट्रिक ॲसिड (citric acid) असलेली फळं सर्दी आणि ताप असल्यास अजिबात खाऊ नयेत. यामुळे खोकला अजून वाढू शकतो. तसंच घसा खवखवू शकतो, घशामध्ये वेदना होऊ शकतात. त्यामुळे पावसाळ्यात अशी फळं शक्यतो खाऊ नयेत. पाण्याचं प्रमाण जास्त असलेली अननस, टरबूज अशी फळं खाणं आरोग्यासाठी चांगलं ठरू शकेल.
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]
#तप #सरद #खकल #असल #तर #हलद #असल #तर #ह #पदरथ #खण #टळ #अनयथ #वढल #तरस