Monday, July 4, 2022
Home मुख्य बातम्या '...तर मुख्यमंत्र्यांवर ही मोठी नामुष्की', पवार-ठाकरे भेटीत नेमकी चर्चा काय?

‘…तर मुख्यमंत्र्यांवर ही मोठी नामुष्की’, पवार-ठाकरे भेटीत नेमकी चर्चा काय?


मुंबई, 22 जून : महाराष्ट्राच्या राजकारणातील एक खूप मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोरी केल्याने महाविकास आघाडी सरकारवर (Maha Vikas Aghadi Government) मोठा पेच निर्माण झाला आहे. हा पेच आता सोडवण्यासाठी महाराष्ट्राच्या राजकारणातील चाणक्य अशी ख्याती असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मुख्यमंत्र्यांना मोलाचा सल्ला दिला आहे. महाविकास आघाडी सरकार असंच अबाधित ठेवायचं असेल तर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करा, असा सल्ला शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे. मुख्यमंत्र्यांच्या फेसबुक लाईव्हनंतर याबाबत चर्चा झाली. या चर्चेत नेमकं कोणकोणत्या मु्द्द्यांवर चर्चा झाली याविषयी वेगवेगळे अंदाज बांधले जात आहेत. विशेष म्हणजे शिवसेनेतील अंतर्गत कलहामुळे उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला तर ही मोठी नामुष्की असेल, असंदेखील या भेटीत चर्चा झाल्याचा अंदाज सूत्रांनी वर्तवला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद झाल्यानंतर त्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित होते. या बैठकीत महाविकास आघाडी सरकारवर ओढावलेल्या पेच प्रसंगावर मंथन झालं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची राजीनामा द्यायची तयारी आहे. ते वर्षा सोडून त्यांच्या मातोश्री या खासगी निवासस्थानी जाण्याच्या विचारात आहे. विशेष म्हणजे त्यांनी फेसबुक लाईव्हमध्येही याबाबत उल्लेख केला आहे. याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. यावेळी त्यांनी ठाकरेंना मोलाचा सल्ला दिला.

या चर्चेत नेमकं काय झालं असावं ?

शिवसेना अंतर्गत कलहामुळे जर उद्धव ठाकरे यांना राजीनामा द्यावा लागणं तर ही मोठी नामुष्की आहे. ही नामुष्की टाळण्यासाठी काय मार्ग यावर चर्चा झाली असावी, असा अंदाज बांधला जात आहे. याशिवाय शरद पवार यांच्यावर अनेक राजकीय घराणे फोडल्याचा सातत्याने आरोप होतो. आता तर शिवसेना पक्षच फुटीच्या उंबरठ्यावर आहे. जर पक्षफोडीला कारणीभूत, असा ठपका शरद पवार यांना नको असेल तर राष्ट्रवादी पाठिंबा काढण्याची भूमिका घेऊ शकते. कारण सरकार अल्पमतात गेल्यानं पडलं, असा ठपका एकवेळ सुसह्य असेल. त्यांतच काँग्रेस आमदारांमध्येही नाराजी आहे, असा अंदाज बांधला जातोय.

मुख्यमंत्र्यांनी आपल्या आमदारांना भावनिक साद

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी आपल्या आमदारांना भावनिक साद घातली आहे. “माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्रीपदी नको असेल तर काय करायचं? गुजरातला जाऊन बोलायची काय गरज आहे. मुख्यमंत्री नको असं मला सांगावं मी राजीनामा देण्यास तयार आहे. ज्यांना मी नकोय त्यांनी समोर येऊन सांगावे, मी पद सोडायला तयार आहे. मी आजच वर्षा बंगल्यातून मातोश्रीवर जाण्यास तयार आहे. आज मी माझ्या राजीनाम्याचं पत्र तयार करत आहे. गायब आमदारांनी समोर येऊन माझ्या राजीनाम्याचं पत्र राज्यपालांना द्यावं. शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार असेल तर राजीनामा देण्यास तयार आहे. कोरोना नसता तर मीच राजीनामा घेऊन गेलो असतो. शिवसैनिकांनी सांगावं मी शिवसेना पक्षप्रमुख पदासाठी योग्य नाही, मी शिवसेना प्रमुखपद सोडण्यास तयार आहे. मला कोणताही मोह नाही. मी ओढून ताणून खुर्चीवर बसणार नाही. मुख्यमंत्रिपद हे अनपेक्षितपणानं आलं. तुम्ही आम्हाला मुख्यमंत्री नको हे माझ्यासमोर येऊन सांगा. मी पद सोडून देईन. हे माझं नाटक नाही. संख्याबळ हा माझ्यासाठी गौण आहे”, असं मुख्यमंत्री म्हणाले.

तुमच्या शहरातून (मुंबई)

  • 'महाराष्ट्रहितासाठी निर्णय घेणं गरजेचं', मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतरही एकनाथ शिंदे आक्रमक

    ‘महाराष्ट्रहितासाठी निर्णय घेणं गरजेचं’, मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतरही एकनाथ शिंदे आक्रमक

  • ठाकरे सरकारसाठी गुरूवार ठरणार निर्णायक, राष्ट्रवादीच्या बैठकीत होणार मोठा निर्णय!

    ठाकरे सरकारसाठी गुरूवार ठरणार निर्णायक, राष्ट्रवादीच्या बैठकीत होणार मोठा निर्णय!

  • '...तर मुख्यमंत्र्यांवर ही मोठी नामुष्की', पवार-ठाकरे भेटीत नेमकी चर्चा काय?

    ‘…तर मुख्यमंत्र्यांवर ही मोठी नामुष्की’, पवार-ठाकरे भेटीत नेमकी चर्चा काय?

  • शिवसेनेचा ढाण्या वाघ गुवाहाटीतल्या बंडखोर आमदारांना जावून मिळाला, हॉटेलमध्ये प्रवेश करतानाचा Exclusive Video समोर

    शिवसेनेचा ढाण्या वाघ गुवाहाटीतल्या बंडखोर आमदारांना जावून मिळाला, हॉटेलमध्ये प्रवेश करतानाचा Exclusive Video समोर

  • वर्षाचा कर्मचारी हात जोडून मुख्यमंत्र्यांसमोर उभाच राहीला, भावुक करणारा तो Video 

    वर्षाचा कर्मचारी हात जोडून मुख्यमंत्र्यांसमोर उभाच राहीला, भावुक करणारा तो Video 

  • आमदारांनंतर आता खासादाराचं मुख्यमंत्र्यांना पत्र, शिवसेना पक्षप्रमुखांवर दबाव वाढवण्याचा प्रयत्न

    आमदारांनंतर आता खासादाराचं मुख्यमंत्र्यांना पत्र, शिवसेना पक्षप्रमुखांवर दबाव वाढवण्याचा प्रयत्न

  • मुख्यमंत्र्यांच्या भावनिक आवाहनाला शिंदेनी दिलं इमोशनल उत्तर! म्हणाले, बाळासाहेब....

    मुख्यमंत्र्यांच्या भावनिक आवाहनाला शिंदेनी दिलं इमोशनल उत्तर! म्हणाले, बाळासाहेब….

  • Shocking Video : नेत्याच्या दु:खात शिवसैनिक उतरले रस्त्यावर; राडा घालणाऱ्या महिला ढसाढसा रडल्या

    Shocking Video : नेत्याच्या दु:खात शिवसैनिक उतरले रस्त्यावर; राडा घालणाऱ्या महिला ढसाढसा रडल्या

  • शरद पवारांनी थेट गाठलं वर्षा; उद्धव ठाकरेंना म्हणाले, मुख्यमंत्रिपद सोडा...

    शरद पवारांनी थेट गाठलं वर्षा; उद्धव ठाकरेंना म्हणाले, मुख्यमंत्रिपद सोडा…

  • उरले सुरले आमदारही एकनाथ शिंदेंच्या गोटात, तरीही उद्धव ठाकरे फ्लोर टेस्टसाठी तयार, काँग्रेसचा मोठा दावा

    उरले सुरले आमदारही एकनाथ शिंदेंच्या गोटात, तरीही उद्धव ठाकरे फ्लोर टेस्टसाठी तयार, काँग्रेसचा मोठा दावा

  • बंड विरुद्ध संघर्ष; उद्धव ठाकरेंच्या शेवटच्या डावानंतर संजय राऊतांचं ते ट्विट व्हायरल!

    बंड विरुद्ध संघर्ष; उद्धव ठाकरेंच्या शेवटच्या डावानंतर संजय राऊतांचं ते ट्विट व्हायरल!

Published by:Chetan Patil

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.



अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#तर #मखयमतरयवर #ह #मठ #नमषक #पवरठकर #भटत #नमक #चरच #कय

RELATED ARTICLES

July Born Baby Names: तुमच्या बाळांना द्या ‘ही’ सर्वात हटके अन् गोंडस नावं

मुंबई, 4 जुलै: आपल्या बाळाचं नाव (Baby Names) हटके असावं, असं प्रत्येकाला वाटतं. त्याचं नाव सुंदर असावं, त्याचा अर्थही चांगला असावा आणि ते नाव प्रत्येकाला...

गुजरातसोबत महाराष्ट्रात निवडणुका होतील, संजय राऊतांचा दावा

मुंबई, 04 जुलै :  'आता ही तात्पुरती केलेली व्यवस्था आहे. ही कायम स्वरुपाची नाही. भाजपला शिवसेना फोडायची होती. त्यांनी फोडून दाखवली. फुटीर गटाला...

Most Popular

चित्रपटाच्या सेटवर रणबीरचा छळ; मारहाण केली तरी कुणी?

रणबीरनंच केला धक्कादायक उलगडा अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. #चतरपटचय #सटवर...

घरात स्नेक प्लांट लावण्याचे फायदे आहेत खास; कोणत्या दिशेला ठेवणं आहे शुभ

मुंबई, 04 जून : मानवी जीवन अनेक समस्यांनी आणि चढ-उतारांनी भरलेले आहे. जीवनाच्या कोणत्या वळणावर कोणत्या समस्या येऊ शकतात, हे कोणालाच जाणता येत...

How To Control PCOS : PCOS च्या समस्येपासून सुटका मिळवा

How To Manage PCOS : सध्या स्त्रियांमध्ये PCOD आणि PCOS हे आजार अधिक प्रमाणात पसरताना दिसत आहेत. अलिकडेच...

देहविक्री करून सैन्याला आर्थिक मदत करताहेत या महिला; काय आहे नक्की प्रकरण? वाचा

खार्किव : Ukraine Women:अनेक वेळा महिलांना बळजबरीने देहविक्री करावी लागते. आपल्या सन्मानाला सौदा करणे इतके सोपे नाही. अनेक महिलांना या परिस्थितीला मजबूरीने सामोरे...

Diabetes: मधुमेहग्रस्तांना फायदेशीर आहे काळे चणे, जाणून घ्या आरोग्यदायी फायदे

Diabetes: मधुमेहग्रस्तांना फायदेशीर आहे काळे चणे, जाणून घ्या आरोग्यदायी फायदे अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार...

गुजरातसोबत महाराष्ट्रात निवडणुका होतील, संजय राऊतांचा दावा

मुंबई, 04 जुलै :  'आता ही तात्पुरती केलेली व्यवस्था आहे. ही कायम स्वरुपाची नाही. भाजपला शिवसेना फोडायची होती. त्यांनी फोडून दाखवली. फुटीर गटाला...