Saturday, July 2, 2022
Home करमणूक 'तमाशा लाईव्ह’ मधील ‘वाघ आला’ गाणं प्रदर्शित! | tamasha live new song...

‘तमाशा लाईव्ह’ मधील ‘वाघ आला’ गाणं प्रदर्शित! | tamasha live new song vagh aala releasedसांगितिक नजाराणा घेऊन ‘तमाशा लाईव्ह’ चित्रपट येत्या १५ जुलैपासून प्रदर्शित होत आहे. काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या गाण्यांनाही जबरदस्त प्रतिसाद मिळत आहेत. चित्रपटातील एक जल्लोषमय गाणं प्रदर्शित आहे. त्या गाण्याचे बोल ‘वाघ आला’ असे असून या रॅप साँगमधून सचित पाटीलची ‘अश्विन’ ही भूमिका समोर येत आहे.

आणखी वाचा : सिद्धार्थ जाधव आणि तृप्ती घेणार घटस्फोट?

या गाण्यातून सचितचा डॅशिंग लूक दिसत असून तो एका वृत्तनिवेदकाची भूमिका साकारली आहे. सचितची ही ओळख आपल्याला सिद्धार्थ जाधव करून देत आहे. या गाण्याला महाराष्ट्राचा बुलंद आवाज लाभला आहे. आदर्श शिंदे यांनी हे गाणे गायले असून क्षितीज पटवर्धन यांनी या गाण्याला शब्दबद्ध केले आहे. तर संगीतकार अमितराज आहेत. ‘वाघ आला’चे नृत्यदिग्दर्शन उमेश जाधव यांचे आहे.

आणखी वाचा : “आणखी कोणाला असं वाटतंय…”, जिनिलियाने शेअर केलेला ‘हा’ मजेशीर व्हिडीओ पाहिलात का?

गाण्याविषयी गीतकार क्षितीज पटवर्धन म्हणतात, “चित्रपटात प्रेक्षकांना गाण्यांची जुगलबंदी पाहायला मिळणार आहे. चित्रपटात वेगवेगळ्या धाटणीची गाणी आहेत, त्यातील हे एक गाणं आहे. नवीन प्रयोग करायला नेहमीच मराठी चित्रपटसृष्टी सज्ज असते. गाण्यातून केलेला एक नवा प्रयोग. ही आमची कलाकृती प्रेक्षकांच्या मनात नक्कीच घर करेल.” तर संगीतकार अमितराज म्हणतात, “आम्ही नेहमीच काही वेगळं करण्याच्या प्रयत्नात असतो. प्रत्येक पात्राला साजेल, असे संगीत आवश्यक असल्याने आम्ही खूप विचार करून संगीत दिले आहे. प्रेक्षकांना आमची कलाकृती नक्कीच आवडेल.”

आणखी वाचा : अग्निपथ योजनापासून लक्ष विचलित करण्यासाठी शिवसेनेचा वापर? कुणाल कामराची पोस्ट चर्चेत

‘प्लॅनेट मराठी’चे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, “नेहमीच काही तरी हटके करणारे दिग्दर्शक संजय जाधव यांनी या चित्रपटात वेगळं सादर करण्याचा प्रयत्न केला आहे. संगीतप्रेमींसाठी ‘तमाशा लाईव्ह’ म्हणजे एक पर्वणी आहे. यातील प्रत्येक गाण्यात काहीतरी प्रयोग करण्यात आला आहे. पहिल्या रोमॅंटिक गाण्याला रसिकांनी पसंती दर्शवल्यानंतर आता हे दुसरे गाणे आपल्या भेटीला आले आहे. आता इतर गाणीही लवकरच संगीतप्रेमींच्या भेटीला येतील. नक्कीच प्रेक्षकांना ही उत्साहाने भरलेली गाणी आवडतील, अशी आशा व्यक्त करतो.”

आणखी वाचा : रूट कॅनल करणे अभिनेत्रीला पडले महागात!

आणखी वाचा : ‘सम्राट पृथ्वीराज’चे अपयश ‘रक्षाबंधन’ पुसणार का? पाहा ट्रेलर

प्लॅनेट मराठी व माऊली प्रॉडक्शन प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती अक्षय बर्दापूरकर यांनी केली आहे. सौम्या विळेकर, डॉ. मनीषा किशोर तोलमारे, समीर विष्णू केळकर, अजय वासुदेव उपर्वात सहनिर्मित ‘तमाशा लाईव्ह’ची कथा मनीष कदम यांनी लिहिली असून संवाद अरविंद जगताप यांचे आहेत.

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#तमश #लईवह #मधल #वघ #आल #गण #परदरशत #tamasha #live #song #vagh #aala #released

RELATED ARTICLES

PHOTO : हॉट फोटो शेअर करत दिशा पाटणीने वाढवला सोशल मीडियाचा पारा!

PHOTO : हॉट फोटो शेअर करत दिशा पाटणीने वाढवला सोशल मीडियाचा पारा! अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या...

Shocking! प्रायव्हेट पार्टमध्ये असं काही केलं इंजेक्ट, तरुणाचा दुर्देवी मृत्यू!

28 वर्षांच्या तरुणाच्या मृत्यूमुळे त्याच्या आईला जबर धक्का बसला आहे. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार...

पुणे पालिकेचा दणका! प्लास्टिक बंदी विरोधात पहिल्याच दिवशी वसूल केला 70 हजार रुपयांचा दंड

Pune Pmc News: 1 जुलै 2022 पासून "सिंगल-युज प्लास्टिक" च्या वापरावर बंदी घालण्यासाठी राज्यांना विनंती करणाऱ्या केंद्र सरकारच्या...

Most Popular

Aarey Metro Car Shed : बहुचर्चित ‘आरे’ मेट्रो कारशेडची सध्या काय आहे स्थिती…

Aarey Metro Car Shed : बहुचर्चित 'आरे' मेट्रो कारशेडची सध्या काय आहे स्थिती... अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि...

वेबविश्वात आणखी एक खळबळ! रानबाजारनंतर खुर्चीचं राजकारण; पानसेंची नवी वेबसिरीज भेटीला

मुंबई 1 जुलै: सध्या महाराष्ट्रातील राजकारणात अनेक उलाढाली होत आहे. एक ना अनेक अनपेक्षित उलथापालथ सध्या पाहायला मिळत आहे. राजकारणाच्या सध्याच्या याच पार्श्वभूमीवर...

‘टुटे मन से कोई खडा नही होता’ शिवसेनेचा फडणवीसांना वाजपेयींच्या कवितेतून टोला

  मुंबई,02 जून : '‘काळ्याचे पांढरे व पांढऱ्याचे काळे करणारे नवे युग आता तिथे अवतरले आहे. त्यामुळेच ‘छोटे मन’ आणि ‘मोठे मन’ यांच्या व्याख्या...

IND vs ENG, 5th Test : कसोटी सामन्यावर पावसाचे सावट, दुसऱ्या दिवशी उशिराने मॅच सुरु होण्याची शक्यता

टीम इंडिया आणि इग्लंडमध्ये पाचवा आणि शेवटचा सामना एजबॅस्टनमध्ये खेळवला जात आहे.  अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या...

Gold Price Hike : सोने महागणार ; सोन्यावरील आयात करात 5% वाढ ABP Majha

<p>सोन्याच्या दागिन्यांची हौस असलेल्यांसाठी किंवा लगीनसराईची तयारी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे... सोनं खरेदी करताना आता खिसा जरा जास्त रिकामा करावा लागणार आहे... कारण...

Flipkart वर सुरूये खास सेल, अवघ्या ७९ रुपयात मिळेल वस्तू; ८० टक्क्यांपर्यंत डिस्काउंट उपलब्ध

नवी दिल्ली :Flipkart Big Bachat Dhamaal Sale: Flipkart वर बिग बचत धमाल सेल सुरू आहे. १ जुलैपासून सुरू झालेला हा सेल ३ जुलैपर्यंत...