Friday, August 12, 2022
Home भारत तब्बल 2500 कर्मचाऱ्यांना कामावरून का काढलं? Byju's नं अखेर सांगितलं मोठं कारण

तब्बल 2500 कर्मचाऱ्यांना कामावरून का काढलं? Byju’s नं अखेर सांगितलं मोठं कारण


मुंबई, 01 जुलै: 27 जून रोजी संध्याकाळी बायजूस कंपनीनं (Byjus Company) त्यांच्या कर्मचाऱ्यांना मोठा धक्का दिला. काही कर्मचाऱ्यांना त्यांच्या व्यवस्थापक आणि एचआरचे फोन आले. यानंतर 28 जून रोजी अधिकृत संभाषणात कर्मचाऱ्यांना ईमेल पाठवून राजीनामा देण्यास सांगण्यात आले. त्यांना जूनच्या पगारासह अतिरिक्त पगार आणि परफॉर्मन्स बोनस देण्याचे आश्वासन दिले होते. बहुतांश कर्मचाऱ्यांना कंटेंट आणि डिझाइन टीममधून काढून टाकण्यात (BYJU’s lays off 300 employees) आले आहे.

मनीकंट्रोलने आपल्या अहवालात सांगितले होते की बायजूस कंपनी आपल्या खर्चात कपात करण्यासाठी समूह कंपन्यांमधील 2500 कर्मचाऱ्यांना कामावरून काढत आहे. त्याच्या एक दिवस आधी, ब्लूमबर्गच्या एका अहवालात दावा करण्यात आला होता की बायजूने गेल्या वर्षी अंतिम केलेल्या अधिग्रहण सौद्यांसाठी कंपनी देय देण्यास विलंब करत आहे.

अखेर सैन्यात अग्निवीरांसाठी नोंदणीला सुरुवात; ‘या’ लिंकवर डायरेक्ट करा अर्ज

एडटेक कंपनी बायजूने आपल्या ग्रुप कंपन्यांमध्ये 2,500 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकल्याच्या मीडिया रिपोर्ट्समध्ये, कंपनीने जारी केलेल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की बायजू आपल्या ग्रुप कंपन्यांच्या टीम्समध्ये सुधारणा करण्यासाठी काम करत आहे. या संपूर्ण प्रक्रियेत कंपनीचे 500 हून कमी कर्मचारी बाधित झाल्याचेही कंपनीच्या वतीने सांगण्यात आले आहे.

प्रसारमाध्यमांमध्ये पसरवल्या जाणाऱ्या बातम्या पूर्णपणे दिशाभूल करणाऱ्या असल्याचं बायजूसच्या वतीने सांगण्यात आलं आहे. कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले की, “आमच्या व्यवसायाच्या प्राधान्यक्रमांची पुनर्तपासणी करण्यासाठी आणि आमच्या दीर्घकालीन वाढीला गती देण्यासाठी, आम्ही आमच्या समूह कंपन्यांमध्ये आमचे कार्यसंघ सुधारण्यासाठी प्रयत्नशील आहोत आणि या सराव दरम्यान, 500 पेक्षा कमी कर्मचारी प्रभावित होत आहेत.

त्याच वेळी, पीटीआयने प्रसिद्ध केलेल्या अहवालात असे म्हटले आहे की, बायजू ग्रुप कंपनीने टॉपरने या आठवड्यापूर्वी सुमारे 1100 कर्मचाऱ्यांना कामावरून काढले आहे, जे कंपनीच्या मनुष्यबळाच्या सुमारे 36 टक्के आहे. पीटीआयचा हा अहवाल कंपनीने काढलेल्या कर्मचाऱ्यांच्या हवाल्याने दिला आहे.

CBSE च्या 10th, 12th च्या निकालाबाबत मोठी अपडेट; या तारखेला जाहीर होणार निकाल?

“मी कंपनीतील रसायनशास्त्र विषयातील तज्ज्ञांच्या टीमचा भाग आहे. माझ्या संपूर्ण टीमला काढून टाकण्यात आले आहे. कंपनीने आपल्या बाजूने म्हटले आहे की, जे स्वत: राजीनामा देतात त्यांना एक महिन्याचा पगार दिला जाईल, तर असे न करणाऱ्यांना काहीही मिळणार नाही” असं एका कर्मचाऱ्याने म्हंटलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#तबबल #करमचऱयन #कमवरन #क #कढल #Byjus #न #अखर #सगतल #मठ #करण

RELATED ARTICLES

सायकल खरेदी करताय! ‘या’ ऑनलाईन साईटवर मिळतेय स्वस्तात, जाणून घ्या

मुंबई : व्यायामासाठी अनेकांना जीमपेक्षा सायकलिंग करावी असे नेहमीच वाटतं असते. मात्र लॉकडाऊन नंतर सायकलचा खप आणि किंमती वाढल्याने अनेकांना बजेटमध्ये सायकल घेणे...

‘छोटू भैय्या बॅट बॉल खेळ…’, उर्वशी रौतेलाचा ऋषभ पंतवर पलट वार

मुंबई : काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला आणि ऋषभ पंत यांच्यात काहीतरी वाद सुरू असल्याची चर्चा होती. मात्र, हे प्रकरण समोर येण्याआधीच...

Most Popular

‘लाल सिंह चड्ढा’च्या तुलनेत ‘रक्षा बंधन’ पडला मागे! पाहा पहिल्या दिवसाचे कलेक्शन…

Raksha Bandhan Box Office Collection Day 1: बॉलिवूडचा खिलाडी कुमार अर्थात अभिनेता अक्षय कुमारचा (Akshay Kumar) ‘रक्षा बंधन’...

CWG 2022: कॉमनवेल्थ गेम्समध्ये वाटले गेले तब्बल 1.5 लाख Condoms, पण का?

कॉमनवेल्थच्या आयोजकांनी 12 दिवसांत 1.5 लाख कंडोमचं वाटप केलं होतं. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार...

तांदळाचे दरही आता वाढणार?; भातपिकाखालील क्षेत्रात १३ टक्क्यांनी घट

वृत्तसंस्था, नवी दिल्लीमहागाईपाठोपाठ देशात तांदूळटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. चालू खरीप हंगामात पाच ऑगस्टपर्यंत देशातील भातपिकाखालील क्षेत्रात १३ टक्क्यांनी घट झाली असून, कमी...

Hair Care : केसांना मुळापासून मजबूत बनवा, ‘या’ टिप्स वापरा

Hair Care Tips : आपल्या व्यस्त आणि चुकीच्या जीवनशैलीचा परिणाम आपल्या केसांवरही होताना दिसतो. अनेक जण सध्या केसांच्या...

12th August 2022 Important Events : 12 ऑगस्ट दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

12th August 2022 Important Events : ऑगस्ट महिना सुरु झाला आहे. याचबरोबर श्रावण महिन्यालाही सुरुवात झाली आहे. श्रावण...

सुपर चषक फुटबॉल : रेयाल माद्रिदला जेतेपद; अलाबा, बेन्झिमाच्या गोलमुळे एनट्रॅक फ्रँकफर्टवर मात

एपी, हेलसिंकी : डेव्हिड अलाबा आणि कर्णधार करीम बेन्झिमा यांनी केलेल्या गोलच्या बळावर स्पॅनिश संघ रेयाल माद्रिदने जर्मन संघ एनट्रॅक फ्रँकफर्टवर २-० अशी...