Friday, August 12, 2022
Home करमणूक ढालेपाटलांच्या सुना काही ऐकत नाहीत बुवा! शिवानीने शेअर केला ढिनच्यॅक video

ढालेपाटलांच्या सुना काही ऐकत नाहीत बुवा! शिवानीने शेअर केला ढिनच्यॅक video


मुंबई 6 जुलै: (Colors Marathi) कलर्स मराठीवरील ‘राजा रानीची गं जोडी’ (Raja Ranichi Ga Jodi) मालिकेची सध्या खूप चर्चा होताना दिसत आहे. काहीच दिवसांपूर्वी या मालिकेने सातशे भागांचा टप्पा पूर्ण केला होता. ऑन स्क्रीन असो किंवा ऑफ स्क्रीन या मालिकेची टीम कायमच एकत्र धमाल करत असते. या मालिकेत संजीवनी ढालेपाटील अर्थात शिवानी सोनार (Shivani Sonar) ही अभिनेत्री सध्या बरीच लोकप्रिय होताना दिसत आहे. शिवानीने मालिकेतील अभिनेत्रींसोबत धमाल करताना एक व्हिडिओ शेअर केला आहे.
या मालिकेतील पात्रांची कायम चर्चा होताना दिसते. सध्या ढालेपाटलांच्या तीनही सुना मिळून एकदम कमाल नृत्य करताना दिसत आहेत. शिवानीने हा खास व्हिडिओ शेअर केला आहे.
या व्हिडिओमध्ये इन्स्टाग्रामवर प्रचंड फेमस होणाऱ्या एका गाण्यावर या तिन्ही अभिनेत्री थिरकताना दिसत आहेत. या गाण्याला मराठी तडका दिलेला असून अस्सल मराठमोळ्या अंदाजात या तिघी नृत्य करताना दिसत आहेत.
ढोलिकचा ताल, घुंगरांची हलकी साथ असलेलं हे गाणं सध्या इन्स्टाग्रामवर तुफान लोकप्रियता मिळवताना दिसत आहे. याआधी सायली संजीव, नितीश चव्हाण, रुपाली भोसले या कलाकारांनी सुद्धा या गाण्यावर रील बनवलं होतं आणि आता ढालेपाटलांच्या तिन्ही सुना सुद्धा या ट्रेंडचा एक भाग झाल्या आहेत.
हे ही वाचा- मृण्मयीनं पुन्हा केली गौतमीची चंपी! मोठ्या भावंडांसाठी अभिनेत्रीनं आणलाय मान्सून स्पेशल भन्नाट VIDEO
शिवानी इन्स्टाग्रामवर (Shivani Sonar instagram) बरीच ऍक्टिव्ह असते. ती अनेक bts व्हिडिओ म्हणा किंवा ऑफ स्क्रीन चालू असणारी धमाल सुद्धा अनेकदा शेअर करत असते. तिच्या या रिलमध्ये तिच्यासोबत अभिनेत्री श्रुती अत्रे (Shruti Atre) आणि ऐश्वर्या शिंदे (Aishwarya Shinde) सुद्धा दिसत आहेत.

मालिकेत संजीवनी एका गुन्हेगाराला बेदम मारताना दिसते आणि तिच्या या कृत्यामुळे रणजित ढालेपाटील तिला सक्तीच्या रजेवर पाठवतो. तिचं डोकं ठिकाणावर नाही असं कारण देऊन तिला या रजेवर पाठवलं जातं असं नव्या प्रोमोमध्ये दिसून येत आहे. प्रोमोमध्ये जरी तणाव वाढवणारं दृश्य दिसत असेल तरी ऑफ स्क्रीन मात्र मालिकेतील कलाकार एकदम ढिनच्यॅक नाच करताना दिसत आहेत. त्यांच्या या व्हिडिओला चाहत्यांची बरीच पसंती मिळाली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#ढलपटलचय #सन #कह #ऐकत #नहत #बव #शवनन #शअर #कल #ढनचयक #video

RELATED ARTICLES

सर्वसामान्य दाम्पत्याची ‘असामान्य’ कहाणी; दत्तक मुलीचा आज सर्वानाच अभिमान

गांधीनगर, 12 ऑगस्ट : अनेकजण विरोध झुगारुन असे काही निर्णय घेतात की कालांतराने ते समाजासाठी एक आदर्श उदाहरण बनतात. ही माणसं समाजात आपली...

कोयना धरणाचे 6 वक्री दरवाजे दीड फुटांनी उचलले, 10 हजार 100 क्युसेकने नदीत पाण्याचा विसर्ग 

Koyna Dam : कोयना धरणाची पाणीपातळी 2 हजार 147 फुटांवर गेली असून एकूण पाणीसाठा 85.31 टीएमसी झाला आहे....

Paytm New Feature: तुमची ट्रेन कोणत्या प्लॅटफॉर्मवर येणार? कितीला पोहचणार? आता लगेच समजणार

मुंबई: अनेकदा प्रवाशांना रेल्वे (Railway) प्रवासापुर्वी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. ट्रेनची वाट पाहत असताना ती नेमकी कोणत्या प्लॅटफॉर्म येईल याची माहिती नसते....

Most Popular

दुसऱ्या पक्षातील आमदार कधी फोडलेत का? पकंजा मुंडेंनी दिलं बेधडक उत्तर

मुंबई, 11 ऑगस्ट :   झी मराठीवर नव्या सुरू झालेल्या बस बाई बस हा कार्यक्रम अल्पावधीतच प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतोय. अभिनेता सुबोध भावे सुत्रसंचालन...

Sri Lanka Crisis : श्रीलंकेच्या माजी राष्ट्रपतींना सोडावं लागलं सिंगापूर, आता ‘या’ देशात आश्रय

Sri Lanka Crisis : श्रीलंकेचे (Sri Lanka) माजी राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे (Gotabaya Rajapaksa) यांनी श्रीलंकेतून पलायन करत सिंगापूरमध्ये...

दैनंदिन राशीभविष्य: धनु राशीसाठी आज सांभाळून राहण्याचा दिवस; तर कुंभ राशीला लाभ

आज दिनांक १२ऑगस्ट २०२२. वार शुक्रवार. पौर्णिमा समाप्ती सकाळी ७ .२३.आज चंद्र धनिष्ठा नक्षत्रात असेल. पाहुया आजचे बारा राशींचे भविष्य. मेष दिवस आनंद निर्माण करणारा...

ऋषी सुनक घेत आहेत केजरीवाल पॅटर्नचा आधार? ब्रिटनमध्ये वीजबिलावरील व्हॅट कमी करण्याचं आश्वासन

British PM Race : ब्रिटन (UK) पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आघाडीवर असलेले भारतीय वंशाचे ऋषी सुनक (Rishi Sunak) यांनी एक...

Coronavirus : देशात नवे 18053 कोरोनाबाधित, सक्रिय रुग्णांची संख्या 1 लाख 23 हजारांवर

Coronavirus Cases Today in India : देशातील कोरोना संसर्गामध्ये पुन्हा एकदा वाढ झाली आहे. आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना...

श्रावणात वरदलक्ष्मी व्रत का केले जाते? जाणून घ्या पूजा, विधी आणि महत्त्व

Varad Lakshmi Vrat 2022 : श्रावण मासातील शुक्लपक्षात येणाऱ्या शेवटच्या शुक्रवारी वरदलक्ष्मी हे व्रत करतात. पूर्वी ज्यांनी हे...