Thursday, May 26, 2022
Home मुख्य बातम्या डी कंपनीशी संबंध, मोठा घातपात घडवण्याचा कट, आरोपी कोर्टात म्हणतात आम्ही देशभक्त

डी कंपनीशी संबंध, मोठा घातपात घडवण्याचा कट, आरोपी कोर्टात म्हणतात आम्ही देशभक्त


मुंबई, 13 मे : टेरर फंडींग प्रकरणात एनआयएने (NIA) अटक केलेले आरोपी आरीफ शेख आणि शब्बीर शेख यांना मुंबई सत्र न्यायालयाने 20 मे पर्यंत NIA कोठडी सुनावली आहे. एनआयएने (NIA) अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) याच्याशी संबंधीत छापेमारी दरम्यान दोन्ही आरोपींना आज सकाळी मुंबईतून ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली होती. या दोन्ही आरोपींना आज मुंबई सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं. यावेळी NIAची बाजू मांडणाऱ्या वकिलांनी खळबळजनक खुलासे केले.

मुंबई सत्र न्यायालयात NIAचे वकील संदिप सदावर्ते यांनी युक्तीवाद केला. “दोन्ही आरोपी हे डी कंपनीशी संबंधित आहेत. डी कंपनीचे तार अनेक दहशतवादी संघटनाशी जोडलेले आहेत. देशात घातपात घडवून आण्याचा मोठा कट होता. पकडलेले आरोपी डी कंपनीचे हस्तक असून मनी लान्ड्रिंग सारख्या गुन्ह्यात गुंतलेले आहेत. आरोपींचे काही संशयास्पद आर्थिक व्यवहाराचे पुरावे तपास यंत्रणांच्या हाती लागले आहेत. एनआयएने केलेल्या कारवाईत आरोपींकडून 5 लाखांची रोकड जप्त केली आहे. दोन्ही आरोपी डी कंपणीसाठी हवाला ॲापरेट करायचे. मुंबई पश्चिम उपनगरात डी कंपणीचे सर्व व्यवहार दोघे आरोपी पहायचे”, असा दावा वकिलांनी केला आहे.

“दोन्ही आरोपी हे छोटा शकीलच्या संपर्कात आहेत. छोटा शकील पाकिस्तानातून जे क्रिमिनल सिंडिकेट चालवतो त्या सिंडिकेटमध्ये दोन्ही आरोपी महत्वाची भूमिका बजावतात. तसेच खंडणी, अंमली पदार्थ तस्करी, दहशतवादी कृत्य यांत या दोन्ही आरोपींचा सक्रिय सहभाग असल्याचे पुरावे आढळले आहेत”, अशी भूमिका NIA वकिलांनी मांडली. “हे दोन्ही आरोपी दाऊद आणि छोटा शकलीच्या संपर्कात होते असे NIAकडे पुरावे आहेत. त्यामुळे या दोघांच्या मार्फत दाऊद आणि छोटा शकीलचे लोकेशन काढायचे आहे”, असादेखील युक्तीवाद NIAच्या वकीलांनी कोर्टात केला.

(महाविकास आघाडी सरकारकडून अखेर राज ठाकरेंसाठी Y प्लस दर्जाची सुरक्षा, पण….)

यावेळी दोन्ही आरोपींनी कोर्टात ‘सारे जहाँ से’ अच्छा हे देशभक्ती गीत म्हटलं. आम्ही काहीही केलेलं नाही. आम्ही आमच्या देशावर प्रेम करतो. सारे जहाँ से अच्छा हिन्दोसताँ हमारा, असं ते म्हणाले. यावेळी न्यायमूर्तींनी आरोपींना कुटुंबीयांना सांगितलं आहे का? सरकारी वकिल हवा आहे का? असे प्रश्न विचारले. दोन्ही आरोपींनी सरकारी वकिलाची मागणी केली. सुनावणीअंती न्यायालयाने दोन्ही आरोपींना 20 मे पर्यंत NIA कोठडी सुनावली

दरम्यान, “दोन्ही आरोपींना छोटा शकील याच्याकडून पैसे येत होते. त्या पैशांमधून आरोपी मुंबईत टेरर फंडींग करत होते. तसेच त्या पैशांतून ते बऱ्याच ठिकाणी टेरर फंडींग करत होते, असे त्यांचे आरोप आहेत. अनेक राजकीय नेते त्यांच्या टार्गेटवर होते. त्यांच्याकडे राजकीय नेत्यांची लिस्ट आहे. याशिवाय अनेक राजकीय नेते यांच्या संपर्कात होते. याबाबत चौकशी करण्यासाठी NIAला त्यांची कोठडी हवी आहे”, अशी प्रतिक्रिया आरोपींची वकील अपेक्षा वोरा यांनी दिली.

तुमच्या शहरातून (मुंबई)

Published by:Chetan Patil

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#ड #कपनश #सबध #मठ #घतपत #घडवणयच #कट #आरप #करटत #महणतत #आमह #दशभकत

RELATED ARTICLES

IPL : मॅचवेळी मैदानात घुसला प्रेक्षक, पोलिसांनी पकडताच विराटने दिली अशी रिएक्शन

मुंबई, 26 मे : आयपीएल 2022 च्या (IPL 2022) एलिमिनेटरचा सामना बुधवारी आरसीबी आणि लखनऊ सुपर जाएंट्स (RCB vs LSG) यांच्यात झाला, या...

शेंगदाणा की सूर्यफूल? कोणतं खाद्यतेल आहे शरीरासाठी सर्वात चांगलं आणि का?

मुंबई, 26 मे : भारतातील खाद्यसंस्कृती खूप भव्य आणि विस्तृत आहे. आपल्याकडे अतिशय वैविध्यपूर्ण पदार्थ बनवले जातात. प्रत्येक संस्कृतीतील लोकांच्या अन्नपदार्थ बनवण्याच्या पद्धती...

‘हा लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार’, संयमी एकनाथ शिंदे भडकले

मुंबई, 26 मे : शिवसेनेचे (Shiv Sena) ठाण्यातील बडे नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी परिवहन मंत्री अनिल परब...

Most Popular

टेरर फंडिंग प्रकरणात यासिन मलिकला जन्मठेप; वाचा मलिकवरील कारवाईची संपूर्ण टाईमलाईन

Yasin Malik Timeline : काश्मीरमधील फुटीरतावादी नेता यासिन मलिकला दहशतवाद्यांना आर्थिक मदत केल्याप्रकरणी कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. एनआयए कोर्टाने...

मुलांच्या आहारात फळं-भाज्या असायला हव्या; त्यांच्या एकाग्रतेमध्ये असा होतो फायदा

नवी दिल्ली, 26 मे : आजच्या जीवनशैलीत फास्ट-फूडच्या वाढत्या वापरामुळे आहारातील फळे आणि भाज्यांचा वापर कमी झाला आहे. त्यामुळे शरीरात अनेक प्रकारच्या नैसर्गिक...

कुत्रा बनण्याची हौस पूर्ण करण्यासाठी खर्च केले 11 लाख, फोटो पाहून व्हाल शॉक

नवी दिल्ली 26 मे : जगातील प्रत्येक माणसाचे विचार आणि आवडीनिवडी वेगवेगळ्या असतात. तर काही लोक मात्र वेगळं काहीतरी करण्यासाठी आपल्या शरीरासोबतही भयंकर...

Iron Rich Food : लाल रंगांच्या फळांमध्ये आहे लोहाची कमतरता दूर करण्याची क्षमता

Iron Rich Food : लाल रंगांच्या फळांमध्ये आहे लोहाची कमतरता दूर करण्याची क्षमता अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि...

Airtel: अवघ्या १४९ रुपयात घ्या १५ ओटीटी आणि १०,५०० चित्रपटांचा आनंद; पाहा ‘हा’ शानदार प्लान

नवी दिल्ली :Airtel Xstream Premium: Netflix, Amazon Prime Video आणि इतर प्लॅटफॉर्म्सचे सबस्क्रिप्शन घेण्यासाठी शेकडो रुपये खर्च करावे लागतात. परंतु, या सर्व प्लॅटफॉर्म्सचा...

Anil Parab : अनिल परब यांच्यासह मुंबईतील ‘या’ शिवसैनिकाच्या घरी ईडीचा छापा

ED Raids Anil Parab : राज्याचे परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांच्या निवासस्थानावर ईडीने आज सकाळी...