Friday, August 12, 2022
Home क्रीडा डायमंड लीग अ‍ॅथलेटिक्स : नीरज चोप्रा दुसऱ्या स्थानी

डायमंड लीग अ‍ॅथलेटिक्स : नीरज चोप्रा दुसऱ्या स्थानीपीटीआय, स्टॉकहोम : ऑलिम्पिक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्राने प्रतिष्ठेच्या डायमंड लीग अ‍ॅथलेटिक्समध्ये गुरुवारी ८९.९४ मीटर अंतरासह स्वत:चाच राष्ट्रीय विक्रम मोडीत काढत दुसरे स्थान मिळवले. मात्र, तारांकित खेळाडूंचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत त्याला ९० मीटरचा टप्पा गाठण्यात थोडक्यात अपयश आले.

२४ वर्षीय नीरजने पहिल्याच प्रयत्नात ८९.९४ मीटर अंतर पार करत आपला ८९.३० मीटर अंतराचा राष्ट्रीय विक्रम मोडला. हा विक्रम त्याने पावो नुर्मी क्रीडा स्पर्धेदरम्यान प्रस्थापित केला होता. ९० मीटर अंतरापर्यंत पोहोचण्यापासून तो अवघे सहा सेंटीमीटर दूर राहिला. अखेर तीच नीरजची सर्वोत्तम कामगिरी ठरली आणि त्याला दुसऱ्या स्थानी समाधान मानावे लागले. नीरजने आपल्या इतर प्रयत्नांत ८४.३७ मीटर, ८७.४६ मीटर, ८४.७७ मीटर, ८६.६७ मीटर आणि ८६.८४ मीटर अंतरावर भाला फेकला.

जागतिक विजेत्या आणि हंगामात चमकदार कामगिरी करणाऱ्या ग्रेनाडाच्या अँडरसन पीटर्सने आपल्या तिसऱ्या प्रयत्नात ९०.३१ मीटर अंतर भाला फेकत अग्रस्थान मिळवले. जर्मनीचा जुलिआन वेबर ८९.०८ मीटर अंतरासह तिसरा आला. तर, टोक्यो ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता चेक प्रजासत्ताकचा जाकुब वाद्लेचला (८८.५९ मीटर) चौथ्या स्थानी समाधान मानावे लागले.

नीरजने या महिन्यात दोनदा अँडरसनहून सरस कामगिरी केली. टुर्कू येथे झालेल्या स्पर्धेत ग्रेनाडाचा खेळाडू तिसरा स्थानी होता, तर कुओर्टेन क्रीडा स्पर्धेत नीरजने ८६.६९ मीटर अंतरासह सुवर्ण कामगिरी केली.

नीरजने पहिल्याच प्रयत्नात चमक दाखवत डायमंड लीग स्पर्धेचे जेतेपद मिळवणारा पहिला भारतीय बनू शकला असता. मात्र, अव्वल तिघांमध्ये स्थान मिळवणारा तो दुसरा भारतीय खेळाडू ठरला. यापूर्वी, थाळीफेकपटू विकास गौडाने दुसरे स्थान मिळवले होते. २०१४ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या गौडाने या स्पर्धेत आपल्या कारकीर्दीत चार वेळा अव्वल तीन खेळाडूंमध्ये स्थान पटकावले होते.

नीरजने चार वर्षांत पहिल्यांदाच डायमंड लीगमध्ये सहभाग नोंदवला होता. यापूर्वी, तो २०१७ मध्ये तीन व २०१८ मध्ये चार स्पर्धेत सहभागी झाला होता. युजिन (अमेरिका) येथे १५ ते २४ जुलै दरम्यान होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेपूर्वी नीरजसाठी ही महत्त्वाची स्पर्धा होती.

पहिल्या प्रयत्नात ९० मीटर अंतर पार करेन असे मला वाटले होते. पण, तसे झाले नाही. परंतु आगामी स्पर्धामध्ये हे अंतर पार करण्याचा माझा प्रयत्न राहील. यावेळी अव्वल ठरता आले नसले, तरीही सर्वोत्तम कामगिरी केल्याने मी आनंदी आहे.

– नीरज चोप्रा, भालाफेकपटू अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#डयमड #लग #अथलटकस #नरज #चपर #दसऱय #सथन

RELATED ARTICLES

आशिया खंडातील दुसऱ्या सगळ्यात मोठ्या होर्डिंगवर झळकलं दगडी चाळ 2 चं पोस्टर

मुंबई, 12 ऑगस्ट-   मराठी चित्रपटांची सध्या चांगलीच हवा दिसून येत आहे. नुकतंच 'चंद्रमुखी' या मराठी चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान चित्रपटाचं पोस्टर चक्क विमानावर झळकलं...

पालिकेच्या वॉर्ड पुनर्रचनेत बदल, शिवसेना सर्वोच्च न्यायालयात जाणार 

Shivsena : शिंदे आणि फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर मुंबई महानगर पालिकेच्या (mumbai municipal corporation) वॉर्ड पुनर्रचनेत बदल करण्यात...

जगातील सर्वात प्राचीन भाषा अशी ओळख असलेल्या संस्कृत दिनाचा इतिहास काय? जाणून घ्या सविस्तर

World Sanskrit Day 2022 : हिंदू दिनदर्शिकेनुसार श्रावण (Shravan 2022) महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेच्या दिवशी संस्कृत दिवस साजरा केला...

Most Popular

तुम्ही धोका दिलात; BCCI च्या निर्णयावर चाहते भडकले, जाणून घ्या झालं

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघ १८ ऑगस्टपासून झिम्बाब्वेविरुद्ध वनडे मालिका खेळणार आहे. ३ सामन्यांच्या या वनडे मालिकेसाठी भारतीय संघ लवकरच झिम्बाब्वेला रवाना होणार...

सांगलीत पुराचा धोका! कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ; पूरपट्ट्यातील नागरिकांना स्थलांतराच्या सूचना

Sangli Flood:संततधार पावसामुळेकृष्णा नदीच्या (Sangli Krushna River) पाणीपातळीत वाढ झाली आहे. सोबतच आज कोयनेतून विसर्ग (Koyna Dam)वाढवण्यात येणार...

अल्टिमेट खो-खो लीग : खो-खोपटू विजय हजारेची संघर्षगाथा..

संदीप कदम मुंबई : पानपट्टीचा व्यवसाय करणाऱ्या इचलकरंजीच्या सामान्य कुटुंबातील विजय हजारे पहिल्या अल्टिमेट खो-खो लीगमध्ये मुंबई खिलाडीज संघाचे नेतृत्व करणार आहे. प्रतिकूल परिस्थितीत...

Girish Mahajan at Jalgaon : मंत्रिपदी वर्णी लागल्यानंतर गिरीश महाजन यांचं जळगावात जंगी स्वागत

Girish Mahajan at Jalgaon : शिंदे-फडणवीस सरकारमध्ये कॅबनेट मंत्रिपदी वर्णी लागल्यानंतर गिरीश महाजन (Girish Mahajan) आज प्रथमच जळगावमध्ये...

जगातील पहिला असा Smartphone,बॉडीला चिकटणारे Earbuds; पाण्यात होणार नाही खराब, किंमत जाणून घ्या

मुंबई : Smartphone News : Ulefone ने किकस्टार्टर वर बिल्ट-इन TWS इअरबड्ससह जगातील पहिला तगडा स्मार्टफोन Ulefone Armor 15 लॉन्च केला आहे. Armor 15 के साथ...

Coronavirus : देशात नवे 18053 कोरोनाबाधित, सक्रिय रुग्णांची संख्या 1 लाख 23 हजारांवर

Coronavirus Cases Today in India : देशातील कोरोना संसर्गामध्ये पुन्हा एकदा वाढ झाली आहे. आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना...