Friday, May 20, 2022
Home लाईफस्टाईल डायबेटिज असला तरी ही 5 फळं खायला हरकत नाही; शुगर लेव्हलसुद्धा नियंत्रणात...

डायबेटिज असला तरी ही 5 फळं खायला हरकत नाही; शुगर लेव्हलसुद्धा नियंत्रणात राहिल


नवी दिल्ली, 14 मे : मधुमेहाच्या रुग्णांसाठी सर्वात मोठे आव्हान म्हणजे त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करणे. रक्तातील साखर वाढू लागल्यास मधुमेह कधीही नियंत्रणात ठेवता येत नाही. एकदा का कोणाला या आजाराचे निदान झाले की, सर्वप्रथम अन्नावर बंधने येतात. साखरेची पातळी वाढेल, असे कोणतेही पदार्थ खाऊ नयेत. मधुमेही रुग्णांना आहाराबाबत अनेकदा शंका असते. सर्वात मोठा गोंधळ हा फळांच्याबाबतीत होतो. माहिती नसल्यामुळे बहुतेक लोक अनेक प्रकारची फळे खात राहतात, ज्यामुळेही साखरेची पातळी (Fruits which Control Sugar Level) वाढते.

वास्तविक, फळांमध्ये नैसर्गिकरीत्या साखरेचे प्रमाण असते, जे कृत्रिम साखरेप्रमाणे रक्तातील साखर वाढवते. पण फळांमध्ये असलेली ही नैसर्गिक साखर फार हानिकारक नसते. मधुमेहींनी कोणतेही फळ मर्यादित प्रमाणात खावे. फळांमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि इतर पोषक घटक भरपूर प्रमाणात असल्याने, त्यांना आहारातून पूर्णपणे काढून टाकणे योग्य नाही. साखरेची पातळी नियंत्रणात ठेवणाऱ्या फळांचे सेवन करायचे असेल तर खालील फळांचा आहारात समावेश करणे आवश्यक आहे.

शुगर लेव्हल कंट्रोलसाठी पीच –

TOI मध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, पीच हे असेच एक फळ आहे, जे मधुमेही रुग्ण खाऊ शकतात. त्यात फायबर जास्त असते. जीवनसत्त्वे ए, सी, पोटॅशियमने समृद्ध असलेले हे फळ आहे. पीचमध्ये असलेले बायोएक्टिव्ह कंपाऊंड लठ्ठपणा आणि मधुमेहामुळे होणाऱ्या आरोग्याच्या समस्यांशी देखील लढू शकते. दररोज पीच खाल्ल्याने जळजळ, रोगप्रतिकारक शक्ती आणि पचन सुधारण्यास मदत होते.

जांभूळ –

इन्सुलिन संवेदनशीलता नीट करण्यासाठी जांभळाचा आयुर्वेदात वर्षानुवर्षे वापर केला जात आहे. या फळामध्ये साखरेचे प्रमाण कमी असते. याचे दररोज सेवन केल्यास रक्तातील साखरेची पातळी बर्‍याच अंशी नियंत्रित ठेवता येते. खरं तर, काही काळ्या फळांमध्ये असलेले संयुगे आणि अँटिऑक्सिडंट्स स्टार्चला उर्जेमध्ये रूपांतरित करण्यात आणि रक्तातील साखरेची पातळी राखण्यास मदत करतात.
पेरू –

कमी कॅलरी आणि फायबरने समृद्ध असलेला पेरू हळूहळू पचतो. तो पेशींद्वारे हळूहळू शोषला जाऊ लागतो. त्यामुळे इतर फळांप्रमाणे रक्तातील साखरेची पातळीही वाढत नाही. त्यात संत्र्यापेक्षा 4 पट जास्त व्हिटॅमिन सी असते. याव्यतिरिक्त, त्यात सोडियम कमी आणि पोटॅशियम जास्त आहे. हे पोषक घटक रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि जुनाट आजार होण्याचा धोका कमी करण्यासाठी देखील फायदेशीर आहेत.

हे वाचा – लाल आणि गोड कलिंगड सहज ओळखू शकाल; खरेदी करताना होणार नाही फसगत

पपई –

पपई खाऊन तुम्ही रक्तातील साखरेची पातळी कमी करू शकता. एका अहवालानुसार, पपईचा शरीरावर हायपोग्लायसेमिक प्रभाव पडतो. त्यात फ्लेव्होनॉइड्स देखील असतात, जे एक नैसर्गिक अँटिऑक्सिडेंट आहेत. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होऊ शकते. यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट पेशींचे नुकसान टाळू शकतात. वजन वाढू देत नाहीत. कमी-कॅलरी फळामध्ये बी जीवनसत्त्वे, फोलेट, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम देखील भरपूर असते.

हे वाचा – केसांसाठी कधी पेरूची पानं वापरलीयत का? अनेक प्रॉब्लेम्सवर आहे सोपा घरगुती उपाय

सफरचंद –

सफरचंद फायबर आणि पोषक तत्वांनी समृद्ध असतात, परंतु फ्रक्टोजचे प्रमाण सर्वात कमी असते. सफरचंद हे देखील एक उत्तम फळ आहे, ज्याचा आहारात समावेश केला पाहिजे. त्यात विरघळणारे आणि अघुलनशील दोन्ही फायबर असतात, जे बद्धकोष्ठता प्रतिबंधित करते. तुम्हाला दीर्घकाळ पोट भरल्यासारखे वाटते. फायबरमुळे पचन प्रक्रिया आणि साखरेचे शोषण कमी होते. याचा अर्थ साखर हळूहळू रक्तप्रवाहात प्रवेश करते आणि रक्तातील साखरेची पातळी वाढत नाही.

(सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही, हे उपाय करण्यापूर्वी तुमच्या वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#डयबटज #असल #तर #ह #फळ #खयल #हरकत #नह #शगर #लवहलसदध #नयतरणत #रहल

RELATED ARTICLES

राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावर प्रश्नचिन्ह, दौरा स्थगित होण्याची शक्यता

मुंबई, 20 मे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे 5 जून रोजी अयोध्या दौऱ्यावर (Raj Thackeray Ayodhya Tour) जाणार आहेत. मात्र,...

अनशा पोटी हे खाल्लंत तर दररोज पोट होईल साफ; कधीच होणार नाही बद्धकोष्ठतेचा त्रास

दिल्ली, 19 मे: जीवनशैलीतले बदल अनेक व्याधींना आमंत्रण देतात. बदललेल्या जीवनशैलीत (Lifestyle) आहार तर बदलतोच, शिवाय व्यायामाचाही अभाव असतो. खाण्यापिण्याच्या वेळा बदलत असतात....

Heavy Rain: वादळी पावसाचा कहर; 25 जणांचा मृत्यू, सहा बोटी बुडाल्या

पाटणा, 20 मे: बिहारमध्ये गुरुवारी वादळी (storm) पावसाने (Heavy rain) कहर केला. बिहारच्या (Bihar) अनेक भागांमध्ये गुरुवारी 25 ते 60 किमी प्रतितास वेगाने...

Most Popular

Oppo Smartphones: लवकरच लाँच होणार Oppo Reno 8 Series चे तीन स्मार्टफोन्स, ५० MP कॅमेरासह मिळतील हे फीचर्स

नवी दिल्ली : Upcoming Oppo Smartphones: Oppo आपली आगामी Reno 8 स्मार्टफोन सीरीज २३ मे रोजी चीनमध्ये लाँच करणार असून रिपोर्ट्सनुसार, आगामी फ्लॅगशिप...

Heavy Rain: वादळी पावसाचा कहर; 25 जणांचा मृत्यू, सहा बोटी बुडाल्या

पाटणा, 20 मे: बिहारमध्ये गुरुवारी वादळी (storm) पावसाने (Heavy rain) कहर केला. बिहारच्या (Bihar) अनेक भागांमध्ये गुरुवारी 25 ते 60 किमी प्रतितास वेगाने...

Monkeypox Outbreaks : आफ्रिकेत ‘मंकीपॉक्स’चा उद्रेक! नवीन रोगामुळे शास्त्रज्ञांसमोर आव्हान

Monkeypox Outbreaks : गेल्या दोन वर्षांपासून, संपूर्ण जग आधीच कोरोना (Corona) महामारीने हैराण झाले आहे आणि लाखो लोकांना...

केतकीला समज देऊन सोडून दिलं पाहिजे, पंकजा मुंडेंचा राष्ट्रवादीला सल्ला

मुंबई, 19 मे -राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांच्याबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्या प्रकरणी अभिनेत्री केतकी चितळे ( Ketaki Chitale Case...

कांद्याने केला पुन्हा वांदा, देशातील कांदा उत्पादक पुन्हा संकटात; दरात मोठी घसरण

मुंबई, 19 मे : किमान आधारभूत किमतीपेक्षा (msp) 2-4 रुपये किलोने अधिक भाव मिळाल्याने शेतकऱ्यांना चांगले दिवस आल्याचे चित्र दिसत आहे परंतु हे...