Thursday, July 7, 2022
Home लाईफस्टाईल डायबेटिजचं हे लक्षण केवळ रात्रीच दिसतं; जाणवत असेल तर वेळीच व्हा सावध

डायबेटिजचं हे लक्षण केवळ रात्रीच दिसतं; जाणवत असेल तर वेळीच व्हा सावध


मुंबई, 22 जून : डायबेटिस, म्हणजेच मधुमेहाची लक्षणं (Diabetes Symptoms) ही लवकर दिसून येत नाहीत. कित्येकांना रक्तातील साखरेचं प्रमाण अगदीच कमी किंवा जास्त झाल्यानंतरच मधुमेह झाला असल्याचं स्पष्ट होतं. जगभरात टाईप-2 डायबेटिसचे (Type 2 Diabetes) कित्येक रुग्ण आहेत. या प्रकारच्या डायबेटिसमध्ये रक्तातील साखरेचं प्रमाण (Blood Sugar level) अति वाढतं. डायबेटिसची इतर अनेक लक्षणं असली, तरी टाईप-2 डायबेटिसचं एक लक्षण (Diabetes special symptom) केवळ रात्रीच दिसून येतं. हे लक्षण वेळीच ओळखून तुम्ही भविष्यातील धोका टाळू शकता. आज तकने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

टाईप-2 डायबेटिसची लक्षणं

टाईप-2 डायबेटिसच्या (Type 2 Diabetes symptoms) लक्षणांमध्ये वारंवार तहान लागणं, थकवा जाणवणं, विनाकारण अचानक वजन कमी होणं, प्रायव्हेट पार्टला खाज सुटणं, एखादी जखम बरी होण्यास भरपूर वेळ लागणं, अस्पष्ट दिसणं अशा गोष्टींचा समावेश होतो.
टाईप-2 डायबेटिस तेव्हा होतो, जेव्हा आपल्या शरीरात इन्शुलिन तयार होण्याचं प्रमाण अगदी कमी होतं. इन्शुलिन हा हॉर्मोन रक्तातील ग्लुकोज लेव्हल (Glucose level in Blood) नियंत्रित ठेवतो. जेव्हा इन्शुलिनचं प्रमाण कमी होतं, तेव्हा ग्लुकोज रक्तपेशींमध्ये जमा होण्यास सुरूवात होते. असं होणं आपल्या आरोग्यासाठी हानीकारक असतं.

रात्री वारंवार लघवी लागल्यास व्हा सावध

टाईप-2 डायबेटिसची लागण झाल्यास रात्री वारंवार लघवी लागते. हे लक्षण केवळ रात्रीच आपल्याला दिसून येतं. रात्री वारंवार लघवी लागण्याचा अर्थ असा आहे, की तुमच्या शरीरातील जादाची ब्लड शुगर बाहेर टाकण्याची प्रक्रिया सुरू आहे. रात्री वारंवार लघवी लागणं हे इतर काही आजारांचंही लक्षण आहे. मात्र, हाय ब्लड शुगर हे याचं मुख्य कारण असल्याचं संशोधकांनी म्हटलं आहे.

त्वरित डॉक्टरांकडे जाणं गरजेचं

डायबेटिसच्या वरील लक्षणांपैकी कोणतंही लक्षण दिसून आलं, तर डॉक्टरांशी संपर्क साधणं गरजेचं असतं. डायबेटिसवर अद्याप रामबाण उपचार उपलब्ध नसला, तरी वेळीच निदान झाल्यास या आजाराला नियंत्रणात नक्कीच ठेवता येतो. डायबेटिसवर वेळीच उपचार सुरू केल्यास इतर अनेक आजारांपासून तुमचा बचाव होऊ शकतो.

हे वाचा – Eye Care : डोळ्यांना खाज आल्यावर चोळू नका; घरच्या घरी करा हे सोपे उपाय

रक्तातील साखरेचे (Diseases caused by High blood sugar level) प्रमाण वाढल्यास केवळ मधुमेहच नाही, तर हृदयविकार, पेरीफेरल आर्टरी डिसीज, स्ट्रोक, हृदयविकाराचा धक्का, किडनीचे आजार आणि दृष्टी जाणं वा अस्पष्ट दिसणं असे बरेच धोके असतात. नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ अँड केअर एक्सलन्सने (NICE) याबाबत इशारा दिला आहे.

हे वाचा – Skin And Hair Care : त्वचा आणि केसांचा तेलकटपणा घालवते तुरटी? वाचा आश्चर्यचकित करणारे फायदे

डायबेटिसच्या रुग्णांनी घ्यावी ही काळजी

डायबेटिसच्या रुग्णांना डॉक्टर त्यांच्या राहणीमानात बदल करण्याचा सल्ला देतात. खानपानाच्या सवयी, वेळा या निश्चित केल्यास जातात. अधिक साखर, फॅट किंवा मीठ असलेले पदार्थ टाळण्याचा सल्ला डॉक्टर या रुग्णांना देतात.

(सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#डयबटजच #ह #लकषण #कवळ #रतरच #दसत #जणवत #असल #तर #वळच #वह #सवध

RELATED ARTICLES

Indian Railways:PNRच्या 10 अंकांत काय दडलंय?प्रत्येक क्रमांकात असते विशेष माहिती

What is meaning of Indian Railway’s 10 digit PNR Number mhsa - Indian Railways: PNRमधील 10 अंकांत नेमकं काय दडलंय? प्रत्येक क्रमांकात असते...

Nora Fatehi : ‘डान्सिंग गर्ल’ नोरा फतेहीचा क्लासी लूक; फोटो चर्चेत!

Nora Fatehi : ‘डान्सिंग गर्ल’ नोरा फतेहीचा क्लासी लूक; फोटो चर्चेत! अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे...

Most Popular

‘राम देव नाही’, ‘मोदी PM झाले तर नागरिकत्त्व सोडेन’; ‘काली’ सिनेमाच्या दिग्दर्शिकेचे जुने Tweets Viral

मुंबई: 'काली' या माहितीपटाचं पोस्टर सोशल मीडियावर (Kaali Film Poster) वादाचं कारण ठरत आहे. यामुळे धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप माहितीपटाची दिग्दर्शिका 'लीना मणिमेकलई'...

OnePlus TV 50 Y1S Pro चा पहिला सेल आज, डिस्काउंटसह मोठ्या स्क्रिनचा टीव्ही स्वस्तात घरी येणार

नवी दिल्ली: OnePlus TV 50 Y1S Pro price: OnePlus ने या आठवड्याच्या सुरुवातीला Y सीरीज अंतर्गत एक नवीन स्मार्ट टीव्ही लाँच केला असून...

पीटी उषा, इलैयाराजांसह 4 दिग्गज राज्यसभेत, पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली, 6 जुलै : भारताची महान ऍथलीट पीटी उषा (PT Usha) यांची राज्यसभा खासदार (Rajya Sabha Nominated) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे....

‘विठ्ठल’च्या निवडणुकीत सत्ताधारी भालके गटाला मोठा हादरा, 18 वर्षानंतर सत्तांतर; दिग्गज पराभूत

Vitthal Sahkari Sakhar Karkhana Election :  पंढरपूर तालुक्याचे आर्थिक सत्ताकेंद्र असणाऱ्या विठ्ठल सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी गेल्या 24...

Top 10 Maharashtra Marathi News : स्मार्ट बुलेटिन : 07 जुलै 2022 : गुरुवार : एबीपी माझा

दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन,...

ब्रिटिश सरकारमधील बंड चिघळले, 48 तासांमध्ये 39 मंत्र्यांचे राजीनामे

मुंबई, 7 जुलै : ब्रिटनमधील बोरीस जॉन्सन (Boris Johnson) सरकार मोठ्या संकटात सापडले आहे. गेल्या 48 तासांमध्ये 5 कॅबिनेट मंत्र्यांसह 39 मंत्र्यांनी राजीनामे...