Saturday, August 13, 2022
Home विश्व डायनासोरपेक्षाही जुना उभयचर प्राणी आढळला; जाणून घ्या किती आहे धोकादायक

डायनासोरपेक्षाही जुना उभयचर प्राणी आढळला; जाणून घ्या किती आहे धोकादायक


वॉशिंग्टन: मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. हा फोटो एका प्राण्याचा आहे. दिसायला रबरा सारखा असलेला हा प्राणी एक उभयचर प्राणी आहे. दक्षिण फ्लोरिडामधील तामियामी कालव्यात हा प्राणी आढळून आला होता. या प्राण्याचा शोध फ्लोरिडातील फिश अॅण्ड वाइल्डलाइफ कंझर्व्हेशन कमिशने घेतला.

मियामी इंटरनॅशनल विमानतळापासून एक मैल अंतरावर आढळलेल्या या प्राण्याची ओळख पटवण्यास संशोधकांना बराच वेळ लागला. या प्राण्याला ‘सीसिलियन’ म्हणून ओळखले जाते. डीएनए चाचणीनंतर या प्राण्याची ओळख पटवली गेली. या प्राण्याला टाइफ्लोनेक्टेस नटान या नावानेही ओळखले जाते. ही प्रजाती डायनासोरच्या आधीपासून आढळली जाते.

वाचा:हवामान बदलाचा परिणाम; अडीच कोटी लोकसंख्येचे ‘हे’ शहर नष्ट होणार?

कोलमॅन शेही यांनी सांगितले की, या प्राण्याबाबत फार कमी माहिती उपलब्ध आहे. मात्र, हा प्राणी धोकादायक नाही हे स्पष्ट आहे. कोलमॅन हे फ्लोरिडा म्युझियम ऑफ नॅच्युअरल हिस्ट्रीमध्ये अधिकारी आहे. हा प्राणी हल्ला करत असावा असे वाटत नसल्याचेही सांगितले. हा प्राणी लहान प्राण्यांना खात असावा. तर, मोठे प्राणी याची शिकार करत असावेत.

वाचा: बद्धकोष्ठतेने त्रासलेल्या व्यक्तीने गुदाशयात सोडला आठ इंचाचा जिवंत मासा

दक्षिण फ्लोरिडामध्ये आढळलेल्या प्राण्याची प्रजाती ही अमेरिका बाहेरील देशात आढळणारी असावी असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सेसिलियन बहुतांशी वेळा दक्षिण आणि मध्य अमेरिका, आफ्रिका आणि दक्षिण आशियातील उष्णकटिबंधीय भागात आढळते.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#डयनसरपकषह #जन #उभयचर #परण #आढळल #जणन #घय #कत #आह #धकदयक

RELATED ARTICLES

24 वेळा पाहिला अनुष्काचा सिनेमा; तो सीन पाहून पेटवून घेतलं, तरुणाचा मृत्यू

या तरुणाने स्वतःवरच 20 लिटर पेट्रोल ओतून घेतलं आणि स्वतःलाच पेटवलं. या घटनेत तो गंभीररित्या भाजला. गंभीर अवस्थेच त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं,...

Track location: एखाद्या व्यक्तीचे लोकेशन ट्रॅक करता येते का? जाणून घ्या संपूर्ण माहिती…

मुंबई: आजकाल असे बरेच अ‍ॅप्स आले आहेत. ज्यांच्या मदतीने आपण अगदी सहजपणे एखाद्या व्यक्तीचे लोकेशन ट्रॅक करू शकतो. त्याचबरोबर त्या व्यक्तीच्या हालचालींवर लक्ष...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर, पूरस्थितीचा घेणार आढावा

CM Eknath Shinde : राज्याच्या विविध भागात सध्या मुसळधार पाऊस (Rain) कोसळताना दिसत आहे. या पावसामुळं नदी नाल्यांना...

Most Popular

सावधान! या 3 पेयांमुळे तुमचा मेंदू लवकर होऊ शकतो वृद्ध, पाहा कोणती आहेत ती पेय

मुंबई, 13 ऑगस्ट : ज्याप्रमाणे त्वचा, केस आणि शरीराला योग्य पोषण, आहार मिळाला नाही, तर वृद्धत्वाचा परिणाम त्यांच्यावर लवकर दिसून येतो, त्याचप्रमाणे आपला...

Salman Rushdie : प्रसिद्ध लेखक सलमान रश्दींवर न्यूयॉर्कमध्ये चाकूहल्ला, हल्लेखोराला अटक ABP Majha

<p>वादग्रस्त लिखाणामुळे अनेक वेळा जीवे मारण्याची धमकी मिळालेले, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ लेखक सलमान रश्दींवर अमेरिकेत प्राणघातक हल्ला झालाय.. न्यूयॉर्कमधील शुटाका इन्स्टिट्यूटमधील कार्यक्रमात भर...

पुण्यश्र्लोक महाराणी अहिल्याबाई होळकर यांची आज पुण्यतिथी; यानिमित्त जाणून घ्या त्यांचे जीवनचरित

Ahilyabai Holkar Death Aniversary : एक अतिशय दानशूर, कर्तृत्ववान, धर्मपरायण आणि कार्यक्षम राज्यकर्ती म्हणून अहिल्याबाई होळकर (Ahilyabai Holkar)...

Todays Headline 13th August : आज दिवसभरात घडणाऱ्या राष्ट्रीय आणि स्थानिक महत्त्वाच्या बातम्या 

मुंबई: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या सर्व घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत...

Track location: एखाद्या व्यक्तीचे लोकेशन ट्रॅक करता येते का? जाणून घ्या संपूर्ण माहिती…

मुंबई: आजकाल असे बरेच अ‍ॅप्स आले आहेत. ज्यांच्या मदतीने आपण अगदी सहजपणे एखाद्या व्यक्तीचे लोकेशन ट्रॅक करू शकतो. त्याचबरोबर त्या व्यक्तीच्या हालचालींवर लक्ष...