Friday, May 20, 2022
Home मुख्य बातम्या ठाकरे सरकारकडून महाराष्ट्राच्या जनतेला लुटण्याचं काम, किरीट सोमय्यांचा निशाणा

ठाकरे सरकारकडून महाराष्ट्राच्या जनतेला लुटण्याचं काम, किरीट सोमय्यांचा निशाणा


Kirit Somaiya on CM Uddhav Thackeray : बाळासाहेब ठाकरे हे असली आहेत तर उद्धव ठाकरे नकली आहेत असे म्हणत भाजपचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी हिंदुत्वाच्या मुद्यावरुन शिवसेनेवर टीका केली. तुमचं हिंदुत्व खोटं आहे. उद्धव ठाकरे हे डरपोक आहेत. त्यांनी एकाही घोटाळ्यावर स्पष्टता दिली नसल्याचे सोमय्या म्हणाले. असली कोण आणि नकली कोण हे जनतेला माहिती आहे. तुमच्या माफिया सेनेच्या 18 जणांची चौकशी सुरु असल्याचेही ते म्हणाले. 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची काल मुंबईतल्या बीकेसी मैदानावर जाहीर सभा झाली. जवळपास एक तास केलेल्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. एकंदर उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात  फडणवीसांना आणि भाजपला टार्गेट केलं. उद्धव ठाकरे यांनी यावेळी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. त्यांच्या या टिकेला सोमय्या यांनी आज उत्तर दिले. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा लगावला. वाशिम आणि पुण्यात शिवसैनिकांनी  माझ्यावर हल्ला केला असल्याचे सोमय्या म्हणाले.

संजय राऊत यांचा बोलवता धनी उद्धव ठाकरे हे आहेत. तुमचे अनेक मंत्री कोर्टात चकरा मारत आहेत. काही जेलमध्ये आहेत, तर काही रुग्णालयात आहेत असेही सोमय्या यावेळी म्हणाले. उद्धव ठाकरेंना न्यायालयाने उत्तर दिलं आहे. काल ते त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होतं असेही सोमय्या यावेळी म्हणाले.  तुमच्यात हिंम्मत असेल तर स्पष्ट करा की, ते 19 बंगले कोणाचे आहेत असेही ते म्हणाले. उद्धव ठाकरे हे डरपोक आहे. महाराष्ट्रच्या जनतेला लुटण्याचं काम उद्धव ठाकरे सरकार करत असल्याचा आरोप यावेळी सोमय्यांनी केला. तेजस ठाकरे यांनीही मनी लॉंड्रिंग केली आहे. रश्मी ठाकरेंबद्दल मला जास्त बोलायचे नाही. मात्र, यावेळी बोलताना सोमय्यांनी मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर जोरदार निशाणा लगावला. चमचागिरी करताना हे तर लक्षात ठेवा तुम्ही घोटाळे केलेत असे सोमय्या म्हणाले.
 

महत्त्वाच्या बातम्या:अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#ठकर #सरकरकडन #महरषटरचय #जनतल #लटणयच #कम #करट #समययच #नशण

RELATED ARTICLES

6 महिने कंबरदुखीने होता हैराण; डॉक्टरांना रुग्णाच्या किडनीत सापडले…

हैदराबाद, 20 मे : प्रत्येकाला आयुष्यात कधी ना कधी कंबरदुखीचा त्रास हा होतोच. अतिरिक्त काम, कंबरेवर ताण, झोपेच्या स्थितीमुळे कंबर दुखत असावी असं...

सदाभाऊ खोतांच्या ‘जागर शेतकऱ्याचा, आक्रोश महाराष्ट्राचा’ अभियानाचा आज समारोप, फडणवीसांची सभा

Devendra Fadnavis : शेतकरी प्रश्नासंदर्भात सरकारला जाग येण्यासाठी रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी 'जागर...

काँग्रेसकडून प्रकाश आंबेडकर यांना राज्यसभा उमेदवारीच्या चर्चांवर वंचित बहुजन आघाडीने म्हटलं..

मुंबई : काँग्रेसकडून राज्यसभेच्या उमेदवारीची माळ प्रकाश आंबेडकर यांच्या गळ्यात पडणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली असतानाच वंचित...

Most Popular

Todays Headline 20th May : आज दिवसभरात घडणाऱ्या महत्त्वाच्या बातम्या

मुंबई : आज दिवसभरात वेगवेगळ्या बातम्यांची ही नांदी आहे. ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं...

20 मे दिनविशेष, जाणून घ्या इतिहासातील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या घटना

20th May 2022 Important Events : मे महिना सुरू झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्त्व...

तलावाचा वापर न करता मत्सपालन करा तेही वर्षाला पाचपट फायद्यासह, जाणून घ्या पद्धत

मुरादाबाद, 19 मे : उत्तर प्रदेशच्या (uttar pradesh) मुरादाबाद जिल्ह्यातील माझोला परिसरात एका शेतकऱ्यांने मत्सपालनातून (Fish farming) विक्रमी उत्पादन घेतले आहे. माझोला या...

IPL 2022 : RCB च्या विजयाने आणखी दोन टीमचा द एण्ड, प्ले-ऑफचं स्वप्न भंगलं

मुंबई, 20 मे : आयपीएल 2022 (IPL 2022) आता शेवटाकडे येऊन ठेपली आहे. गुजरात टायटन्स (Gujarat Titans) आणि लखनऊ सुपर जाएंट्स (LSG) या...

अजय-अतुलमुळे झाला होता ‘पुष्पा’फेम गायकाचा बॉलिवूड डेब्यू

मुंबई 19 मे- दाक्षिणात्य इंडस्ट्रीमध्ये प्रसिद्ध असणारा गायक सिड श्रीराम (Sid Sriram) आज त्याचा 32 वा वाढदिवस साजरा करत आहे.  अत्यंत गोड आणि...

IPL: अंपायरच्या एका चुकीमुळे KKR प्ले-ऑफमधून बाहेर! रिंकूच्या विकेटमुळे नवा वाद

मुंबई, 20 मे : आयपीएल 2022 (IPL 2022) आता अखेरच्या टप्प्यावर येऊन पोहोचली आहे. प्ले-ऑफमध्ये आतापर्यंत दोन टीम पोहोचल्या आहेत, तर काही टीम...