Saturday, August 13, 2022
Home क्रीडा टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला एकाच दिवशी चार पदक जिंकण्याची संधी

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला एकाच दिवशी चार पदक जिंकण्याची संधी


टोकियो: ऑलिम्पिक २०२० मध्ये भारताच्या पदकांच्या खात्यात फक्त दोनच पदक असली तरी आज ४ ऑगस्ट रोजी यात दुप्पटीहून अधिक वाढ करण्याची संधी आहे. आतापर्यंत भारताने वेटलिफ्टिंगमध्ये रौप्य तर बॅडमिंडनटमध्ये कास्य पदक जिंकले आहे. वेटलिफ्टिंगमध्ये मीराबाई चून आणि बॅडमिंटनमध्ये पीव्ही सिंधूने पदक जिंकून दिले आहे.

वाचा- पहिल्याच ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राने अंतिम फेरी गाठली; पात्रता फेरीत अव्वल स्थानी

टोकियो ऑलिम्पिकमध्ये आज ४ ऑगस्ट रोजी भारतासाठी आनंदाचा दिवस ठरला आहे. भालाफेकमध्ये भारताचा नीरज चोप्रा अंतिम फेरीत पोहोचला आहे. त्याची फायनल ७ ऑगस्ट रोजी होईल. तर कुस्तीमध्ये रवी कुमार दहिया आणि दीपक पुनिया यांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. आज दुपारी महिला हॉकीमध्ये भारताचा संघ उपांत्य फेरीची लढत खेळणार आहे. बॉक्सिंगमध्ये लव्हलिन बोर्गोहेनने याआधीच पदक निश्चित केले आहे. लव्हलिनने कास्य पदक निश्चित केले असून आज होणाऱ्या उपांत्य फेरीत विजय मिळून पदकाचा रंग बदलण्याची संधी आहे. लव्हलिनने विजय मिळवल्यास बॉक्सिंगच्या अंतिम फेरीत जाणारी ती पहिली भारतीय ठरले.

वाचा- LIVE Tokyo Olympics 2021 : दंगल, दंगल; रवीकुमार, दीपक पुनिया सेमीफायनलमध्ये प्रवेश

कुस्तीमध्ये रवी कुमारची सेमीफायनल दुपारी २ वाजून ४५ मिनिटांनी होणार आहे. तर दीपक पुनिया देखील आजच सेमीफायनलची लढत खेळणार आहे.

भालाफेक पात्रता फेरीत ग्रुप ए मध्ये नीरजने पहिल्याच प्रयत्नात ८६.६५ मीटर भाला फेकून अंतिम फेरीत स्थान निश्चित केले. नीरज चोप्राचे हे पहिले ऑलिम्पिक आहे. त्याने पहिल्याच प्रयत्नात शानदार कामगिरी केली. अंतिम फेरीत प्रवेश मिळवण्यासाठी किमान ८३.५० मीटर अंतिर भाला फेकने आवश्यक होते. नीरजने हे अंतिर सहजपणे पार केले. ग्रुप ए मध्ये नीरज चोप्रा १६ खेळाडूमध्ये अव्वल स्थानी राहिला. नीरजने जागतिक ज्युनियर स्पर्धेते विजेतेपद मिळवले होते. त्याची सर्वोत्तम कामगिरी ८८.०७ इतकी आहे. ही त्याने मार्च २०२१ मध्ये इंडियन ग्रा प्री ३ मध्ये केली होती.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#टकय #ऑलमपकमधय #भरतल #एकच #दवश #चर #पदक #जकणयच #सध

RELATED ARTICLES

24 वेळा पाहिला अनुष्काचा सिनेमा; तो सीन पाहून पेटवून घेतलं, तरुणाचा मृत्यू

या तरुणाने स्वतःवरच 20 लिटर पेट्रोल ओतून घेतलं आणि स्वतःलाच पेटवलं. या घटनेत तो गंभीररित्या भाजला. गंभीर अवस्थेच त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं,...

Track location: एखाद्या व्यक्तीचे लोकेशन ट्रॅक करता येते का? जाणून घ्या संपूर्ण माहिती…

मुंबई: आजकाल असे बरेच अ‍ॅप्स आले आहेत. ज्यांच्या मदतीने आपण अगदी सहजपणे एखाद्या व्यक्तीचे लोकेशन ट्रॅक करू शकतो. त्याचबरोबर त्या व्यक्तीच्या हालचालींवर लक्ष...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर, पूरस्थितीचा घेणार आढावा

CM Eknath Shinde : राज्याच्या विविध भागात सध्या मुसळधार पाऊस (Rain) कोसळताना दिसत आहे. या पावसामुळं नदी नाल्यांना...

Most Popular

पायांमध्ये ‘ही’ लक्षणं दिसली तर सावधान; Cholesterol वाढल्याचे संकेत

ला जाणून घेऊया, कोलेस्ट्रॉल जास्त झाल्यावर पायांमध्ये कोणती चिन्हे दिसतात. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार...

माहेरी जाताना रस्त्यातच बहिणीचं अनोखं रक्षाबंधन, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

जयपूर, 12 ऑगस्ट : देशभरात राखीपौर्णिमेचा सण आनंदात साजरा करण्यात आला. रक्षाबंधनाच्या नंतरही आज शुक्रवारी 12 ऑगस्ट रोजीही बहिणी आपल्या भावाला राखी बांधत आहेत....

24 वेळा पाहिला अनुष्काचा सिनेमा; तो सीन पाहून पेटवून घेतलं, तरुणाचा मृत्यू

या तरुणाने स्वतःवरच 20 लिटर पेट्रोल ओतून घेतलं आणि स्वतःलाच पेटवलं. या घटनेत तो गंभीररित्या भाजला. गंभीर अवस्थेच त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं,...

Track location: एखाद्या व्यक्तीचे लोकेशन ट्रॅक करता येते का? जाणून घ्या संपूर्ण माहिती…

मुंबई: आजकाल असे बरेच अ‍ॅप्स आले आहेत. ज्यांच्या मदतीने आपण अगदी सहजपणे एखाद्या व्यक्तीचे लोकेशन ट्रॅक करू शकतो. त्याचबरोबर त्या व्यक्तीच्या हालचालींवर लक्ष...

आंबट ढेकर, छातीत जळजळ, अपचन मुळापासून दूर करणारी टिप्स

Acid reflux home remedy :लठ्ठपणा, धुम्रपान, जास्त खाणे, कॅफिनचे जास्त सेवन, शारीरिक हालचालींचा अभाव आणि काही औषधे ही स्थिती वाढवू शकतात. या समस्येवर...