सुवर्णपदक मिळवणाऱ्या नीरजचा विविध संघटनांकडून सत्कार होत आहे. भारतीय अॅथलेटिक्स महासंघाकडून देखील त्याचा सत्कार करण्यात आला. यावेळी महासंघाने सात ऑगस्ट ही तारीख राष्ट्रीय भालाफेक दिवस म्हणून साजरा केला जाणार असल्याचे सांगितले.
वाचा- Video:’हे माझे नाही तर संपूर्ण देशाचे पदक, मिळाल्यापासून खिशात घेऊन फिरतोय’
नीरजने या सत्कार समारंभात त्याचे भविष्यातील योजनांबद्दल सांगितले. भालाफेकमध्ये लवकरच मी ९० मीटर लांब थ्रो करणार आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये ते शक्य झाले नाही. कारण तेथे भाला किती लांब जातो यापेक्षा पदक मिळणे महत्त्वाचे होते. आनंद याचा वाटतो की ते सुवर्णपदक झाले.
वाचा- ऑलिम्पिक इतिहासातील एकमेव क्रिकेट मॅच; या देशाने जिंकले होते सुवर्णपदक
नीरज चोप्रा ऑलिम्पिकमध्ये भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकणारा पहिला आशियाई खेळाडू आहे. याआधी कोणत्याही आशियाई पुरुष खेळाडूला भालाफेकमध्ये सुवर्ण नव्हे तर पदक देखील मिळवता आले नव्हते. इतक नव्हे तर ऑलिम्पिकमध्ये गेल्या ५० वर्षात फक्त ३ पुरुषांनी पहिल्यात थ्रो मध्ये भालाफेकमध्ये सुवर्ण जिंकण्याची कामगिरी केली आहे. हंगेरीच्या मिक्लोस नेमेथ यांनी १९७६, जॅन जेलेजनी १९९२ तर आता भारताच्या नीरज चोप्राने अशी अनोखी कामगिरी केली.
वाचा- चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; क्रिकेटला पडले ऑलिम्पिकचे स्वप्न, घेण्यात आला मोठा निर्णय
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]
#टकयमधय #पदक #जकयच #हत #महणनपण #पढचय #वळ #भल #९० #मटरचय #पढ #जणर