Friday, August 12, 2022
Home मुख्य बातम्या 'टुटे मन से कोई खडा नही होता' शिवसेनेचा फडणवीसांना वाजपेयींच्या कवितेतून टोला

‘टुटे मन से कोई खडा नही होता’ शिवसेनेचा फडणवीसांना वाजपेयींच्या कवितेतून टोला


 

मुंबई,02 जून : ‘‘काळ्याचे पांढरे व पांढऱ्याचे काळे करणारे नवे युग आता तिथे अवतरले आहे. त्यामुळेच ‘छोटे मन’ आणि ‘मोठे मन’ यांच्या व्याख्या नव्याने सांगितल्या जात आहेत. कराराप्रमाणे दिलेला शब्द पाळण्याचे ‘मोठे मन’ भाजपने अडीच वर्षांपूर्वीच दाखवले असते तर बचाव म्हणून ‘मोठ्या मना’ची ढाल समोर करण्याची वेळ त्या पक्षावर आली नसती, असं म्हणत शिवसेनेनं (shivsena) राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांना लगावला.

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी पार पडला आहे. एकनाथ शिंदे यांनी अचानकपणे मुख्यमंत्रिपदाची घोषणा करण्यात आली. तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदी शपथ घेतली. भाजपमध्ये फडणवीस यांचं खच्चीकरण करण्यात आल्याची चर्चा रंगली आहे. याच मुद्याला धरून शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या (saamana) अग्रलेखातून टीका करण्यात आली आहे.

उपमुख्यमंत्री होणारे अचानक मुख्यमंत्री झाले आणि हमखास मुख्यमंत्री होणार असे वाटणाऱ्यांना उपमुख्यमंत्रिपद स्वीकारावे लागले. पक्षादेश म्हणून ते त्यांनी स्वीकारलेही. या ‘क्लायमॅक्स’वर टीका, समीक्षण, परीक्षण असा भडिमार होत असताना ‘मोठे मन’ आणि ‘पक्षनिष्ठेचे पालन’ असा एक बचाव समोर आला. ‘‘फडणवीस यांनी मन मोठे करून मुख्यमंत्रिपदाऐवजी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारले’’, असा युक्तिवाद आता केला जात आहे. भारतीय जनता पक्षाचे स्वर्गीय नेते अटलबिहारी वाजपेयी यांनीही आपल्या एका कवितेत म्हटलेच आहे…

छोटे मन से कोई बडा नही होता,
टुटे मन से कोई खडा नही होता
मात्र, या ओळींपूर्वी याच कवितेत वाजपेयी म्हणतात,
हिमालय की चोटी पर पहुंच,
एव्हरेस्ट विजय की पताका फहरा,
कोई विजेता यदि ईर्ष्या से दग्ध,
अपने साथी से विश्वासघात करे
तो उसका क्या अपराध
इस लिये क्षम्य हो जायेगा कि
वह एव्हरेस्ट की उंचाई पर हुआ था?
नहीं, अपराध अपराध ही रहेगा
हिमालय की सारी धवलता
उस कालिमा को नहीं ढक सकती!
अर्थात ‘मन’ आणि ‘अपराध’ यांची सुस्पष्ट व्याख्या मांडणाऱ्या वाजपेयी युगाचा आणि त्यांच्या विचारसरणीचा देशाच्या राजकारणातून केव्हाच अस्त झाला आहे, असा टोला सेनेनं फडणवीस यांना लगावला.

(मुख्यमंत्री होणार हे कधी समजलं? एकनाथ शिंदेंचं उत्तर वाचून बसेल आश्चर्याचा धक्का)

‘काळ्याचे पांढरे व पांढऱ्याचे काळे करणारे नवे युग आता तिथे अवतरले आहे. त्यामुळेच ‘छोटे मन’ आणि ‘मोठे मन’ यांच्या व्याख्या नव्याने सांगितल्या जात आहेत. कराराप्रमाणे दिलेला शब्द पाळण्याचे ‘मोठे मन’ भाजपने अडीच वर्षांपूर्वीच दाखवले असते तर बचाव म्हणून ‘मोठय़ा मना’ची ढाल समोर करण्याची वेळ त्या पक्षावर आली नसती, असा टोलाही सेनेनं शिंदेंना लगावला.

(प्रवासाचा योग आहे पण प्रकृतीलाही जपा; सविस्तर पाहा तुमचं आजचं राशिभविष्य)

‘लोकशाहीचे वस्त्रहरण करून घडविण्यात आलेल्या महाराष्ट्रातील या राजकीय नाटय़ाचे आणखी किती अंक समोर येणार हे आता बघावे लागेल. जे झाले ते झाले, पण महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री आणि पक्षादेश शिरोधार्य मानणाऱ्या उपमुख्यमंत्र्यांच्या हातून महाराष्ट्रहिताचेच कार्य घडो हीच अपेक्षा आहे. हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे, आंधळा धृतराष्ट्र नाही हे त्यांनी लक्षात ठेवावे, असा टोलाही सेनेनं लगावला.

तुमच्या शहरातून (मुंबई)

Published by:sachin Salve

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#टट #मन #स #कई #खड #नह #हत #शवसनच #फडणवसन #वजपयचय #कवततन #टल

RELATED ARTICLES

आशिया खंडातील दुसऱ्या सगळ्यात मोठ्या होर्डिंगवर झळकलं दगडी चाळ 2 चं पोस्टर

मुंबई, 12 ऑगस्ट-   मराठी चित्रपटांची सध्या चांगलीच हवा दिसून येत आहे. नुकतंच 'चंद्रमुखी' या मराठी चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान चित्रपटाचं पोस्टर चक्क विमानावर झळकलं...

पालिकेच्या वॉर्ड पुनर्रचनेत बदल, शिवसेना सर्वोच्च न्यायालयात जाणार 

Shivsena : शिंदे आणि फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर मुंबई महानगर पालिकेच्या (mumbai municipal corporation) वॉर्ड पुनर्रचनेत बदल करण्यात...

जगातील सर्वात प्राचीन भाषा अशी ओळख असलेल्या संस्कृत दिनाचा इतिहास काय? जाणून घ्या सविस्तर

World Sanskrit Day 2022 : हिंदू दिनदर्शिकेनुसार श्रावण (Shravan 2022) महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेच्या दिवशी संस्कृत दिवस साजरा केला...

Most Popular

हृदयद्रावक! राखी बांधण्यासाठी निघालेल्या बहिणींना यमुनेत जलसमाधी, ४ जणांचा मृत्यू, १७ जण अद्यापही बेपत्ता

बांदा (उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यात मोठी दुर्घटना समोर आली आहे. रक्षाबंधनाला महिला मुलांसोबत राखी बांधण्यासाठी बोटीतून माहेरी जात असताना यमुना...

पुणे-मुंबई लोहमार्गावर दरड कोसळली; मुंबईकडे येणारी रेल्वे वाहतूक ठप्प

Land Slide on Pune Mumbai Railway : खंडाळा आणि लोणावळ्यादरम्यान दरड कोसळल्यानं पुण्याहून मुंबईच्या दिशेनं होणारी रेल्वे वाहतूक ठप्प...

अल्टिमेट खो-खो लीग : खो-खोपटू विजय हजारेची संघर्षगाथा..

संदीप कदम मुंबई : पानपट्टीचा व्यवसाय करणाऱ्या इचलकरंजीच्या सामान्य कुटुंबातील विजय हजारे पहिल्या अल्टिमेट खो-खो लीगमध्ये मुंबई खिलाडीज संघाचे नेतृत्व करणार आहे. प्रतिकूल परिस्थितीत...

डोनाल्ड ट्रम्प यांच्या घरावरील FBI ची छापेमारी Nuclear कागदपत्रांच्या शोधासाठी, खळबळजनक खुलासा

Raids On Donald Trump's House : अमेरिकेची तपास संस्था एफबीआयनं माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या फ्लोरिडा येथील घरावर...

‘लाल सिंह चड्ढा’च्या तुलनेत ‘रक्षा बंधन’ पडला मागे! पाहा पहिल्या दिवसाचे कलेक्शन…

Raksha Bandhan Box Office Collection Day 1: बॉलिवूडचा खिलाडी कुमार अर्थात अभिनेता अक्षय कुमारचा (Akshay Kumar) ‘रक्षा बंधन’...

पालिकेच्या वॉर्ड पुनर्रचनेत बदल, शिवसेना सर्वोच्च न्यायालयात जाणार 

Shivsena : शिंदे आणि फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर मुंबई महानगर पालिकेच्या (mumbai municipal corporation) वॉर्ड पुनर्रचनेत बदल करण्यात...