Saturday, November 27, 2021
Home क्रीडा टीम इंडियात येण्यापूर्वीच तो IASची परीक्षा पासही झाला होता; जाणून घ्या...

टीम इंडियात येण्यापूर्वीच तो IASची परीक्षा पासही झाला होता; जाणून घ्या कोण आहे हा क्रिकेटपटू…


नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघातही अनेक सुशिक्षित खेळाडू होते, आहेत, पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, टीम इंडियामध्ये एक असा क्रिकेटपटू होता, ज्यानं क्रिकेटमध्ये करिअर करण्यापूर्वी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली होती.

अमेय खुरासिया हे त्यांचं नाव. भारतीय संघातील माजी खेळाडू असणाऱ्या खुरासिया यांचा जन्म १९७२साली मध्य प्रदेशातील जबलपूर येथे झाला. केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झालेले खुरासिया सध्या सीमाशुल्क आणि केंद्रीय उत्पादन शुल्क विभागात कार्यरत आहेत. वयाच्या १७ व्या वर्षी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या खुरासियांनी भारतीय वरिष्ठ राष्ट्रीय संघात पदार्पण करण्यापूर्वी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली होती. त्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. खुरासिया यांनी १९९९ मध्ये भारतासाठी आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. पेप्सी चषक अंतर्गत श्रीलंकेविरुद्ध त्यांनी पहिला सामना खेळला होता. पदार्पणाच्या सामन्यात खुरासिया यांनी ४५ चेंडूत ५७ धावांची शानदार खेळी केली, पण यानंतर ते आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चमक दाखवू शकले नाहीत आणि काही वर्षांतच त्यांची क्रिकेटची कारकीर्द संपली.

१२ एकदिवसीय सामन्यांनंतर आंतरराष्ट्रीय कारकीर्द संपली
खुरासिया यांनी भारतासाठी १२ एकदिवसीय सामने खेळले, यामध्ये त्यांच्या नावावर एकूण १४९ धावा आहेत. खुरासिया यांनी २००१ मध्ये श्रीलंकेविरुद्ध शेवटचा सामना खेळला. या माजी डावखुऱ्या फलंदाजाने ११९ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये एकूण ७३०४ धावा केल्या होत्या. २३८ ही त्यांची सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे. यामध्ये २१ शतके आणि ३१ अर्धशतकांचा समावेश आहे. याशिवाय खुरासियांनी ११२ लिस्ट-ए सामन्यांमध्ये ३७३८ धावा केल्या होत्या. यात त्यांनी ३८ च्या सरासरीने ४ शतके आणि २६ अर्धशतके झळकावली आहेत.

केंद्रीय लोकसेवा आयोगाची (यूपीएससी) परीक्षा देशातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. सामान्य भाषेत या परीक्षेला IASची परीक्षा असेही म्हणतात. दरवर्षी लाखो विद्यार्थी यूपीएससी परीक्षेला बसतात, परंतु त्यापैकी फक्त काही विद्यार्थीच ही परीक्षा उत्तीर्ण होतात. सिनेमा, क्रिकेट आणि राजकारण या क्षेत्रात उच्च शिक्षित असणाऱ्यांची संख्या तशी कमीच असते.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#टम #इडयत #यणयपरवच #त #IASच #परकष #पसह #झल #हत #जणन #घय #कण #आह #ह #करकटपट

RELATED ARTICLES

दिंडीत पिकअप घुसला, 15 ते 20 वारकरी जखमी, पुण्यातील वडगाव मावळनजीकची घटना

Pune Accident News Update : कार्तिकी एकादशीसाठी येणाऱ्या दिंडीतील वारकऱ्यांचा अपघात झाला आहे. मावळ तालुक्यात हा अपघात आज...

भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिकेची सिरीज होणार की नाही; BCCIने दिली मोठी अपडेट

मुंबई : भारत पुढील महिन्यात दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात संघाला तीन सामन्यांची कसोटी, एकदिवसीय आंतरराष्ट्रीय आणि टी-20 आंतरराष्ट्रीय मालिका खेळायची...

Vodafone Idea: Vi ने पुण्यात केले ५जी ट्रायल, मिळाला भन्नाट स्पीड; पाहा डिटेल्स

हायलाइट्स:वीआयने केले ५जी ट्रायल.पुणे आणि गांधीनगरमध्ये पार पडले ट्रायल.ट्रायलसाठी Ericsson, Nokia सारख्या कंपन्यांशी भागीदारी.नवी दिल्ली : टेलिकॉम कंपनी Vi (Vodafone Idea) ने ५जी...

Most Popular

कामगारांचं नेतृत्व कोणं करतंय याचं देणं घेणं नाही, कोर्टात समोर येणारांचा विषय तिथं बघू : परब

ST Strike : कामगारांचं नेतृत्व कोणं करतंय याचं देणं घेणं नाही, कोर्टात जे आमच्या समोर आले आहेत त्यांचा...

IPS शिवदीप लांडे पुढील महिन्यात बिहारला परतणार, मुंबईतही धडाकेबाज कामगिरी

Shivdeep Lande : भारतीय पोलीस सेवा दलातील अधिकारी शिवदीप लांडे (Shivdeep Lande) पुन्हा एकदा बिहारमध्ये परतणार आहेत. सुपर...

अमित शहा-फडणवीसांच्या बैठकीत शरद पवार? राष्ट्रवादीकडून ‘त्या’ फोटोचा पर्दाफाश

मुंबई, 26 नोव्हेंबर : विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस  यांनी नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री...

तुम्हाला हिवाळ्यात आल्याचा चहा प्यायला आवडतो का? मग या गोष्टीही माहीत असाव्यात

नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर : हिवाळ्यात (Winter) चहा पिणं कोणाला आवडत नाही? बाहेरची थंड हवा आणि हातात गरम चहाचा कप प्रत्येक माणसाचा मूड बदलतो....

WHOने कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटला दिलं नावं!

कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटला 'वेरिएंट ऑफ कंसर्न' म्हणून घोषित केलं आहे.  अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार...

ST Workers Strike : एसटी संप सुरु ठेवल्यास वेतनवाढही रद्द करण्याचा परिवहनमंत्री अनिल परब यांचा इशारा

<p>वेतनवाढीनंतरही अनेक एसटी कर्मचारी संपावर ठाम आहेत. त्या एसटी कर्मचाऱ्यांना परिवहनमंत्री अनिल परब यांनी गर्भित इशारा दिलाय. वेतनवाढ केल्यानंतर संप सुरुच ठेवणार असाल...