Friday, August 12, 2022
Home क्रीडा टीम इंडियाच्या संकटमोचनचा खुलासा; इंग्लंडमध्ये विजयाचे उलगडलं रहस्य

टीम इंडियाच्या संकटमोचनचा खुलासा; इंग्लंडमध्ये विजयाचे उलगडलं रहस्य


बर्मिंगहॅम : भारत आणि इंग्लंड यांच्यात बर्मिंगहॅमच्या एजबॅस्टन येथे पाचवी आणि निर्णायक कसोटी खेळली जात आहे. भारतीय संघाचा पहिला डाव ४१६ धावांत गुंडाळला. भारताकडून ऋषभ पंत आणि रवींद्र जडेजा यांनी शतके झळकावली. पंतने १४६ धावा केल्या, तर जडेजा १०४ धावांची शानदार खेळी करत मौल्यवान योगदाज दिले. इंग्लंडकडून जेम्स अँडरसनने भारताचा अर्धा संघ माघारी धाडला. भारतीय टॉप ऑर्डरच्या अपयशानंतर पंत आणि जडेजाने भारताला मोठी धावसंख्या गाठण्यास मदत केली.

बर्मिंगहॅम येथे खेळल्या जात असलेल्या पाचव्या पुनर्निर्धारित कसोटीच्या पहिल्या दिवशी युवा यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतने वर्चस्व गाजवले. पंतने एजबॅस्टन येथे १४६ धावांची शानदार खेळी खेळली. यादरम्यान त्याने २० चौकार आणि चार षटकार खेचले. शतक झळकावल्यानंतर पंतने इंग्लिश परिस्थितीत फलंदाजांना कसे यश मिळेल यामागील रहस्य उघड केले.

वाचा – IND vs ENG 5th Test Live Score, Day 2: इंग्लंड विरुद्ध भारत पाचवी कसोटी- दुसऱ्या दिवसाचे लाइव्ह अपडेट

पाचव्या कसोटी सामन्यात शानदार शतक झळकावल्यानंतर ऋषभ पंतने पत्रकार परिषदेत सांगितले की, तो प्रत्येक सामन्यात १०० टक्के देतो. प्रश्नांच्या उत्तरात तो म्हणाला, “कसोटी क्रिकेटमध्ये बचावावर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे आहे. चांगल्या चेंडूचा आदर करणे आणि खराब चेंडूला फटका मारणेही महत्त्वाचे आहे.”

वाचा – इंग्लंड क्रिकेटची दाणादाण उडाली; एकीकडे गोलंदाजांची होतेय धुलाई, फलंदाजांची पाहा काय अवस्था

पंत पुढे म्हणाला की इंग्लंडमध्ये (इंग्रजी परिस्थितीत) गोलंदाजाची लांबी खराब करणे महत्त्वाचे आहे असे त्याला वाटते. जेव्हा रवींद्र जडेजाने संकटात त्याला साथ दिली तेव्हा त्याने खुलासा केला की दोघेही एकमेकांशी भागीदारी करण्याचा प्रयत्न करत असल्याचे बोलले. पंत-जडेजामध्ये इंग्लंडविरुद्ध सहाव्या विकेटसाठी २२२ धावांची विक्रमी भागीदारी करत संघाच्या मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. पंतने पुढे म्हटले की प्रशिक्षक राहुल द्रविडने त्याला, “चेंडूनुसार खेळ”, असे सांगितले.

वाचा – ऋषभ पंतच्या बर्मिंगहॅम शतकाची अनोखी कहाणी; जपली चार वर्षांपूर्वीची ‘परंपरा’

भारताचा पहिला डाव
टीम इंडियाने पहिल्या दिवशी ९८ धावांत पाच विकेट गमावल्या नंतर पंत आणि जडेजाने मोर्चा सांभाळला आणि २०० हून अधिक धावांची भागीदारी करत संघाला सामन्यात खेचून आणले. भारताने पहिल्या दिवशी ३३८ धावा केल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या दिवशी जडेजाने तिसरे कसोटी शतक झळकावले आणि भारताची धावसंख्या ४०० पार पोहोचवली. कर्णधार जसप्रीत बुमराहने १६ चेंडूत ३१ धावांची नाबाद खेळी करून परतला.

इंग्लंड गोलंदाजांची धुलाई
दुसऱ्या दिवशी स्टुअर्ड ब्रॉडने कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात महागडे षटक टाकले. त्याने ८४ व्या षटकात एकूण ३५ धावा खर्च केल्या. यादरम्यान जसप्रीत बुमराहने त्याला चांगलाच धुतलं. दरम्यान, अॅलेक्स लीस आणि जॅक क्रॉलीची जोडी इंग्लंडच्या डावाची सुरुवात करण्यासाठी मैदानात उतरले आहेत.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#टम #इडयचय #सकटमचनच #खलस #इगलडमधय #वजयच #उलगडल #रहसय

RELATED ARTICLES

Raosaheb Danve : मी रेल्वे मंत्री मात्र, माझ्या गावात अजून रेल्वे नाही : मंत्री रावसाहेब दानवे

Raosaheb Danve : 10 वर्ष आमदार (MLA) त्यानंतर 25 वर्ष खासदार म्हणून काम केले. मात्र अद्यापही माझ्या गावात...

सायकल खरेदी करताय! ‘या’ ऑनलाईन साईटवर मिळतेय स्वस्तात, जाणून घ्या

मुंबई : व्यायामासाठी अनेकांना जीमपेक्षा सायकलिंग करावी असे नेहमीच वाटतं असते. मात्र लॉकडाऊन नंतर सायकलचा खप आणि किंमती वाढल्याने अनेकांना बजेटमध्ये सायकल घेणे...

Most Popular

मुंबईकरांनो सावधान! शहरात एका दिवसात 79% कोरोनाचे रुग्ण वाढले

 आरोग्य विभागाच्या आकडेवारीत ही माहिती समोर आली आहे.  अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित...

पुणे, कोल्हापूरसह राज्यात अनेक ठिकाणी पावसाची हजेरी, आज कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात यलो अलर्ट

Maharashtra Rain : सध्या राज्यात जोरदार पाऊस (Rain) कोसळताना दिसत आहे. अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आले आहेत....

मुंबई इंडियन्सची मोर्चेबांधणी सुरु, पाहा कोणत्या पाच खेळाडूंशी केला करार?

केपटाऊन, 11 ऑगस्ट: आयपीएलमधली सर्वात लोकप्रिय फ्रँचायझी मुंबई इंडियन्सनं आता परदेशातल्या टी20 लीगमध्येही आपला संघ उतरवण्याचं ठरवलं आहे. संयुक्त अरब अमिरात (UAE) आणि...

कोयना धरणाचे 6 वक्री दरवाजे दीड फुटांनी उचलले, 10 हजार 100 क्युसेकने नदीत पाण्याचा विसर्ग 

Koyna Dam : कोयना धरणाची पाणीपातळी 2 हजार 147 फुटांवर गेली असून एकूण पाणीसाठा 85.31 टीएमसी झाला आहे....

Health Tips: डोळे अधिक सक्षम आणि दृष्टी वाढवण्यासाठी आहारात या 3 गोष्टींचा समावेश करा, चष्म्याचे नो टेन्शन !

Health Tips: डोळे हा आपल्या शरीराचा सर्वात संवेदनशील आणि महत्त्वाचा भाग आहे. आपण फक्त आपल्या डोळ्यांनी पाहू शकतो. पण आजच्या काम करण्याचा सवईमुळे आणि...