टरबूजाच्या बिया पुरुषांसाठी वरदान
टरबूज हे सहज उपलब्ध होणारे फळ आहे. टरबूजामुळे शरीरातील पाण्याची कमतरता भरून निघते आणि अनेक शारीरिक समस्यांवर मात करण्यासाठी ते उपयुक्त असते. टरबूजाच्या बियांमध्ये प्रोटीन्स, सेलेनियम, झिंक, पोटॅशियम आणि कॉपर यासारखे महत्त्वाचे पोषक घटक असतात. त्यामुळे ते खाल्ल्याने शरीराला आवश्यक घटक मिळातात. यात व्हिटॅमिन्स, मिनरल्स, मोनोसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड आणि पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड असतात. आपल्यापैकी अनेकांना या रसाळ आणि गोड फळाचे अनेक फायदे माहिती आहेत. परंतु त्यातील काळ्या बिया देखील शरीरिसाठी चमत्कारिक ठरू शकतात हे फार कमी लोकांना माहिती असेल. त्यामुळे आज आपण या लेखाच्या माध्यमातून विवाहित पुरुषांना टरबूजाच्या बियांमुळे काय फायदे होतात हे आज आपण जाणून घेणार आहोत.
‘फिट’ व्हायचंय? व्यायाम करताना ‘या’ चुका टाळाच, नाहीतर….
टरबूज आणि टरबूजाच्या बिया (Watermelon Seeds) हे दोन्ही घटक पुरुषांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. टरबूजाप्रमाणेच त्याच्या खाल्ल्याने शुक्राणूंच्या संख्येत (Sperm Count) मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते. याशिवाय शुक्राणूंची गुणवत्ता (Sperm Quality) देखील सुधारते. एखाद्या पुरुषाला आपत्य होत नसेल तर त्याने टरबूजाच्या बिया नक्की खाव्यात यामुळे प्रजननशक्ती वाढण्यास मदत होते. टरबूजाच्या बिया तुम्ही थेट खाऊ शकता किंवा त्या खाण्या त्यांना रात्रभर भिजवून ठेवा, मोड आल्यानंतर उन्हात वाळायला ठेवा आणि नंतर खा. याशिवाय तुम्हाला या बिया आणखी चवदार बनवायच्या असतील तर तुम्ही त्या भाजून देखील खाऊ शकता.
Skin Care : तुमच्या चेहऱ्यावरील तेज ठेवा कायम, ट्राय करा हे तीन अनोखे फेशियल; मग बघा Glow
पुरुषांसाठी टरबूज बिया खाण्याचे फायदे
प्रसिद्ध पोषण तज्ञ ‘निखिल वत्स’ यांनी झी न्यूजला दिलेल्या माहितीनुसार टरबूजच्या बियांमध्ये ग्लुटामिक अॅसिड, मॅंगनीज, लाइकोपीन, लायसिन आणि आर्जिनिन हे घटक आढळतात. त्यामुळे पुरुषांची लैंगिक क्षमता सुधारते. या बिया खाल्ल्याने पुरुषांची प्रजनन क्षमताच वाढतेच शिवाय पचनसंस्था सुधारते आणि हृदय देखील निरोगी ठेवण्यास मदत होते. टरबूजाच्या बिया खाल्ल्याने पुरुषांची शुक्राणूंची संख्या सुधारते आणि प्रजनन क्षमता वाढण्यास मदत होते. यामध्ये असलेले सिट्रुलीन रक्ताभिसरण प्रक्रिया सुधारण्यास मदत करते. यात आढळणारे झिंक पुरुषांच्या प्रजनन व्यवस्थेसाठी आवश्यक असते. यामुले शुक्राणूंची गुणवत्ता सुधारते आणि वडील बनण्यास कोणतीही अडचण येत नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]
#टरबजचय #बय #ववहत #परषसठ #वरदन #जडदरकडन #हईल #परमच #वरषव