Monday, July 4, 2022
Home मुख्य बातम्या ज्या सेना नेत्यांमागे ईडीची पिडा, तेच म्हणत आहेत गड्या भाजप बरा! पण...

ज्या सेना नेत्यांमागे ईडीची पिडा, तेच म्हणत आहेत गड्या भाजप बरा! पण ठाकरेंकडून मुद्दा निकालात


Uddhav Thackeray Live : गेल्या दोन दिवसांपासून शिवसेनेतील अंतर्गत बंडाळीवर मौन बाळगून असलेल्या शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भावनिक साद घातली आहे.

मुख्यमंत्र्यांनी गुवाहाटीमध्ये व्हाया सुरत तंबू ठोकून असलेल्या शिवसेनेच्या सर्व आमदारांना भावनिक साद घालताना सांगतिले की, माझ्या सहकाऱ्यांनी तिकडे जाऊन बोलण्यापेक्षा तोंडावर सांगावे. आजच मुख्यमंत्रीपद सोडतो. आज राजीनाम्याचं पत्र तयार करुन ठेवतो. जे आमदार गायब आहेत त्यांनी यावं आणि ते पत्र घेऊन जावं. ही लाचारी नाही, मजबूरी नाही. जोपर्यंत माझ्यासोबत शिवसैनिक आहेत, तोपर्यंत मी कोणतेही आव्हान स्वीकारेन. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्याकडून चेंडू आता नाराज आमदारांच्या गटाचे नेतृत्व करत असलेल्या नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना कोर्टात ढकलला आहे. त्यामुळे आता एकनाथ शिंदे काय भूमिका घेतात ? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

नाराजांचा मुद्दा विचारधारेचा पण खरी अडचण ईडीची पीडा

महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून भाजपने ईडीसह केंद्रीय तपास यंत्रणांचा केलेला यथेच्छ वापर केल्याचे काही लपून राहिलेला नाही. राज्यातील शिवसेनेचे अनेक नेते ईडीच्या रडारवर आहेत. यामध्ये शिवसेना मुलुख मैदानी तोफ असलेल्या संजय राऊत यांनाही दणका बसला आहे. मिलिंद नार्वेकर यांनाही बंगला पाडावा लागला. इतकचं नव्हे, तर मुख्यमंत्र्यांच्या घरापर्यंत ईडी पोहोचली. श्रीधर पाटणकर ( रश्मी ठाकरे यांचे बंधू) यांचीही संपत्ती जप्त झाली आहे. भाजप नेते महाविकास आघाडीमधील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेवर दररोज गल्लीपासून दिल्लीपर्यंत आरोप करत आहेत. त्यामुळे अनेक शिवसेना नेत्यांनी ईडीची धास्ती घेतली आहे. बंडाळीचे नेतृत्व करत असलेल्या एकनाथ शिंदे यांनीही ईडीची धास्ती घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. 

शिवसेनेचे कोणकोणते ईडीच्या रडारवर?

अनिल परब
 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी असलेल्या अनिल परब यांच्यावर किरीट सोमय्या यांनी सर्वाधिक कडाडून हल्ला केला आहे. त्यांना सातत्याने जेलमध्ये टाकण्याची भाषा केली आहे. त्याच अनिल  परब यांची कालच ईडीने सलग 11 तास दापोली रिसाॅर्ट प्रकरणात चौकशी केली आहे. 

प्रताप सरनाईक

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांना ईडीने दणका दिला आहे. एनएसईएल कंपनीतून प्रताप सरनाईक यांच्या कंपन्यांमध्ये पैसा आल्याचा आरोप आहे. त्यांची संपत्तीही ईडीकडून जप्त झाली आहे. ईडीचा फास आवळताच त्यांनी भाजपसोबत चला अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. 

भावना गवळी 
 
शिवसेना खासदार भावना गवळी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून भाजपसोबत जाण्याची विनंती केली आहे. त्यांनी विचारधारेचा मुद्दा उपस्थित केला असला, तरी त्यांनी आतापर्यंत चारवेळा ईडीकडून नोटीस येऊनही हजेरी लावलेली नाही. विविध संस्थांच्या माध्यमातून त्यांच्यावर भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे. किरीट सोमय्यांनी 100 कोटींचा अपहार केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

यशवंत जाधव

मुंबईमधील शिवसेना यशवंत जाधव यांच्यावर कोरोना काळात भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे. शेल कंपन्यांच्या माध्यमातून कुटुंबीयांनी लाभ घेतल्याचा आरोप आहे. त्यांच्यावरही ईडीने आणि आयकर विभागाने छापेमारी केली आहे. गुवाहाटीमध्ये गेलेल्या आमदारांमध्ये यशवंत जाधव यांच्या पत्नी यमिनी जाधव यांचाही समावेश आहे.

अर्जुन खोतकर
 
अर्जुन खोतकर यांच्यावर जालना साखर कारखाना विक्रीत 100 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. खोतकरांवरी ईडीने छापेमारी केली आहे. 

आनंदराव अडसुळ 

आनंदराव अडसुळ यांच्यावर मुंबईच्या सिटी सहकारी बँकेचे अध्यक्ष असताना शेकडो कोटींचा अपहार केल्याचा आरोप आहे. खोतकर यांच्या कांदिवली येथील घरावर ईडीने छापेमारी केली आहे. 

रवींद्र वायकर 

भाजप नेते किरीट सोमय्यांनी वायकर यांच्यावर जमीन खरेदी प्रकरणात आरोप केल्यानंतर रवींद्र वायकर यांची ईडीकडून चौकशी झाली आहे. 

तपास यंत्रंणाकडून बसत असलेला दणका पाहून शिवसेनेतील अनेक नेते हबकून गेले आहेत. त्यामुळेच त्यांनी ईडीचा ससेमीरा पाठिमागे गड्या भाजप बरा, अशी सोयीची भूमिका घेतली आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आवाहनातून भाजपशी जुळवून शक्यता पूर्णपणे फेटाळून लावली आहे. त्यामुळे हे नेते आता काय करणार ? आणि एकनाथ शिंदे काय भूमिका घेतात हे पहावं लागणार आहे. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#जय #सन #नतयमग #ईडच #पड #तच #महणत #आहत #गडय #भजप #बर #पण #ठकरकडन #मदद #नकलत

RELATED ARTICLES

July Born Baby Names: तुमच्या बाळांना द्या ‘ही’ सर्वात हटके अन् गोंडस नावं

मुंबई, 4 जुलै: आपल्या बाळाचं नाव (Baby Names) हटके असावं, असं प्रत्येकाला वाटतं. त्याचं नाव सुंदर असावं, त्याचा अर्थही चांगला असावा आणि ते नाव प्रत्येकाला...

गुजरातसोबत महाराष्ट्रात निवडणुका होतील, संजय राऊतांचा दावा

मुंबई, 04 जुलै :  'आता ही तात्पुरती केलेली व्यवस्था आहे. ही कायम स्वरुपाची नाही. भाजपला शिवसेना फोडायची होती. त्यांनी फोडून दाखवली. फुटीर गटाला...

ताब्यात घ्यायला शिवसेना म्हणजे काय युक्रेन आहे का? संजय राऊतांचा हल्लाबोल

Sanjay Raut On Maharashtra Election :  शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी बंडखोर शिंदे गटाला थेट आव्हान दिलं आहे....

Most Popular

Liger : ‘लायगर’च्या पोस्टरचा विक्रम! प्रदर्शित होताच झाले सोशल मीडियावर ट्रेंड!

Liger : करण जोहरचा आगामी चित्रपट ‘लायगर’ (Liger) रिलीज पूर्वीच चर्चेत आला आहे. नुकतेच या चित्रपटातील विजय देवरकोंडाचा...

ठाकरेंना पुन्हा एक धक्का! मध्यावधी निवडणुका लागणार, पवारांचं भाकित TOP बातम्या

मुंबई, 4 जुलै : राज्यात विधानभवनात पार पडलेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिंदे गटाचा वियज झाला आहे. यानंतर उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का बसला आहे....

बंड ते बहुमत चाचणी! 21 जूनच्या रात्रीपासून आजपर्यंत नेमकं काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Maharashtra Politics CM Eknath Shinde, Deputy CM Devendra Fadnavis Timeline : गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरु असलेल्या सत्तानाट्याचा...

Denmark Firing : डेन्मार्कच्या शॉपिंग मॉलमध्ये गोळीबारात तिघांचा मृत्यू, आरोपीला अटक

Denmark Firing : डेन्मार्कची राजधानी कोपेनहेगनमधील (Firing Copenhagen) एका शॉपिंग मॉलमध्ये गोळाबाराची घटना घडली आहे. या घटनेमध्ये तीन...

आज शिंदे सरकारची खरी परीक्षा; बहुमत चाचणीसाठी ठरली रणनीती, मॅजिक फिगर गाठणार का?

मुंबई 04 जुलै : महाराष्ट्राच्या राजकारणात 10 दिवसांच्या बंडखोरीनंतर मोठा बदल घडवणारे शिवसेनेचे एकनाथ शिंदे (Eknath Shinde Government) यांच्या नव्या सरकारची आज फ्लोर...

आधी प्रेयसीला रुममध्ये केले बंद अन् नंतर प्रियकराने उचलले हे टोकाचे पाऊल

नोएडा, 3 जुलै : नोएडाच्या सेक्टर 49 मधून एक मोठी बातमी समोर आली आहे. एका खासगी दूरसंचार सेवा पुरवठादार कंपनीतील कर्मचाऱ्याचा मृतदेह (Dead...