Monday, July 4, 2022
Home मुख्य बातम्या जे गेलेत त्यांचा विचार करु नका, मेळावे लावा, शाखा पिंजून काढा; उद्धव...

जे गेलेत त्यांचा विचार करु नका, मेळावे लावा, शाखा पिंजून काढा; उद्धव ठाकरे यांचे आदेश 


मुंबई: आपण हिंदुत्व आणि मराठीच्या मुद्द्यावर आजही कायम आहोत, जे गेलेत त्यांचा विचार करु नका असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील सर्व विभागप्रमुखांना म्हणाले. विभागावर मेळावे लावा, शाखा शाखा पिंजून काढा असे आदेशही उद्धव ठाकरेंनी विभागप्रमुखांना दिले आहेत. एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी आज संध्याकाळी सर्व विभागप्रमुखांची बैठक बोलवली होती. त्यावेळी त्यांनी हा आदेश दिला आहे. 

उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मुंबईतील सर्व विभागप्रमुखांची बैठक पार पडली. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी खालील आदेश दिले आहेत, 

  • आपण हिंदुत्व आणि मराठीच्या मुद्द्यांवर आजही काम आहोत
  • जे गेले त्याचा विचार करू नका.
  • आपल्याला आणखीन ताकदीनं लढायचं आहे. 
  • विभागावर मेळावे लावा, शाखा शाखा पिंजून काढा.
  • त्यासाठी आपल्याला सर्व कार्यकर्त्यांना जोर लावून पक्षबांधणीसाठी योगदान द्यावं लागेल.   

संजय राऊत यांचे बंडखोरांना आवाहन
शिवसेनेने महाविकास आघाडीतून बाहेर पडावे अशी आमदारांची इच्छा असेल तर आमदारांनी 24 तासांत मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर उपस्थित राहून चर्चा करावी असे आवाहन शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले आहे. बंडखोर आमदारांच्या मागणीचा विचार होईल. मात्र, त्याआधी तुम्ही मुंबईत येण्याची हिंमत दाखवावी असे आवाहन राऊत यांनी दिले. चर्चेतून मार्ग निघू शकतो, चर्चा होऊ शकते. घरचे दरवाजे उघडे आहेत. का उगाच वण वण भटकताय? गुलामी पत्करण्यापेक्षा स्वाभिमानाने निर्णय घेऊ! जय महाराष्ट्र! असं ट्वीट संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांसाठी केले आहे. 

दरम्यान, पक्षाविरोधात बंड केलेल्या 12 आमदारांच्या विरोधात कारवाई करा, त्याचं सदस्यत्व रद्द करा अशा आशयाचे पत्र शिवसेनेकडून विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना देण्यात आलं आहे.  शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी याबाबतची माहिती दिली असून पहिल्या टप्प्यात 12 नावं दिली, उरलेल्यांवर पण कारवाईची मागणी करु, असेही त्यांनी सांगितलं आहे. 

सदस्यत्व रद्द करण्याची शिफारस असलेल्या यादीतील नावं 
1 ) एकनाथ शिंदे
2) अब्दुल सत्तार 
3) संदीपान भुमरे 
4) प्रकाश सुर्वे 
5) तानाजी सावंत 
6) महेश शिंदे 
7) अनिल बाबर 
8) यामिनी जाधव 
9) संजय शिरसाट 
10) भरत गोगावले 
11) बालाजी किणीकर 
12) लता सोनावणेअस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#ज #गलत #तयच #वचर #कर #नक #मळव #लव #शख #पजन #कढ #उदधव #ठकर #यच #आदश

RELATED ARTICLES

July Born Baby Names: तुमच्या बाळांना द्या ‘ही’ सर्वात हटके अन् गोंडस नावं

मुंबई, 4 जुलै: आपल्या बाळाचं नाव (Baby Names) हटके असावं, असं प्रत्येकाला वाटतं. त्याचं नाव सुंदर असावं, त्याचा अर्थही चांगला असावा आणि ते नाव प्रत्येकाला...

गुजरातसोबत महाराष्ट्रात निवडणुका होतील, संजय राऊतांचा दावा

मुंबई, 04 जुलै :  'आता ही तात्पुरती केलेली व्यवस्था आहे. ही कायम स्वरुपाची नाही. भाजपला शिवसेना फोडायची होती. त्यांनी फोडून दाखवली. फुटीर गटाला...

Most Popular

उदयपुर प्रकरणावर ट्वीट केल्याने स्वरा भास्कर झाली ट्रोल, अभिनेत्रीने ट्रोलर्सला सुनावले खडे बोल

Swara Bhasker : उदयपूरमध्ये कन्हैया लालच्या हत्येनंतर सोशल मीडियावर लोक संताप व्यक्त करत आहेत. या घटनेचा सर्वांनी निषेध...

बंड ते बहुमत चाचणी! 21 जूनच्या रात्रीपासून आजपर्यंत नेमकं काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Maharashtra Politics CM Eknath Shinde, Deputy CM Devendra Fadnavis Timeline : गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरु असलेल्या सत्तानाट्याचा...

पकडलेला लश्करचा दहशतवादी निघाला भाजपचा सदस्य?, नेत्याने म्हटले…

काश्मीरमध्ये सुरक्षा यंत्रणांनी दोन दहशतवाद्यांना अटक केलीय. आता या अटकेवरून राजकारण सुरू झालं आहे. एक दहशतवादी हा भाजपशी संबंधित असल्याचा आरोप केला जातोय....

‘मिर्झापूर’ फेम अभिनेत्याचा एकाच महिन्यात येतो दोनदा बर्थडे, काय आहे हे गुपित?

मुंबई 04 जुलै: मिर्झापूरमध्ये एका गँगस्टरच्या रूपात आलेले बॉलिवूड अभिनेते पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) सध्या एकदम प्रकाशझोतात असतात. ज्या वयात लोक रिटायरमेंट कडे...

‘भगतसिंग यांच्या फाशीवेळी ब्रिटिशांना जो आनंद झाला, तसा राज्यपालांना…’

मुंबई 04 जुलै : गेल्या काही दिवसांपासून राज्यात राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आलेला आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक आमदारांच्या बंडानंतर ठाकरे सरकार (Thackeray...

‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित ब्रिटिश दिग्दर्शकाचे निधन, जागतिक स्तरावर सादर केले होते महाभारत

लंडन: प्रसिद्ध चित्रपट आणि नाट्य दिग्दर्शक पीटर स्टीफन पॉल ब्रुक (Peter Brook Passes Away) यांचे लंडनमध्ये निधन झाले. ते ९७ वर्षांचे होते. २...