Friday, August 12, 2022
Home भारत जेव्हा पायलट हायजॅक झालेलं विमान समुद्रात उतरवण्याची तयारी करत होता, तेव्हा...ही 'भयानक...

जेव्हा पायलट हायजॅक झालेलं विमान समुद्रात उतरवण्याची तयारी करत होता, तेव्हा…ही ‘भयानक कथा’ अशी संपली


मुंबई : आज आम्ही तुम्हाला विमानाच्या हायजॅकिंगची एक कहाणी सांगणार आहोत. जी कोणत्याही सिनेमातली नाही तर सत्य घटनेवर आधारीत आहे. ज्याला लवकरच तुम्ही एका चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर पाहणार आहात. ही कहाणी आहे भारतीय विमान कंपन्यांच्या एअरबस ए 300 विमानाची. या विमानाचे 7 दहशतवाद्यांनी हायजॅक केले होते. या घटनेवर अक्षय कुमारचा ‘बेलबॉटम’ हा चित्रपट लवरच प्रदर्शित होणार आहे.

24 ऑगस्ट 1984 रोजी हायजॅक

24 ऑगस्ट 1984 रोजी 7 दहशतवाद्यांनी फ्लाइट 421 चे अपहरण केले होते, ज्याला IC 421 म्हणून ओळखले जात होते. हे देशातील विमान होते जे चंदीगडहून श्रीनगरला निघाले होते. या विमानात 100 प्रवासी होते. दहशतवाद्यांनी हे विमान लाहोर आणि कराचीला घेऊन गेले होते. शेवटी ते दुबईत उतरवण्यात आले.

नंतर संयुक्त अरब अमिरातीचे तत्कालीन संरक्षण मंत्री मोहम्मद बिन रशीद अल मखतूम यांच्या हस्तक्षेपानंतर प्रवाशांना सुखरूप सोडण्यात आले.

असे म्हटले जाते की, दहशदवादी त्यावेळी ‘खलिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा देत होते. या विमानाचे हायजॅक पंजाबमध्ये सुरू असलेल्या दहशतवादाशी संबंधित होते. हा तोच काळ होता जेव्हा येथे खलिस्तानी फुटीरतावादी सक्रिय होते.

दहशतवाद्यांनी सांगितले – विमान अमेरिकेला घेऊन जा

घटनेच्या काही वेळापूर्वी, विमानातील प्रवाशांना नाश्ता देण्यात आला. दहशतवाद्यांनी सकाळी साडेसात वाजता अपहरण केले. विमान लाहोर, कराची आणि दुबई दरम्यान 36 तास उड्डाण करत होते. यामध्ये सहभागी असलेले दहशतवादी सुमारे 20 वर्षांचे होते. त्यावेळी कॅप्टन व्ही.के. मेहता हे विमान उडवत होते.

दहशतवाद्यांनी प्रथम कॅप्टनकडे मागणी केली की, विमानाने आधी अमृतसरच्या सुवर्ण मंदिराला प्रदक्षिणा घालावी. दोन फेऱ्यांनंतर विमान लाहोरला नेण्यास सांगितले. लाहोर विमानतळाजवळ गेल्यानंतर दहशतवाद्यांनी आपले शेवटचे ठिकाण अमेरिका असल्याचे सांगितले.

लाहोरमध्ये लँडिंग मंजूर नाही

लाहोरमधील पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी त्याला उतरण्यास परवानगी नाकारली आणि रन्वे ब्लॉक करण्याचे आदेश दिले. यानंतर विमान 80 मिनिटांसाठी लाहोरवर फिरत राहिले. शेवटी, सकाळी 9:50 वाजता, जेव्हा फ्लाइटमध्ये इंधन संपले, तेव्हा लाहोर विमानतळाने त्यांना उतरण्यास मान्यता दिली. त्यानंतर पाकिस्तानला हे विमान शक्य तितक्या लवकर येथून पाठवून देण्याची इच्छा होती.

असे बोलले जात होते की, अपहरणकर्त्यांनी विमान अपहरण केले होते परंतु त्यांच्याकडे पुढे काय करायचे हे माहित नव्हते. जेव्हा त्यांना सांगण्यात आले की बोईंग अमेरिकेत उड्डाण करण्यास योग्य नाही, तेव्हा दहशतवाद्यांनी पाकिस्तानी अधिकाऱ्यांना घेरले आणि त्याने त्यांना संभाव्य जागेबद्दल विचारण्यास सुरुवात केली.

त्यानंतर दुपारी 3 वाजेपर्यंत विमान उड्डाण करण्यासाठी मोकळे झाले आणि धावपट्टीवर आणले जात होते. त्यावेळी पाकिस्तानमध्ये भारताचे उच्चायुक्त केडी शर्मा होते. त्यांनी भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधींचा संदेश तत्कालीन पाक पंतप्रधान जनरल झिया-उल-हक यांना दिला होता की, विमानाला कोणत्याही परिस्थितीत लाहोर सोडण्याची परवानगी देऊ नये. पण ही विनंती मान्य झाली नाही आणि विमानाने उड्डाण केले.

केडी शर्मा यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, “जेव्हा मी लाहोरला पोहचलो तेव्हा विमान आधीच तिथून निघून गेले होते. पाकिस्तान या विमानात आपले कमांडो पाठवू शकत होता. कारण त्यावेळेला दहशदवाद्यांकडे फारसे शस्त्र नव्हते. अशा परिस्थितीत कमांडो ऑपरेशन केले जाऊ शकत होते.”

एका दहशदवाद्याने क्रूला सांगितले की, त्याला लवकरात लवकर निघायचे आहे. संध्याकाळी 7 वाजता एका अपहरणकर्त्याने कॅप्टन मेहता यांना रिव्हॉल्व्हर दाखवली आणि विमानातून उतरण्याचा आदेश दिला. असे म्हटले जाते की या रिव्हॉल्व्हरमुळे देखील दोन्ही देशांदरम्यान खूप राजनैतिक तणाव होता.

विमानात बसलेले अनेक प्रवासी आणि क्रू मेंबर्स म्हणाले होते की, दहशदवाद्यांकडे लाहोरच्या आधी कोणतेही शस्त्रे नव्हते. फ्लाइट कॅप्टन आणि इतर क्रू मेंबर्सला रिव्हॉल्व्हर पाहून धक्का बसला. विमानातील दोन ब्रिटिश नागरिकांनी त्यावेळी सांगितले की, पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी दहशदवाद्यांना पार्सल दिले होते आणि रिव्हॉल्व्हर या पार्सलमधून बाहेर आले.

दहशदवाद्यांनी यापूर्वी कॅप्टनला विमानाला बहरीनला नेण्यास सांगितले होते, परंतु उड्डाण परिस्थितीचा हवाला देत ते करण्यास नकार दिला. यानंतर विमान कराचीला नेण्यात आले जेथे एक तासाच्या प्रतीक्षेनंतर ते दुबईला रवाना झाले. यूएईच्या अधिकाऱ्यांनीही तासाभर विमानाच्या लँडिंगला मंजूरी दिली नव्हती. त्यानंतर विमानतळावरील सर्व दिवे बंद झाले, त्याचबरोबर सर्व रेडिओ देखील बंद करण्यात आले.

कॅप्‍टन दुबईच्या अधिकाऱ्यांना लँडिंगसाठी विनंती करत राहिला. ते म्हणाले, ‘विमानात इंधन संपत असल्याने आम्हाला येथे ऊतरु द्या, पण तरीही अधिकारी काहीही ऐकायला तयार नव्हते.

दुसऱ्या दिवशी म्हणजे 25 सप्टेंबर 1984 रोजी सकाळी 6 वाजता, एअर होस्टेस रीता सिंह यांनी प्रवाशांना धैर्य ठेवण्याचे आवाहन केले.
ते म्हणाले की, लँडिंगची परवानगी न दिल्यास त्यांना समुद्रात विमान उतरावे लागू शकते. त्यानंतर तिने प्रवाशांना विमान पाण्यात उतरल्यानंतर विमानातून बाहेर पडण्याच्या सर्व प्रक्रियेबद्दल सांगितले.

परंतु त्यानंतर जे घडले ते आश्चर्यकारक होते कारण, हे ऐकल्यानंतरही प्रवासी अजिबात घाबरले नाहीत. सर्व प्रवासी विमानाच्या पहिल्या 15 ओळींमध्ये शिरले आणि शूज काढण्यास सुरुवात केली. त्यावेळी दहशदवाद्यांनी देखील आदेशाचे पालन केले आणि प्रवाशांसारखे वागू लागले.

कॉकपिटमध्ये कॅप्टन मेहता यूएईच्या अधिकाऱ्यांना ‘विनंती करत होते. त्यांना सांगितले की, आमच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही त्यामुळे आम्हाला विमान इथे उतरवण्याची परवानगी द्या. दुबईच्या वेळेनुसार पहाटे 4:50 वाजता त्यांना विमान तेथे लॅन्ड करण्याची मंजुरी मिळाली. त्या वेळी कॅप्टन मेहता म्हणाले, ‘गॉड ब्‍लेस यू, गॉड ब्‍लेस योर कंट्री.’

विमानाने 4:55 मिनिटांनी विमानाने लँडिंग केले आणि लँडिंगच्या वेळी विमानात फक्त 5 मिनिटे इंधन शिल्लक होते. येथे यूएई अधिकाऱ्यांसमोर नवीन आव्हानांना सामोरे जावे लागले. लाहोर आणि कराची वगळता दुबईतील अधिकाऱ्यांनी सर्व मदतीचा हात पुढे केला आणि संपूर्ण नाटकावर लक्ष ठेवण्यासाठी भारत सरकारने पाठवलेल्या आणखी एका विमानाला मंजुरी दिली.

त्यानंतर यूएईचे संरक्षण मंत्री शेख मोहम्मद बिन रशीद अल मख्तूम दुबईला परतले आणि त्यांनी दहशदवाद्याशी चर्चा सुरू केली. ते सकाळी 8 च्या सुमारास कंट्रोल टॉवरवर पोहोचले. सुरुवातीच्या चर्चा विमानाच्या संप्रेषण प्रणालीवर झाल्या.

एक पांढरी मर्सिडीज पाठवण्यात आली आणि त्यात एक दहशदवादी आला. उर्वरित अदहशदवाद्यांपैकी एक विमानातून उतरला आणि धावपट्टीवर चालायला लागला. विमानातील लोकांसाठी अन्न आणि पाणी पाठवण्यात आले पण दहशदवाद्यांनी ते परत केले. त्यानंतर आणखी दोन दहशदवादी चर्चेसाठी कंट्रोल टॉवरवर गेले.

विमानातील उर्वरित दहशदवादी काही काळानंतर अस्वस्थ झाले. त्याने संदेश पाठवला की, जर त्यांच्या साथीदारांना पुढील 10 मिनिटांच्या आत पाठवले नाही, तर तो विमान उडवून देईल. दहशदवादी कंट्रोल टॉवरवरून परत आले आणि बाकीच्या साथीदारांशी सल्लामसलत करू लागले. त्यानंतर दोन्ही दहशदवाद्यांनी कंट्रोल टॉवरवर जाऊन या कराराची बोलणी सुरू केली. त्यानंतर सर्व प्रवासी आणि क्रू यांना विमानातून ट्रान्झिट लाऊंजमध्ये नेण्यात आले.

त्यानंतर दहशदवादीना पांढऱ्या रंगाच्या वाहनात अज्ञात ठिकाणी नेण्यात आले.

दरम्यान, दुबईचे पोलीस प्रमुख कर्नल दही खल्फान तमीम यांनी माध्यमांना सांगितले की, अपहरणकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे आणि त्यांनी स्वतःहून आत्मसमर्पण केले आहे. अपहरणकर्त्यांना अमेरिकेत राजकीय आश्रय हवा होता आणि याची यूएईच्या अधिकाऱ्यांनी पुष्टी केली.

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#जवह #पयलट #हयजक #झलल #वमन #समदरत #उतरवणयच #तयर #करत #हत #तवहह #भयनक #कथ #अश #सपल

RELATED ARTICLES

Raosaheb Danve : मी रेल्वे मंत्री मात्र, माझ्या गावात अजून रेल्वे नाही : मंत्री रावसाहेब दानवे

Raosaheb Danve : 10 वर्ष आमदार (MLA) त्यानंतर 25 वर्ष खासदार म्हणून काम केले. मात्र अद्यापही माझ्या गावात...

सायकल खरेदी करताय! ‘या’ ऑनलाईन साईटवर मिळतेय स्वस्तात, जाणून घ्या

मुंबई : व्यायामासाठी अनेकांना जीमपेक्षा सायकलिंग करावी असे नेहमीच वाटतं असते. मात्र लॉकडाऊन नंतर सायकलचा खप आणि किंमती वाढल्याने अनेकांना बजेटमध्ये सायकल घेणे...

Most Popular

पुणे, कोल्हापूरसह राज्यात अनेक ठिकाणी पावसाची हजेरी, आज कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात यलो अलर्ट

Maharashtra Rain : सध्या राज्यात जोरदार पाऊस (Rain) कोसळताना दिसत आहे. अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आले आहेत....

Nokia मोबाईलची पुन्हा धमाकेदार एन्ट्री! एकदम तगडा 5G Smartphone, मोठा बॅटरी बॅकअप आणि जबरदस्त लूक

मुंबई : Nokia Smartphone : नोकिया बाजारात पुन्हा धमाका करण्याची तयारी करीत आहे. नोकिया नेक्स्ट सीरीजचा फोन आणत आहे. हा  5G Smartphone असणार...

‘रुपी’वरील हातोडा टाळता आला असता?

१९१२ मध्ये स्थापन झालेल्या सहकार क्षेत्रातील या जुन्या बँकेला सहकार क्षेत्रातील अनेक प्रकारच्या गैरव्यवहारांची बळी ठरल्याने ही घरघर लागली आहे. सचिन रोहेकर मराठी माणसांनी सुरू...

Terrorist Attack : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर दहशतवाद्यांचा मोठा कट उधळला,

Jammu Kashmir Terrorist Killed : देशात यंदा 75 व्या स्वातंत्र्यदिनाचा (Independence Day) उत्साह पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर...

जगातील पहिला असा Smartphone,बॉडीला चिकटणारे Earbuds; पाण्यात होणार नाही खराब, किंमत जाणून घ्या

मुंबई : Smartphone News : Ulefone ने किकस्टार्टर वर बिल्ट-इन TWS इअरबड्ससह जगातील पहिला तगडा स्मार्टफोन Ulefone Armor 15 लॉन्च केला आहे. Armor 15 के साथ...

PHOTO : बॉलिवूडच्या ‘पतौडी’ घराण्याची लेक, मनोरंजन विश्वात गाजवतेय नाव! वाचा सारा अली खानबद्दल.

PHOTO : बॉलिवूडच्या ‘पतौडी’ घराण्याची लेक, मनोरंजन विश्वात गाजवतेय नाव! वाचा सारा अली खानबद्दल... अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते...