Friday, August 12, 2022
Home लाईफस्टाईल जेवणावरून इच्छा उडाली असेल तर, हे आयुर्वेदिक उपाय करा

जेवणावरून इच्छा उडाली असेल तर, हे आयुर्वेदिक उपाय करा


नवी दिल्ली,03 ऑगस्ट : आजकाल बदलेल्या लाइफस्टाइलमुळे (Lifestyle) जेवणावरून इच्छा उडणे (Not Feel Like Eating Food), भूक न लागणे, भूक लागली असली तरी, लगेच पोट भरणे असे त्रास होत असतात. काहीवेळा आपण त्याकडे दुर्लक्ष (Ignore) करतो. पण, दररोज हेच होत असेल तर,शक्तपणा, चिडचिड व्हायला लागते. कधीकधी हा त्रास पोटाच्या विकारांमुळेही (Stomach Infection) असू शकतो. वेळेवर भूक लागणं आणि भूक लागल्यावर पोटभर खाणं चांगल्या आरोग्यासाठी (Health) आवश्यक आहे. भूक वाढवण्यासाठी (To Increase Appetite) काही सोपे आयुर्वेदिक उपाय (Ayurvedic Remedies) करता येतात.
त्रिफळा चूर्ण
त्रिफळा चूर्ण हा अनेक घरगुती उपायांमध्ये पोटासाठी रामबाण उपाय आहे. बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर, उपयोगी ठरतो. वेळेवर भूक लागण्यासाठी त्रिफळा चूर्ण पावडर एक ग्लास कोमट दुधात घ्या. नियमित घेतल्यास भूक वाढायला लागते.
(बिहारची ‘सुपर कॉप’ नवज्योत सिंग IPS होण्यासाठी सोडली डॉक्टरी)
ग्रीन टी
भूक वाढवण्यासाठी ग्रीन टी हा चांगला घरगुती उपाय मानला जातो. नियमित घेतल्यास भूक वाढतेच शिवाय अनेक आजारात आराम मिळतो. सकाळी आणि संध्याकाळी चहा घेण्यऐवजी ग्रीन टी घेऊ शकता. शक्यतो लोक हिवाळ्यात जास्त ग्रीन टी पितात पण, रोज प्यायल्यानेही फायदा होतो.
लिंबूपाणी
लिंबूपाणी पिण्याने शरीर हायड्रेट राहतं. त्यामुळे आवडत असेल तर, लिंबूपाणी घ्यावं नियमितपणे घेतल्यास भूक वाढते आणि शरीरात डिहायड्रेट होत नाही. साखर न घालता फक्त पाण्यात लिंबाचा रस मिलळून देखील घेऊ शकता.
(Stressमुळे मुलांमध्ये दिसतात ‘ही’ लक्षणं; Online अभ्यासामुळे होतोय वाईट परिणाम)
ओवा
घरगुती उपाय म्हणून पोटाशी संबंधित अनेक समस्यांवर ओवा वापराल जातो. यामुळे अपचन किंवा भूक न लागण्याच्या समस्येत फायदा होतो. यामुळे पोट साफ राहतं. ओवा शक्यतो थोडा भाजून त्याला मीठ लावून खावा. भूक लागत नसेल तर, दिवसातून एक ते दोन वेळा नक्की खा.
(Kaolin clay: ही माती त्वचेवर करेल चमत्कार; नितळ, कुठे मिळेल, कशी वापराल?)
सर
भूक लागत नसेल किंवा जेवण जात नसेल तर, जेवणाऐवजी फळांचे रस प्यायला सुरूवात करा. पण, बाजारात मिळणारे प्रोसेस केलेले ज्युस वापरू नका. घरी फळांचा ताजा रस काढा सैंधव मीठ किंवा साधं मीठ आणि काळी मिरी पावरडर घाला. शक्यतो साखर घालू नका. यामुळे पोट साफ होईल आणि भूकही लागेल.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#जवणवरन #इचछ #उडल #असल #तर #ह #आयरवदक #उपय #कर

RELATED ARTICLES

Raosaheb Danve : मी रेल्वे मंत्री मात्र, माझ्या गावात अजून रेल्वे नाही : मंत्री रावसाहेब दानवे

Raosaheb Danve : 10 वर्ष आमदार (MLA) त्यानंतर 25 वर्ष खासदार म्हणून काम केले. मात्र अद्यापही माझ्या गावात...

सायकल खरेदी करताय! ‘या’ ऑनलाईन साईटवर मिळतेय स्वस्तात, जाणून घ्या

मुंबई : व्यायामासाठी अनेकांना जीमपेक्षा सायकलिंग करावी असे नेहमीच वाटतं असते. मात्र लॉकडाऊन नंतर सायकलचा खप आणि किंमती वाढल्याने अनेकांना बजेटमध्ये सायकल घेणे...

Most Popular

Girish Mahajan at Jalgaon : मंत्रिपदी वर्णी लागल्यानंतर गिरीश महाजन यांचं जळगावात जंगी स्वागत

Girish Mahajan at Jalgaon : शिंदे-फडणवीस सरकारमध्ये कॅबनेट मंत्रिपदी वर्णी लागल्यानंतर गिरीश महाजन (Girish Mahajan) आज प्रथमच जळगावमध्ये...

१६ जीबी रॅमसह येणाऱ्या OnePlus च्या ५जी फोनवर ५ हजार रुपयांची सूट, ऑफर एकदा पाहाच

नवी दिल्ली :OnePlus ने काही दिवसांपूर्वीच OnePlus 10T 5G या स्मार्टफोनला भारतात लाँच केले आहे. वनप्लसचा हा फोन ८ जीबी + १२८ जीबी...

गर्भातील बाळाची पोझिशन कशी ओळखाल? त्याचा प्रसूतीवर परिणाम होतो का?

Know Baby Position : बेबी मॅपिंग म्हणजे काय? हे आधी आपण जाणून घेऊया. गर्भावस्थेच्या तिसऱ्या तिमाहीत बाळाची पोझिशन जाणून घेण्यासाठी बेली मॅपिंग केलं...

दैनंदिन राशीभविष्य: धनु राशीसाठी आज सांभाळून राहण्याचा दिवस; तर कुंभ राशीला लाभ

आज दिनांक १२ऑगस्ट २०२२. वार शुक्रवार. पौर्णिमा समाप्ती सकाळी ७ .२३.आज चंद्र धनिष्ठा नक्षत्रात असेल. पाहुया आजचे बारा राशींचे भविष्य. मेष दिवस आनंद निर्माण करणारा...

श्रावणात वरदलक्ष्मी व्रत का केले जाते? जाणून घ्या पूजा, विधी आणि महत्त्व

Varad Lakshmi Vrat 2022 : श्रावण मासातील शुक्लपक्षात येणाऱ्या शेवटच्या शुक्रवारी वरदलक्ष्मी हे व्रत करतात. पूर्वी ज्यांनी हे...

विस्ताराला 40 दिवस, आता खातेवाटपही रखडलं! महत्वाची दोन कारणं, ज्यामुळं खातेवाटपाची प्रतीक्षा

Maharashtra Cabinet News : शिंदे-फडणवीस सरकारचा 40 दिवसांनी मंत्रिमंडळ विस्तार (cabinet expansion) झाला मात्र आता खातेवाटप रखडलं आहे....