Saturday, August 20, 2022
Home टेक-गॅजेट जुना-नवीन अँड्रॉयड स्मार्टफोन गरम होतोय?, या १० ट्रिक्सचा वापर करून ठेवा थंड

जुना-नवीन अँड्रॉयड स्मार्टफोन गरम होतोय?, या १० ट्रिक्सचा वापर करून ठेवा थंड


नवीन फोन खरेदी केल्यानंतर आपण हाच विचार करतो की, आता कोणत्याही प्रकारची समस्या येणार नाही. फोनची मेमरी खाली आहे. फोन हँग होणार नाही. ऑपरेटिंग सिस्टम नवीन आहे तर स्मूथ काम करेल. तसेच कॅमेरा नवीन असल्याने चांगली फोटोग्राफी करता येईल. परंतु, महिना उलटताच काही जण फोन संबंधी तक्रारी करायला सुरुवात करतात. यात अनेकांची तक्रार ही असते की, फोन गरम होत आहे. नवीन फोन असो की जुना गरम होण्याची समस्या ही अनेकांना येते. कधी कधी ही समस्या धोकादायक ठरू शकते. जितकी जास्त ही समस्या ऐकायला मिळते तितक्या वेळा फोनला ठीक करण्यासाठी सर्विस सेंटरला जावे लागते. परंतु, आज आम्ही तुम्हाला १० ट्रिक्स सांगणार आहोत.

फोन गरम होण्याचे कारण
जर तुमचा फोन गरम होत असेल तर सर्वात आधी हे जाणून घ्या की, कोणत्या फीचरचा वापर केल्यानंतर फोन गरम होत आहे. अनेक फोन हे चार्जिंगवेळी गरम होतात. तर काही फोन इंटरनेटचा वापर करताना गरम होतात. काही फोनमध्ये कॉलिंग दरम्यान गरम होण्याची तक्रार असते, तर काही फोनमध्ये कॅमेराचा वापर करताना समस्या येते.

​चार्जिंग दरम्यान फोन गरम होतो

जर तुमचा अँड्रॉयड फोन चार्जिंग दरम्यात गरम होत असेल तर हे खूपच धोकादायक आहे. तुम्ही वेळीच सावध व्हायला हवे. सर्वात आधी फोनला दुसऱ्या चार्जरने चार्ज करून पाहा. याशिवाय, तुम्ही पॉवर सॉकेट सुद्धा बदलू शकता. चार्जिंग दरम्यान पिनला व्यवस्थित कनेक्ट करा. ठीक होत नसल्यास समजून जा की, बॅटरी किंवा सॉफ्टवेयरची समस्या आहे. बॅटरी जुनी असल्यास अनेक समस्या येतात. त्यामुळे आधी बॅटरी कॅलिब्रेट करा त्यानंतर सॉफ्टवेयर अपडेट आल्यास त्याला अपडेट करा. बॅटरी कॅलिब्रेशनची पद्धत जाणून घ्या. जर याने फायदा होत नसेल तर समजून जा की, बॅटरी बदलण्याची वेळ आली आहे. त्यानंतर फोन व्यवस्थित चालू शकतो.

वाचाः Xiaomi Book S लॅपटॉप यूरोपमध्ये लाँच, १३ तासांहून जास्त बॅटरी बॅकअप, लवकरच भारतात येणार

​बॅटरी हेल्थवर नजर टाका

प्रत्येक बॅटरीची एक लाइफ असते. ज्याला आपण बॅटरी सायकल म्हणतो. फोन गरम होत असल्यास बॅटरी सायकल कधी संपेल हे आपल्याला कळत सुद्धा नाही. जर तुमच्या फोनची बॅटरी सायकल संपली असेल तर फोन गरम होईल. जर तुमच्या फोनची बॅटरी लवकर संपत असेल तर फोन गरम होतो. त्यामुळे बॅटरी बदलण्याची वेळी आली असं समजा. बॅटरी सायकल जाणून घेण्यासाठी तुम्ही प्ले स्टोरवरून बॅटरी हेल्थ किंवा अन्य दुसऱ्या अॅपवरून डाउनलोड करू शकता.

वाचाः Apple ची तगडी ऑफर, iPad-Macbook वर हजारोंची सूट, फ्रीमध्ये मिळतील AirPods

​कोणत्याही फीचरचा वापर करताना फोन गरम होतोय

अनेकदा अँड्रॉयड फोन थोडा जुना झाल्यास यासारखी समस्या येते. काहीही उपयोग केल्यानंतर फोन गरम होतो. त्यामुळे तुम्ही अनेकदा सॉफ्टवेयर अपडेट वर नजर टाका. नेहमी सॉफ्टवेयरला अपडेट केल्यानंतर अनेक समस्या गायब होतात. कंपन्यांना अशा प्रकारची समस्या येत असल्यास हे ठीक करण्यासाठी अपडेट पाठवत असते. सॉफ्टवेयर अपडेट नंतर फोन ठीक होत नसेल तर एकदा हार्ड रिसेट करून पाहा.

वाचा: नवीन घरी शिफ्ट झाला असाल तर ‘असा’ करा Aadhaar Card मध्ये Address अपडेट, घर बसल्या होईल काम

​गेम खेळताना फोन जास्त गरम होतो

नेहमी अँड्रॉयड फोन गेम खेळताना गरम होत असल्याच्या अनेकांच्या तक्रारी आहेत. जर थोडा गरम होत असेल तर ठीक आहे. परंतु, जास्त गरम होत असल्यास समजून जा की, हे ओव्हरलोड आहे. कारण, फोनमध्ये एकाचवेळी अनेक फीचर्स सुरू असतात. यासाठी बॅकग्राउंड मध्ये रन करीत असलेल्या अॅप्लिकेशनला बंद करा. यासाठी सर्वात आधी फोनच्या सेटिंग मध्ये जा. त्या ठिकाणी अॅप्सची निवड करा. वर दिलेले काही टॅब तुम्हाला दिसतील. ज्यात रनिंग अॅपचा एक ऑप्शन असेल. त्या अॅप्सला बंद करा ज्याचा वापर तुम्ही करीत नाहीत.

वाचा: Online Banking: अकाउंट कधीच हॅक होणार नाही, सुरक्षित इंटरनेट बँकिंगसाठी फॉलो करा ‘या’ ५ टिप्स

​विनाकारण फोन गरम होत असल्यास

अनेकदा फोन हातात किंवा खिशात असताना सुद्धा गरम होतो. याचे कारण म्हणजे फोन ओव्हरलोड आहे. नवीन फोन मध्ये बॅकग्राउंड मध्ये अॅप्स लिमिटचे ऑप्शन आहे. याचा वापर तुम्ही करू शकता. याशिवाय, वर दिलेल्या प्रक्रिया सुद्धा वापरू शकता. जर फोन ठीक होत नसेल तर बॅटरीला ऑप्टिमाइज करू शकता. यासाठी तुम्हाला सेटिंग मध्ये जावून बॅटरी ऑप्शन मिळेल. या ठिकाणी पाहू शकता. कोणते अॅप्लिकेशन जास्त बॅटरीचा वापर करीत आहे. जे अॅप्लिकेशन बॅटरीचा जास्त वापर करीत असेल ते अॅप्लिकेशन तुम्ही बंद करू शकता. गुगल मॅप आणि गुगल अॅप सर्वात जास्त बॅटरीचा वापर करतात. त्यामुळे सर्वात आधी याला बंद करायला पाहिजे.

वाचा: Best Plans: ‘हा’ प्लान आहे जबरदस्त, एकाच रिचार्जवर चालणार घरातील चार जणांचा फोन, सोबत डेटा आणि OTT बेनेफिट्स सुद्धा

व्हिडिओ प्ले दरम्यान फोन गरम होतोय

ब्राउझिंग दरम्या फोन होतोय गरम

अनेकदा फोन इंटरनेट ब्राउझिंग दरम्यान गरम होत असतो. जर तुमच्या फोनच्या बाबतीत असं होत असेल तर तुम्हाला ब्राउझरच्या सेटिंगमध्ये जावून कंप्रेस डेटाला अॅक्टिव करा. तसेच तुम्ही ब्राउझरला अपडेट करू शकता.

व्हिडिओ प्ले दरम्यान फोन गरम होतोय

व्हिडिओ प्ले करताना फोन जास्त गरम होतो. जर तुमच्या फोनमध्ये व्हिडिओ स्ट्रीम आणि व्हिडिओ प्ले दरम्यान फोन थोडा गरम होत असल्यास घाबरण्याची गरज नाही. परंतु, लो रेंज व्हिडिओ स्ट्रिम करीत असताना फोन गरम होत असल्यास फोनला चेक करा.

वाचाः WhatsApp कॉलिंग दरम्यान डेटा लवकर संपतो? सेटिंगमध्ये करा ‘हा’ छोटासा बदल

​कॉलिंग दरम्यान फोन गरम होतोय

जर तुमचा फोन कॉलिंग दरम्यान गरम होत असल्यास ही बँड किंवा अँटिनाची समस्या असू शकते. यासाठी फोनला अपडेट करू शकता. जर तुम्ही फोनला कव्हर लावत असाल खास करून मेटलचे तर त्याला वेळीच हटवा. फोन स्पीकर गरम होत असल्यास एकदा फोनला फॅक्ट्री डेटा रिसेट करा. फॅक्ट्री डेटा रिसेट तुम्हाला फोनच्या सेटिंग मध्ये जावून बॅक अप अँड रिसेट मध्ये मिळेल. जर तुमचे हे सर्व करूनही समाधान होत नसेल तर तुम्ही फोनला घेऊन सर्विस सेंटरला जावू शकता.

वाचाः जिन्स पँटच्या पाठीमागच्या खिशात फोन ठेवताय?, ‘या’ ५ समस्याला तुम्ही निमंत्रण देताय

नवीन फोन गरम होतोय

म्यूझिक प्ले किंवा मेसेजिंग मध्ये फोन गरम होतोय

जुन्या अँड्रॉयड फोनमध्ये इंटरनल मेमरी जास्त असल्याने कधी कधी फोन गरम होण्याची समस्या येते. त्यामुळे अनावश्यक फाईलला इंटरनेट मेमरी मधून डिलीट करा. मेमरी खारी करा. जर यानंतरही ठीक होत नसेल तर एकदा फोनची फॅक्ट्री डेटा रिसेट करा.

नवीन फोन गरम होतोय

जर तुमचा फोन नवीन आहे. वॉरंटीमध्ये आहे. तरीही त्या फोनमध्ये गरम होण्याची समस्या येत असल्यास त्या फोनला तात्काळ सर्विस सेंटरकडे घेऊन जा. शक्य असल्यास फोनला रिप्लेस करा. ही हार्डवेयरची समस्या असू शकते. तुम्हालाही पुढेही ही समस्या येवू शकते.

वाचाः Flipkart वर सुरूये खास सेल, अवघ्या ७९ रुपयात मिळेल वस्तू; ८० टक्क्यांपर्यंत डिस्काउंट उपलब्धअस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#जननवन #अडरयड #समरटफन #गरम #हतय #य #१० #टरकसच #वपर #करन #ठव #थड

RELATED ARTICLES

मुंबईत 111, तर ठाण्यात 37 गोविंदा जखमी; काल दिवसभरात 88 गोविंदांवर उपचार करुन डिस्चार्ज

Dahi Handi Festival 2022 : यंदा तब्बल दोन वर्षांनंतर राज्यसभारत दहीहंडी (Dahi Handi) उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात...

शंख मुद्रा केल्याने मुलांच्या आत्मविश्वासात होते वाढ, ही आहे योग्य पद्धत

शंख मुद्रा करायला खूप सोपी आहे आणि त्याचा नियमित सराव केल्याने मुलांची एकाग्रता वाढते आणि त्यांचे मन शांत राहते. ही मुद्रा सर्व वयोगटातील...

Most Popular

‘आज ‘मुरलीधराचा’ सण आणि…’ सुबोधला मिळाले खास आशीर्वाद

मुंबई, 19 ऑगस्ट : मराठीतील प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे सध्या कायम चर्चेत आहे. त्याचा 'बस बाई बस' या कार्यक्रमाची सध्या प्रचंड चर्चा आहे....

रोनाल्डो डॉर्टमंडकडे?

वृत्तसंस्था, लंडन : नामांकित फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो जर्मनीतील बोरुसिया डॉर्टमंड क्लबशी करारबद्ध होणार असल्याची शुक्रवारी फुटबॉलजगतात जोरदार चर्चा झाली. अर्थात, या संदर्भात अजून...

20th August 2022 Important Events : 20 ऑगस्ट दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

20th August 2022 Important Events : ऑगस्ट महिना सुरु झाला आहे. आणि ऑगस्ट महिन्यातील आजचा दिवस म्हणजेच 20...

पत्नी म्हणाली, मी थकलीये तुम्ही भाजी घेऊन या, ऐकल्यावरच पती संतापला अन् भर…

नवी दिल्ली, 19 ऑगस्ट : अनेकदा पती-पत्नीमध्ये छोट्या मोठ्या गोष्टीवरुन वाद होत असतात. मात्र, काही वेळा हे वाद टोकालाही जातात. तसेच यातून अनेकदा...

वाढतं Belly Fat कसं कमी कराल? आजच बदला ‘या’ 4 सवयी

वजन कमी करण्यासाठी आपण दररोज खाण्यापिण्याची सवय बदलली पाहिजे. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा...

भारत-झिम्बाब्वे एकदिवसीय मालिका : राहुल सलामीला उतरणार?; झिम्बाब्वेविरुद्धच्या उर्वरित एकदिवसीय मालिकेत भारताची नवी रणनीती

पीटीआय, हरारे : झिम्बाब्वेविरुद्ध शनिवारी होणाऱ्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात कर्णधार केएल राहुलला फलंदाजीची संधी मिळेल अशी आशा आहे. याचप्रमाणे उर्वरित दोन एकदिवसीय सामन्यांत...