Saturday, July 2, 2022
Home करमणूक 'जी ले जरा'साठी एकत्र आल्या आलिया- कतरिना, सोशल मीडियावर ट्रोल झाला रणबीर...

‘जी ले जरा’साठी एकत्र आल्या आलिया- कतरिना, सोशल मीडियावर ट्रोल झाला रणबीर कपूर


हायलाइट्स:

  • ‘जी ले जरा’साठी आलिया भट्ट आणि कतरिना कैफ येणार एकत्र
  • चित्रपटाच्या घोषणेनंतर अभिनेता रणबीर कपूर होतोय सोशल मीडियावर ट्रोल
  • आलिया भट्टच्या आधी कतरिना कैफसोबत रिलेशनशिपमध्ये होता रणबीर

मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट लवकरच ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’च्या सीक्वेलमध्ये दिसणार. तिनं सोशल मीडियावर नुकतीच ‘जी ले जरा’ चित्रपटाची घोषणा केली आहे. आलियासोबत या चित्रपटात अभिनेत्री कतरिना कैफ आणि ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा देखील दिसणार आहे. ३ आघाडीच्या अभिनेत्री मुख्य भूमिकेत असलेला हा चित्रपट २०११ साली रिलीज झालेल्या ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ चित्रपटाचं फिमेल व्हर्जन आहे. पण आता या चित्रपटाच्या घोषणेनंतर आलियाचा बॉयफ्रेंड रणबीर कपूर मात्र सोशल मीडियावर ट्रोल होत आहे.

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा तर नेहमीच सोशल मीडियावर होताना दिसतात. अलिकडच्या काळात तर या दोघांच्या लग्नाच्या चर्चाही झाल्या होत्या. पण आलियाला डेट करण्यापूर्वी रणबीर कपूर अभिनेत्री कतरिना कैफसोबत रिलेशनशिपमध्ये होता. आता आलिया भट्ट तिच्या बॉयफ्रेंडची एक्स गर्लफ्रेंड कतरिनासोबत एकत्र काम करणार असल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत आणि त्यांनी सोशल मीडियावर रणबीरला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

‘जी ले जरा’च्या अधिकृत घोषणेनंतर नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर कमेंट करत रणबीर कपूरला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. एका युझरनं लिहिलं, ‘रणबीर कपूरला #JeeLeZaraa खूपच आवडेल कारण त्याची गर्लफ्रेंड आणि एक्स गर्लफ्रेंड या रोड ट्रीपसाठी एकत्र असणार आहे.’ तर दुसऱ्या युझरनं लिहिलं, ‘#JeeLeZaraa ची स्टार कास्ट चुकली आहे. त्यांनी प्रियांका चोप्राच्या जागी दीपिका पादुकोणला घ्यायला हवं होतं.’

रणबीर कपूरच्या लव्ह लाइफबद्दल तर सर्वांनाच माहीत आहे. सुरुवातीला रणबीर कपूर अभिनेत्री दीपिका पादुकोणला डेट करत होता. काही वर्ष दोघं रिलेशनशिपमध्ये होते आणि नंतर दीपिकासोबत ब्रेकअप झाल्यानंतर त्यानं कतरिना कैफला डेट करण्यास सुरुवात केली. अनेकदा रणबीरनं कतरिनासाठी दीपिकाला सोडलं असंही बोललं गेलं आहे. पण रणबीर- कतरिनाचं नातंही फार काळ टिकलं नाही आणि ते काही वर्षात ते वेगळे झाले. सध्या रणबीर कपूर अभिनेत्री आलिया भट्टला डेट करत असून मागच्या काही काळापासून या दोघांच्या लग्नाच्या चर्चाही सोशल मीडियावर होताना दिसत आहेत.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#ज #ल #जरसठ #एकतर #आलय #आलय #कतरन #सशल #मडयवर #टरल #झल #रणबर #कपर

RELATED ARTICLES

वेबविश्वात आणखी एक खळबळ! रानबाजारनंतर खुर्चीचं राजकारण; पानसेंची नवी वेबसिरीज भेटीला

मुंबई 1 जुलै: सध्या महाराष्ट्रातील राजकारणात अनेक उलाढाली होत आहे. एक ना अनेक अनपेक्षित उलथापालथ सध्या पाहायला मिळत आहे. राजकारणाच्या सध्याच्या याच पार्श्वभूमीवर...

‘नाराज होऊ नका, हे आपलंच सरकार’, देवेंद्र फडणवीसांकडून भाजप आमदारांची मनधरणी

मुंबई, 1 जुलै : राज्यात शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि भाजप (BJP) यांचं एकत्रित सरकार स्थापन झालं आहे. हे सरकार...

‘E म्हणजे एकनाथ आणि D म्हणजे देवेंद्र हे आमचे ED चे राज्य’

ज्ञानेश्वर साळोखे, प्रतिनिधी पणजी, 1 जुलै : मुंबईत सध्या विविध राजकीय घडामोडी घडत आहेत. विशेष म्हणजे शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांची आज...

Most Popular

INDvsENG: टीम इंडियाची वन-डे, टी20 सीरिजसाठी घोषणा, IPL स्टारला पहिल्यांदा संधी

नवी दिल्ली, 01 जुलै : बीसीसीआयने इंग्लंडविरुद्धच्या वनडे आणि टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. रोहित शर्मा दोन्ही संघात कर्णधार म्हणून पुनरागमन...

रस्त्याने चालताना सावधान! वाऱ्यामुळे तरुणासोबड घडला असा प्रकार, व्हिडीओ पाहून बसेल धक्का

सोशल मीडियाचं जग हे असं जग आहे, जेथे आपण एकदा का गेलो की, मग त्यामध्ये तासन तास रमतो. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक...

National Doctors’ Day : डॉक्टरांच्या जीवनाची ‘ही’ 4 चक्रे माहित आहेत का? तुमच्या विचारांच्या पलीकडील जग..!

भारत 1 जुलै हा 'नॅशनल डॉक्टर्स डे' (national doctors day) किंवा राष्ट्रीय डॉक्टर्स डे म्हणून साजरा करतो आणि दरवर्षी इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA)...

Indian Army Agniveer Recruitment 2022 : अग्निवीरांच्या भरतीसाठी आजपासून ऑनलाईन नोंदणी सुरु

Indian Army Agniveer Recruitment 2022 : भारतीय लष्करामध्ये आजपासून अग्निपथ योजनेद्वारे अग्निवीरांच्या भरतीसाठी नोंदणी सुरू झाली आहे. इच्छुक...

‘भाई, रक्ताच्या नात्यापेक्षा जास्त जवळ केलंत,’धर्मवीर’च्या निर्मात्याने उलगडलं मुख्यमंत्र्यांबरोबरचं नातं

मुंबई : महाराष्ट्रातील राजकीय क्षेत्रासाठी गेला आठवडा अत्यंत धामधुमीचा होता. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यामुळे राज्यातील उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकार...

रिषभ पंतने रचला इतिहास, १२० वर्षांत एकाही क्रिकेटपटूला जमली नाही ही मोठी गोष्ट

भारताची ५ बाद ९८ अशी दयनीय अवस्था झाली होती. त्यावेळी पंत हा भारतीय संघासाठी तारणहार ठरला. कारण पंतने यावेळी फक्त भारताच्या डावाला आधार...