Saturday, August 13, 2022
Home क्रीडा जिनं हरवलं ती 'ताई'च झाली सिंधूची फॅन; म्हणाली, सिंधूमुळेच मला...

जिनं हरवलं ती ‘ताई’च झाली सिंधूची फॅन; म्हणाली, सिंधूमुळेच मला…


Tokyo Olympics 2020 : टोकियो : खेळात नेहमीच विजय आणि पराभव होत राहणार. प्रत्येक दिवस प्रत्येक खेळाडूचा नसतोच. तसेच त्याला मिळालेल्या प्रत्येक संधीचे सोने करता येईल असे नाही. असंच काहीसं टोकियोच्या बॅडमिंटन कोर्टवर पाहायला मिळालं. जगातील अव्वल महिला बॅडमिंटनपटू चीनी तैपेई खेळाडू ताई त्झू यिंगने सिंधूला पराभूत केल्यानंतर सुवर्णपदकाची प्रबळ दावेदार मानले जात होते. पण सुवर्णपदकाच्या सामन्यात तिला चीनच्या चेन युफेईकडून पराभव पत्करावा लागला. या पराभवामुळे ताईला जोरदार धक्का बसला होता. तेव्हा सिंधूने तिला प्रोत्साहन देत तिचा आत्मविश्वास वाढवला. याबाबतचा खुलासा स्वत: ताईने केला आहे.

जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या चीनच्या चेन युफेई आणि जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या ताईमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. दोघींमधील सामना तीन सेट पर्यंत चालला. युफेईने पहिला सेट 21-18 जिंकला, दुसऱ्या गेममध्ये ताईने कमबॅक करत 21-19 असा सेट जिंकला. त्यानंतर चीनी युफेईने तिसरा सेट जिंकत सुवर्णपदक पटकावले. त्यामुळे ताईला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

सिंधूला तोड नाही
चीनी तैपेई खेळाडू ताईने पारितोषिक वितरण समारंभानंतरचा किस्सा सांगितला. ती म्हणाली की, अंतिम सामन्यात पराभूत झाल्यानंतर मी खूप निराश झाले होते. तेव्हा सिंधूने तिला प्रोत्साहन देत तिची हिंमत वाढवली. सिंधू माझ्याकडे धावत आली आणि माझा चेहरा तिने हातांनी उचलून धरत म्हणाली की, मला माहीत आहे तू सध्या निराश आहेस. तुझ्या मनात सध्या काय विचार येत असतील. पण तू खूप छान खेळ खेळलीस. आज फक्त तुझा दिवस नव्हता. त्यानंतर सिंधूने मला मिठी मारली आणि मला सगळं समजतंय असं म्हणाली. सिंधूच्या या शब्दांनी तिला धीर आला, असं ताई म्हणाली.

टोकियोनंतर निवृत्तीचे संकेत
जगभरात ताईचे चाहते आहेत. तिला टोकियोमध्ये सुवर्ण पदक जिंकायचे होते. अवघी 27 वर्षांची असलेल्या ताईने टोकियो ऑलिम्पिकनंतर निवृत्तीचे संकेत दिले आहेत. मी अर्ध आयुष्य बॅडमिंटन खेळले आहे. आता उर्वरीत आयुष्यात दुसरं काहीतरी करण्याचा विचार करत आहे, असं ताई म्हणाली.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#जन #हरवल #त #तईच #झल #सधच #फन #महणल #सधमळच #मल

RELATED ARTICLES

Maharashtra Breaking News : देश-विदेशसह राज्यभरातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर

मुंबई: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या सर्व घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक,...

सावधान! या 3 पेयांमुळे तुमचा मेंदू लवकर होऊ शकतो वृद्ध, पाहा कोणती आहेत ती पेय

मुंबई, 13 ऑगस्ट : ज्याप्रमाणे त्वचा, केस आणि शरीराला योग्य पोषण, आहार मिळाला नाही, तर वृद्धत्वाचा परिणाम त्यांच्यावर लवकर दिसून येतो, त्याचप्रमाणे आपला...

प्रसिद्ध लेखकावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला, प्रकृती नाजूक

न्यूयॉर्क : एका कार्यक्रमासाठी आलेल्या प्रसिद्ध लेखकावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामध्ये लेखक गंभीर जखमी झाला. त्यांना हेलिकॉप्टरमधून तातडीने रुग्णालयात दाखल...

Most Popular

राखीपौर्णिमेसाठी माहेरी आली होती तरुणी; पहिल्या प्रियकराने घेतली भेटली भेट अन्..

बरकत अली असे मृताचे नाव असून तो गंगापूर शहरातील मदिना मशिदीचा रहिवासी आहे. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि...

Todays Headline 13th August : आज दिवसभरात घडणाऱ्या राष्ट्रीय आणि स्थानिक महत्त्वाच्या बातम्या 

मुंबई: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या सर्व घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत...

प्रसिद्ध लेखकावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला, प्रकृती नाजूक

न्यूयॉर्क : एका कार्यक्रमासाठी आलेल्या प्रसिद्ध लेखकावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामध्ये लेखक गंभीर जखमी झाला. त्यांना हेलिकॉप्टरमधून तातडीने रुग्णालयात दाखल...

त्यांनी आम्हाला असं अर्ध्यावर…; गोपीनाथ मुंडेंचा फोटो पाहताच पंकजा मुंडे भावूक

मुंबई, 12 ऑगस्ट: झी मराठीवरील बस बाई बसच्या या आठवड्यात भापज नेत्या पंकजा मुंडे सहभागी झाल्या आहेत. सुप्रिया सुळे, अमृता फडणवीस यांच्यानंतर पंकजा...

झिम्बाब्वे दौऱ्यासाठी लक्ष्मण मुख्य प्रशिक्षक

नवी दिल्ली : राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मणची झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे, अशी माहिती ‘बीसीसीआय’चे...