Saturday, May 21, 2022
Home लाईफस्टाईल जास्त आलं खाल्ल्यानं Low होऊ शकतं ब्लड प्रेशर, त्याचे हे साईड इफेक्ट...

जास्त आलं खाल्ल्यानं Low होऊ शकतं ब्लड प्रेशर, त्याचे हे साईड इफेक्ट जाणून घ्या


मुंबई, 13 मे : आल्याचा वापर जवळपास प्रत्येक घरात केला जातो. आलं त्याच्या आश्चर्यकारक चवीसाठी प्रसिद्ध आहे. अनेक लोकांना सकाळी आलं घातलेलाच चहा हवा असतो. आलं केवळ मसाल्याच्या रूपातच नाही तर हजारो वर्षांपासून अनेक संस्कृतींमध्ये पारंपारिक उपाय म्हणून वापरले जात आहे, कारण त्याचे अनेक आरोग्य फायदे आहेत. हेल्थसाठी चांगलं असल्याने काही लोक त्याचे अधिक सेवन करू लागतात, ज्यामुळे फायद्याऐवजी नुकसान होते. असं अनेकदा घडलंय की आलं जास्त खाल्लं गेल्यानं अनेक प्रकारच्या आरोग्य समस्या वाढतात. आज जाणून घेऊया त्याचे दुष्परिणाम (Ginger Side Effects) काय आहेत.

रक्तस्त्राव होण्याचे कारण –

आल्यामध्ये अँटीप्लेटलेट गुणधर्म असल्याने जास्त सेवन केल्यास रक्तस्त्राव होऊ शकतो. लवंग किंवा लसूण आल्यासोबत एकत्र खाल्ल्यास रक्तस्त्राव होण्याचा धोका आणखी वाढतो.

अतिसाराचा धोका –

मोठ्या प्रमाणात आलं खाल्लं गेल्यास आतड्यांमधून अन्न आणि मल बाहेर जाण्याचा वेग वाढू शकतो आणि नंतर हा त्रास वाढू शकतो, ज्यामुळे अस्वस्थता आणि अशक्तपणा जाणवू शकतो.

हे वाचा – चेहऱ्याच्या या भागांवर तीळ असणं मानलं जातं शुभ; तिळावरून असं कळतं व्यक्तिमत्व
हृदय समस्या –

जास्त आलं खाल्लं गेल्यानं हृदयाच्या ठोक्यांवरही नकारात्मक परिणाम होतो. या औषधी वनस्पतीच्या अतिसेवनामुळे अंधुक दृष्टी, हृदय जास्त धडधडणे आणि निद्रानाश होतो, असे सांगितले जाते. यामुळे रक्तदाब देखील कमी होऊ शकतो, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते.

त्वचा आणि डोळ्यांना अ‌ॅलर्जी

आल्याच्या अतिसेवनामुळे होणार्‍या मुख्य दुष्परिणामांची सर्वात सामान्य लक्षणे म्हणजे त्वचेवर पुरळ उठणे, डोळे लाल होणे, धाप लागणे, खाज सुटणे, ओठ सुजणे, डोळे खाजणे आणि घसा खवखवणे. अशा परिस्थितीत, ताबडतोब वैद्यकीय मदत घेणे चांगले आहे.

हे वाचा – 16 मे रोजी आहे पहिलं चंद्रग्रहण, या 5 राशीच्या लोकांनी आतापासूनच राहा सावध
गर्भधारणेदरम्यान असुरक्षित –

दररोज 1500 मिलीग्रामच्या विहित मर्यादेपेक्षा जास्त आलं सेवन केल्यास देखील गर्भपात होऊ शकतो, म्हणून गर्भधारणेदरम्यान जास्त आलं टाळण्याचा आणि डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच खाण्याचा सल्ला दिला जातो.

(सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#जसत #आल #खललयन #हऊ #शकत #बलड #परशर #तयच #ह #सईड #इफकट #जणन #घय

RELATED ARTICLES

Mumbai : Sanjay Raut CM Uddhav Thackeray यांच्या भेटीला, राज्यसभेच्या जागेबाबच खलंबतं ABP Majha

<p>Mumbai : Sanjay Raut CM Uddhav Thackeray यांच्या भेटीला, राज्यसभेच्या जागेबाबच खलंबतं ABP Majha</p> अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते...

लग्नाला न आल्याने अजिंक्यवर भडकल्या ह्रताच्या सासू, म्हणाल्या आता…

मुंबई, 21 मे: सर्वांची लाडकी अभिनेत्री ह्रता दुर्गुळेने (hruta durgule )  प्रतिक शाह (prateek shah )  सोबत ह्रता 18 मे रोजी मुंबईत लग्न...

ऑपरेशनच्या नावाखाली कोट्यवधींची लूट, पेशंट बिल पाहून….

हॉस्पिटलचं बिल पाहून आकडी येईल.... ऑपरेशनच्या नावाखाली कोट्यवधींची लूट अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा...

Most Popular

भारतासाठी अभिमानाचा क्षण! आर. माधवनच्या ‘रॉकेट्री: द नंबी इफेक्ट’ला कान्समध्ये स्टँडिंग ओव्हेशन

Cannes Film Festival 2022 : अभिनेता आर. माधवनच्या (R Madhavan) दिग्दर्शनातील पदार्पण ‘रॉकेट्री: द नंबी इफेक्ट’चा (Rocketry: The...

Pune NCP Protest: लाल महालात लावणीप्रकरणी पुण्यात राष्ट्रवादीचं आंदोलन ABP Majha

<p>पुण्यातील लाल महालात लावणीचं शुटिंग झाल्याचं समोर आल्यानंतर मराठा महासंघ,संभाजी ब्रिगेड आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली. या लावणी शुटिंगचा संभाजी ब्रिगेडने निषेध...

Parenting Tips | तुमच्या ‘या’ गोष्टींमुळे मुलांच्या मनावर येतं मोठं दडपण; लगेचच थांबवा

मुंबई : Parenting Tips : आपण सर्वजण आपल्या मुलांना इतर मुलांपेक्षा चांगले बनवण्यासाठी स्पर्धा करीत असतो. कधी डान्सिंग क्लासमध्ये, कधी गाण्याच्या क्लासमध्ये, कधी...

कोरोनानंतर भारतावर आता Monkeypox चा धोका; मार्गदर्शक सूचना जाहीर

मुंबई : काही देशांमध्ये नवा संसर्ग मंकीपॉक्सचं प्रमाण वाढताना दिसतंय. यानंतर आता भारतातही खबरदारीचे उपाय सुरू झाले आहेत. त्यामुळे आता परिस्थितीवर बारकाईने लक्ष...

पंचमुखी दिवा अशा पद्धतीनं आपल्या घरात लावावा; अनंत अडचणी बाहेरच संपतील

मुंबई, 21 मे : हिंदू धर्मात प्रत्येक पूजेत दिवा लावणे अनिवार्य आणि शुभ मानले जाते. दिव्याशिवाय पूजा अपूर्ण मानली जाते. आपल्या देशात प्राचीन...

Flipkart Sale: अवघ्या ६,९९९ रुपयांमध्ये घरी येईल मॉडर्न फीचर्ससह पॅक्ड Smart TV, ‘ही’ कंपनी देतेय खास ऑफर, पाहा डिटेल्स

नवी दिल्ली: Smart Tv Offers: जर तुम्हाला नवीन Smart TV वर अपग्रेड करायचे असेल तर, तुमच्यासाठी एक भन्नाट संधी लवकरच उपलब्ध होणार आहे....